चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फोटोंदरम्यान व्हायरल झाला विराट कोहलीच्या हातातील फीटनेस बँड! तब्बल इतकी आहे किंमत, जाणून घ्या फीचर्स
9 मार्च रोजी झालेल्या भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे विजेतेपद जिंकले आहे. या सामन्यावेळी कॅप्टन रोहित शर्मासोबतच विराट कोहली आणि इतर खेळाडूंनी देखील महत्त्वाची भुमिका बजावली. या विजयानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये विराट कोहलीच्या हातात दिसणारा फिटनेस बँड देखील प्रचंड व्हायरल होत आहे.
अनेकजण विराट कोहलीच्या हातातील फिटनेस बँड ऑनलाइन वेबसाईट्सवर सर्च करत आहेत. विराट कोहलीच्या हातातील या फीटनेस बँडची काय किंमत आहे आणि याचे फीचर्स काय आहेत, हे जाणून घेण्यासाठी सर्वचजण उत्सुक आहेत. चला तर मग विराट कोहलीच्या हातातील फिटनेस बँडबद्दल जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – X)
विराट कोहलीने घातलेला बँड हा सामान्य स्मार्ट बँड नसून WHOOP 4.0 फिटनेस ट्रॅकर आहे. हा बँड जगभरातील अनेक अव्वल खेळाडू वापरतात. खास गोष्ट म्हणजे यात कोणताही डिस्प्ले नाही, म्हणजेच हा पूर्णपणे हलका आणि स्क्रीन-लेस फिटनेस ट्रॅकर आहे, जो 24×7 शरीराच्या हालचाली ट्रॅक करतो.
डिस्प्ले-लेस डिझाइन: हा बँड पूर्णपणे स्क्रीन-फ्री आहे, ज्यामुळे तो घालण्यात कोणताही त्रास होत नाही. शिवाय याचे वजन देखील अत्यंत कमी आहे.
24×7 हेल्थ मॉनिटरिंग: हार्ट रेट, स्लीप पॅटर्न, स्ट्रेन आणि रिकवरी यासारख्या गोष्टींचा मागोवा घेण्यासाठी हे प्रगत सेन्सर्सने सुसज्ज आहे.
वॉटरप्रूफ: पोहताना, कसरत करताना आणि इतर क्रीडा एक्टिविटी करताना देखील हे फीटनेस ट्रॅकर आरामात घालता येते.
बॅटरी बॅकअप आणि चार्जिंग: त्याचा चार्जर वॉटरप्रूफ देखील आहे आणि तो दीर्घ बॅटरी लाइफ देतो.
सबस्क्रिप्शन आधारित सेवा: हा बँड खरेदी करण्यासाठी, तुम्हाला WHOOP चे सबस्क्रिप्शन घ्यावे लागेल, ज्यामध्ये वेळोवेळी नवीन वैशिष्ट्ये जोडली जातात.
जर तुम्हाला हा बँड खरेदी करायचा असेल तर तो Amazon India वर उपलब्ध आहे. येथे त्याची किंमत 31,800 रुपये आहे, ज्यामध्ये 12 महिन्यांचे सबस्क्रिप्शन देखील समाविष्ट आहे. म्हणजेच हे डिव्हाईस खरेदी केल्यानंतर, तुम्हाला एक वर्षासाठी WHOOP च्या सेवेचा वापर करता येईल.
हा फिटनेस बँड विकसित करण्यासाठी, WHOOP कंपनीने शास्त्रज्ञ आणि डॉक्टरांच्या सहकार्याने काम केले आहे. WHOOP चे संस्थापक आणि सीईओ विल अहमद यांच्या मते, हा बँड अशा गोष्टींचा मागोवा घेण्यास सक्षम आहे, जे इतर फिटनेस बँड सहसा करू शकत नाहीत. युजर्सच्या फिटनेस, रिकवरी आणि एकूण आरोग्याचे निरीक्षण करण्यासाठी हे अत्यंत प्रभावी आहे. जर तुम्ही प्रोफेशनल एथलीट असाल किंवा तुमचे आरोग्य आणि कामगिरी गंभीरपणे ट्रॅक करू इच्छित असाल, तर WHOOP 4.0 हा एक उत्तम पर्याय असू शकतो.