YouTube Update: कंटेट क्रिएटर्स इकडे लक्ष द्या! 19 मार्चपासून नियमांत होणार मोठा बदल, एक चूक आणि कायमचं ब्लॉक होईल अकाउंट
युट्यूब लोकप्रिय व्हिडीओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्मपैकी एक आहे. युट्यूबचे करोडो अॅक्टिव्ह युजर्स आहेत. त्यामुळे आपल्या युजर्सना योग्य प्रकारचा कंटेट पाहता यावा, यासाठी युट्यूब नेहमीच त्यांच्या पॉलिसीमध्ये बदल करत असते. आता देखील कंपनीने नवीन नियम जारी केले आहेत. याअंतर्गत युट्यूबने ऑनलाइन गँबलिंग कंटेटविरुद्धचे नियम कडक केले आहेत. कंपनीने जारी केलेले हे नवीन नियम 19 मार्चपासून लागू केले जाणार आहेत.
भारतात YouTube ने हटवले 29 लाख व्हिडिओ, बंद केले 48 लाख चॅनेल्स; या कारणांमुळे घेतला निर्णय
19 मार्चनंतर, अनसर्टिफाईड गँबलिंग अॅप्स आणि वेबसाइट्सचा प्रचार करणाऱ्या कंटेट क्रिएटर्सचे अकाऊंट ब्लॉक केलं जाणार असल्याचं युट्यूबने जाहिर केलं आहे. यासोबतच, अशा कंटेट क्रिएटर्सवर देखील कठोर कारवाई केली जाईल जे त्यांच्या कंटेटमध्ये अशा जुगार सेवा किंवा अॅप्सचा लोगो दाखवतात, ज्यांना गुगलने मान्यता दिलेली नाही. हे नियम पुढील आठवड्यापासून लागू होणार आहेत. त्यामुळे आता कोणताही गँबलिंग अॅप्स आणि वेबसाइट्सचा प्रचार करणारे व्हिडीओ पोस्ट करताना कंटेट क्रिएटर्सना प्रचंड काळजी घ्यावी लागणार आहे. कारण त्यांची एक चूक युट्यूब अकाऊंट ब्लॉक करू शकते. (फोटो सौजन्य – Pinterest)
व्हिडीओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म युट्यूबने हा निर्णय का घेतला, याबाबत सर्वांना उत्सुकता लागली आहे. तर आता आम्ही तुम्हाला युट्यूबच्या या निर्णयाचं कारण सांगणार आहोत. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीने म्हटले आहे की या निर्णयाचा परिणाम कॅसिनो गेम आणि अॅप्ससहगँबलिंग कंटेट तयार करणाऱ्या क्रिएटर्सवर होईल, परंतु तरुण प्रेक्षकांचे संरक्षण करण्यासाठी असे निर्णय घेणं आवश्यक झाले आहे. आताही, प्रेक्षकांना YouTube वरील जुगार साइट्स आणि अॅप्सवर रिडायरेक्टर करणे हे नियमांचे उल्लंघन मानले जाते, परंतु नवीन नियम लागू झाल्यानंतर, जर कोणत्याही क्रिएटर्सने अशा कोणत्याही साइट किंवा अॅपवरून गारंटीड रिटर्न मिळण्याचा दावा केला तर त्याचा कंटेट हटवला जाईल, शिवाय संबंधित क्रिएटरवर कारवाई देखील केली जाण्याची शक्यता आहे.
नियम कडक करत, YouTube ने ऑनलाइन कॅसिनो किंवा अॅप्सचा प्रचार करणाऱ्या कंटेटवर वयोमर्यादा लादण्याचा निर्णय घेतला आहे. याचा अर्थ असा की असा कंटेट आता साइन आउट केलेल्या युजर्सना आणि 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या युजर्सना दाखवला जाणार नाही.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्हिडिओंवर YouTube कठोर कारवाई करत आहे. एका अहवालात असे म्हटले आहे की गेल्या वर्षी ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान, YouTube च्या समुदाय मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करणारे 29 लाख व्हिडिओ हटवण्यात आले. जगातील कोणत्याही देशात हटवण्यात आलेल्या व्हिडिओंची ही सर्वात मोठी संख्या आहे. त्यामुळे सध्या असे दिसून येत आहे की, युट्यूब त्यांच्या नियमांबाबत फार कठोर झाला आहे.