
मोबाईल फोटोग्राफीत होणार ऐतिहासिक बदल! स्मार्टफोन कंपन्यांची मोठी तयारी सुरु, डुअल 200MP कॅमेरा सेटअप ठरणार गेमचेंजर
2026 मध्ये स्मार्टफोन कॅमेऱ्यात अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा बदल होणार आहे. 2026 मध्ये टेक कंपन्या 200MP चे दोन सेंसर असलेले स्मार्टफोन लाँच करण्याची तयारी करत आहेत. रिपोर्टनुसार, ओप्पो आणि वीवो या दोन्ही कंपन्या असे स्मार्टफोन्स लाँच करण्याची प्लॅनिंग करत आहेत, ज्याच्या रिअरमध्ये डुअल 200MP कॅमेरा सिस्टिम असणार आहे. ओप्पो आणि वीवो स्मार्टफोन लाँच केल्यानंतर इतर कंपन्या देखील हा ट्रेंड फॉलो करतील अशी अपेक्षा आहे.
यावर्षी लाँच केल्या जाणाऱ्या स्मार्टफोनमध्ये 200MP च्या मुख्य सेंसरसह 200MP चा टेलिफोटो कॅमेरा देखील दिला जाणार आहे. सोनी, सॅमसंग, स्मार्टसेंस, ओमनीविजन आणि गॅलेक्सी कोर सह सेंसर तयार करणाऱ्या कंपन्या 200MP सेंसर तयार करण्यात व्यस्त आहेत. गैलेक्सीकोर चा /1.4-inch 200MP टेलीफोटो वापरासाठी ऑप्टिमाइज करण्यात आला आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
आगामी स्मार्टफोन्सबाबत काही लीक्स समोर आले आहेत. या लीक्सवर विश्वास ठेवला तर ओप्पोच्या आगामी Find X9 Ultra मध्ये 200MP चे दोन रिअर कॅमेरे दिले जाऊ शकतात. यामध्ये एक प्रायमरी आणि दुसरा पेरिस्कोप टेलीफोटो लेंस असणार आहे. या सेंसरच्या मदतीने कमी प्रकाशात देखील उत्तम फोटोग्राफी केली जाणार आहे. यासोबतच फोटोमधील बारीक डिटेल्स देखील कॅप्चर केले जाणार आहेत. या फोनमध्ये 50MP चा एक तीसरा अल्ट्रा-वाइड कॅमेरा देखील दिला जाण्याची शक्यता आहे. आगामी विवो स्मार्टफोनबद्दल बोलायचं झालं तर Vivo X300 Ultra मध्ये देखील 200MP वाले दोन सेंसर असणार आहेत. याबाबत अद्याप जास्त माहिती समोर आली नाही, मात्र हा स्मार्टफोन फोटोग्राफीवर अधिक लक्ष केंद्रीत करणार आहे, यामध्ये काही शंका नाही.
डुअल 200MP कॅमेऱ्यामुळे स्मार्टफोन फोटोग्राफीचा अनुभव पूर्णपणे बदलणार आहे आणि यामुळे यूजर्सा डिजिटल झूमवर अवलंबून राहावे लागणार नाही. चांगले कॅमेरे यूजर्सना अधिक स्पष्ट झूम शॉट्स, अधिक क्रॉपिंग फ्लेक्सिबिलिटी आणि सातत्याने सुसंगत इमेज क्वालिटी देतील. जर हा ट्रेंड असाच चालू राहिला तर स्मार्टफोन डीएसएलआर कॅमेऱ्यांना मागे टाकू शकतील.