या 23 नव्या शहरांत सुरु झाली Vi ची 5G सर्विस, एक क्लिकवर वाचा प्रीपेड प्लॅन्सची किंमत
भारतातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यांपैकी एक असलेल्या वोडाफोन आइडिया (Vi) च्या युजर्स संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. कंपनी नवीन युजर्स जोडण्यासाठी अनेक प्रयत्न करत आहे. सतत नवीन सर्विस आणि रिचार्ज प्लॅन लाँच केले जात आहे. कंपनीने असे देखील काही रिचार्ज प्लॅन लाँच केले आहेत, ज्यांची किंमत कमी आहे पण या रिचार्ज प्लॅनमध्ये युजर्सना भरपूर बेनिफिट्स मिळणार आहे. याशिवाय कंपनीने अलीकडेच त्यांची 5G सर्विस देखील सुरु केली आहे.
मुंबईसह इतर अनेक शहरांमध्ये वोडाफोन आइडिया (Vi) ने त्यांची 5G सर्विस सुरु केली आहे. आता या यादीमध्ये आणखी वाढ झाली आहे. कारण कंपनीने नव्या 23 शहरांमध्ये त्यांची 5G सर्विस सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. वोडाफोन आइडिया (Vi) ने भारतातील 23 नव्या शहरांत 5G नेटवर्कचा विस्तार केला आहे. या शहरांमध्ये जयपुर, कोलकाता आणि लखनऊ सारख्या प्रमुख राज्यांचा समावेश आहे. (फोटो सौजन्य – Vi)
यापूर्वी Vi ने 5 शहरांत त्यांची 5G सर्विस सुरु केली होती, ज्यामध्ये मुंबई, दिल्ली-एनसीआर, बंगळुरु, चंदीगड आणि पटना यांचा समावेश होता. आता Vi त्यांची 5G सर्विस काही नवीन शहरांमध्ये सुरु करण्याचा प्लॅन करत आहे.
नव्या शहरांमध्ये अहमदाबाद, आग्रा, औरंगाबाद, कोझिकोड, कोची, डेहराडून, इंदूर, मदुराई, मलप्पुरम, मेरठ, नागपूर, नाशिक, पुणे, राजकोट, सोनीपत, सुरत, सिलीगुडी, तिरुअनंतपुरम, वडोदरा आणि विशाखापट्टणम यांचा समावेश आहे. कंपनीचे म्हणणे आहे की Vi ने त्यांच्या 5G रोलआउटचा पुढचा टप्पा सुरू केला आहे. Vi सेवा आता नव्या 23 शहरांमध्ये सुरू केली जाणार आहे. 5G स्मार्टफोन वापरणारे युजर्स ही सेवा सुरू झाल्यावर हाय-स्पीड नेटवर्कचा वापर करू शकणार आहेत.
Vi च्या 5G सेवा वेगवेगळ्या टप्प्यात सुरू केल्या जात आहेत, म्हणजेच ही सेवा प्रत्येक शहरात एकाच वेळी सुरू होणार नाही. कंपनीने ज्या शहरांची नावे जाहीर केली आहेत, त्या शहरांमध्ये ही सेवा टप्प्याटप्प्याने सुरु केली जाणार आहे. मात्र Vi च्या 5G सेवेचा लाभ घेण्यासाठी, तुम्हाला किमान 299 रुपयांचे रिचार्ज करावे लागणार आहे.
Vi च्या प्रीपेड प्लॅन्सची किंमत 299 रुपये, 349 रुपये, 365 रुपये, 579 रुपये, 649 रुपये, 859 रुपये, 979 रुपये आणि 3,599 रुपये आहे. पोस्टपेड प्लॅन्सची किंमत 451 रुपयांपासून 1,201 रुपयांपर्यंत आहे.