पाच दशकांहून अधिक काळापासून विजय सेल्स कुटुंबांना त्यांचा पहिला टेलिव्हिजन किंवा रेफ्रिजरेटर निवडण्यात मदत करण्यापासून ते त्यानंतरच्या प्रत्येक तंत्रज्ञान अपग्रेडमध्ये मार्गदर्शन करण्यापर्यंत केवळ इलेक्ट्रॉनिक्सचे ठिकाण राहिले नाही. विश्वास, विश्वासार्हता आणि प्रामाणिक सल्ल्याचे हे तत्त्वज्ञान ब्रँडच्या “डिलिव्हरिंग अपनापन” या वचनात व्यक्त होते. राहुल द्रविड, ज्यांची विश्वासार्हता आणि आत्मविश्वास पिढ्यानपिढ्या आणि भौगोलिक सीमांमध्ये गुंजतो, स्वाभाविकपणे या मूल्यांचे प्रतीक आहेत.
या सहयोगाबाबत मत व्यक्त करत *विजय सेल्सचे डायरेक्टर निलेश गुप्ता* म्हणाले, “विजय सेल्सची उभारणी नेहमी व्यवहारांवर नव्हे, तर संबंधांवर झाली आहे. ग्राहकाला काय हवे आहे हे समजून घेणे, योग्य सल्ला देणे आणि खरेदीनंतरही दीर्घकाळ त्यांच्यासोबत राहणे, विश्वास आणि अपनापनच्या (आपुलकीच्या) या भावनेने आम्हाला पाच दशकांहून अधिक काळ नव्या उंचीवर नेले आहे. राहुल द्रविड या मूल्यांचे खरेखुरे प्रतिनिधित्व करतात, ज्याच्याशी संपूर्ण भारतातील लोक जोडले जातात. आम्ही आमच्या वाढीच्या पुढील टप्प्यात प्रवेश करत असताना ही बाब ब्रँडचे प्रतिनिधित्व करण्यासाठी त्यांना आपसूक भागीदार बनवते.”
विजय सेल्ससोबत आपल्या सहयोगाबाबत मत व्यक्त करत राहुल द्रविड म्हणाले, “काही ब्रँड्स व्यक्तींच्या आयुष्याचा भाग केवळ ते काय विकतात यामुळे बनत नाहीत, तर ते निर्माण करत असलेल्या विश्वासामुळे बनतात. विजय सेल्सने अनेक दशकांपासून कुटुंबांसोबत हे नाते जपले आहे आणि मी ‘डिलिव्हरिंग अपनापन’मागील साधेपणा आणि आपुलकीशी विशेषतः जुडलो गेलो आहे. मला विजय सेल्ससोबत सहयोगाबाबत आनंद होत आहे, तसेच मी यापुढील प्रवासाचा भाग बनण्यासाठी उत्सुक आहे.”
विजय सेल्स आपली ओम्नि-चॅनल परिसंस्था अधिक दृढ करत असताना हा सहयोग करण्यात आला आहे, जिथे त्यांच्या स्टोअर्सचे आश्वासन व तज्ज्ञता ऑनलाइन खरेदीच्या सुविधेसह एकत्र येते. टेलिव्हिजन, डिजिटल, सोशल मीडिया, इन-स्टोअर आणि इतर ग्राहक टचपॉइंट्समध्ये पसरलेल्या ब्रँडच्या आगामी सर्वांगीण संवादात द्रविड प्रमुख भूमिकेत दिसतील आणि वर्षभरात मुख्य श्रेणी व सणांच्या मोहिमांचे नेतृत्व करतील. या पावलाच्या केंद्रस्थानी तीच धारणा आहे, ज्याने पिढ्यानपिढ्या विजय सेल्सला नव्या उंचीवर नेले आहे: तंत्रज्ञान बदलत राहील, पण विश्वास, नातेसंबंध आणि खऱ्या काळजीचे महत्त्व कधीही कमी होत नाही.






