Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Samsung की iPhone? भारतात कोणत्या ब्रँडचा स्मार्टफोन सर्वाधिक विकला जातो? जाणून घ्या सविस्तर

जेव्हा भारतात सर्वाधिक विक्री होणाऱ्या स्मार्टफोन्सचा विचार केला जातो तेव्हा बहुतेक लोकांना वाटते की ते सॅमसंग असतील किंवा महागडे आयफोन असतील, पण नाही. यंदा यादीत एका नव्या स्मार्टफोन ब्रँडने बाजी मारली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 26, 2025 | 11:01 AM
Samsung की iPhone? भारतात कोणत्या ब्रँडचा स्मार्टफोन सर्वाधिक विकला जातो? जाणून घ्या सविस्तर

Samsung की iPhone? भारतात कोणत्या ब्रँडचा स्मार्टफोन सर्वाधिक विकला जातो? जाणून घ्या सविस्तर

Follow Us
Close
Follow Us:

भारतातील लोकांमध्ये स्मार्टफोनची वेगळीच क्रेझ आहे. खरं तर भारतीयांमध्ये आयफोनची प्रचंड क्रेझ आहे. शिवाय भारतीयांमध्ये सॅमसंग गॅलेक्सीची देखील प्रचंड क्रेझ आहे. त्यामुळे जेव्हा भारतात सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या स्मार्टफोनचा विचार केला जातो, तेव्हा सॅमसंग आणि आयफोनचं नाव डोळ्यासमोर येतं. पण तुम्हाला जाणून ऐकूण आश्चर्य वाटेल की भारतात सर्वाधिक विकला जाणाऱ्या स्मार्टफोनचा ब्रँड आयफोन किंवा सॅमसंग नाही तर विवो आहे.

Google चा Chrome विकला जाणार? खरेदी करण्यासाठी या दोन कंपन्या आल्या समोर! नेमकं काय आहे प्रकरण? सविस्तर जाणून घ्या

2024 च्या शेवटच्या तीन महिन्यांत विवोने आयफोन आणि सॅमसंगला मागे टाकतं बाजी मारली आहे. Vivo हा भारतातील बेस्ट सेलिंग फोन बनला आहे. सादर करण्यात आलेल्या अहवालानुसार, विवोने भारतात त्यांचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. साइबरमीडिया रिसर्चच्या रिपोर्टनुसार, Vivo भारताचा नंबर वन सेलिंग स्मार्टफोन बनला आहे. विवोने संपूर्ण भारतात त्यांच्या स्मार्टफोनची सर्वाधिक विक्री केली आहे. या स्मार्टफोनचा मार्केट शेयर 18 टक्के आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

या स्मार्टफोनच्या यादीत दुसऱ्या स्थानावर Xiaomi चं नाव आहे. या स्मार्टफोनचा मार्केट शेअर 15.2 टक्के आहे आणि सॅमसंग या यादित तिसऱ्या स्थानावर आहे. सॅमसंगचा मार्केट शेअर 15.1 टक्के आहे. तर टेक जायंट कंपनी आणि सर्वांचा आवडता ब्रँड अ‍ॅपल या यादीत पाचव्या स्थानावर आहे. या कंपनीचा मार्केट शेअर 11 टक्के आहे.

2024 मध्ये स्मार्टफोनच्या बाजारात एक अनोखा ट्रेंड पाहायला मिळाला. 2024 च्या शेवटच्या तीन महिन्यांत लोकं प्रिमियम स्मार्टफोन खरेदी करण्यापेक्षा लोकं महागडे स्मार्टफो खरेदी करण्याला अधिक प्राधान्य देतात. एका सादर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार, गेल्या वर्षी 50,000 रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या स्मार्टफोनच्या विक्रीत सर्वाधिक वाढ झाली. 10,000 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या 5G स्मार्टफोनच्या विक्रीतही 80 टक्के पर्यंत प्रचंड वाढ झाली आहे.

OnePlus चा धमाका! IP69 रेटिंग आणि नवीन Shortcut Key फीचरसह नवा Smartphone केला लाँच! वाचा स्पेसिफिकेशन्स

गेल्या वर्षात सॅमसंगने देखील त्यांच्या स्मार्टफोनच्या ब्रँडची विक्री सर्वाधिक केली. मात्र त्यांच्या बजेट सेगमेंट फोनमध्ये म्हणजेच ज्या स्मार्टफोनची किंमत 7,000 ते 25,000 रुपयांच्या दरम्यान होती, अशा स्मार्टफोनच्या विक्रीमध्ये 7 टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. त्यामुळे हे स्पष्ट आहे की, भारतातील लोकं स्वस्त स्मार्टफोनच्या ऐवजी फीचर-पॅक प्रीमियम स्मार्टफोनची खरेदी करणं अधिक पसंत करतात.

सध्याच्या या डिजीटल आणि टच स्क्रिनच्या जगात लोकं Nokia, Lava आणि Jio सारख्या ब्रँड्सचे फीचर फोन कमी खरेदी करतात. 2G फीचर फोनची विक्री 22 टक्के आणि 4G फीचर फोनची विक्री 59 टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे. याचाच अर्थ सध्याच्या डिजीटल दुनियेत लोकं स्मार्टफोनकडे वळत आहेत. 25,000 रुपयांपेक्षा पुढील प्रीमियम सेगमेंटमध्ये Samsung सर्वात पुढे आहे. ज्याचा मार्केट शेअर 28 टक्के आहे. Apple कंपनी 25 टक्क्यांसह आणि विवो 15 टक्के शेअरसह या यादीत सहभागी झाला आहे. 5G स्मार्टफोन्सच्या विक्रीत विवोने बाजी मारली आहे.

Web Title: Vivo is the best selling smartphone in india tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 26, 2025 | 11:01 AM

Topics:  

  • smartphone
  • Tech News
  • vivo

संबंधित बातम्या

iPhone, iPad आणि Mac युजर्सवर हॅकर्सची नजर! कंपनीने दिलाय इशारा, तुमचे डिव्हाईस आत्ताच करा अपडेट अन्यथा…
1

iPhone, iPad आणि Mac युजर्सवर हॅकर्सची नजर! कंपनीने दिलाय इशारा, तुमचे डिव्हाईस आत्ताच करा अपडेट अन्यथा…

म्युझिक लव्हर्ससाठी खुशखबर! Spotify चे नवीन प्रीमियम प्लॅन्स भारतात लाँच, Platinum मध्ये AI DJ सह मिळणार हे अनोखे फीचर्स
2

म्युझिक लव्हर्ससाठी खुशखबर! Spotify चे नवीन प्रीमियम प्लॅन्स भारतात लाँच, Platinum मध्ये AI DJ सह मिळणार हे अनोखे फीचर्स

DPDP 2025: केंद्र सरकारने जारी केले नवे नियम! यूजर्सना त्यांच्या डेटावर मिळणार कंट्रोल, भारताचा पहिला डिजिटल प्रायव्हसी कायदा..
3

DPDP 2025: केंद्र सरकारने जारी केले नवे नियम! यूजर्सना त्यांच्या डेटावर मिळणार कंट्रोल, भारताचा पहिला डिजिटल प्रायव्हसी कायदा..

X Update: एलन मल्कच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आलं नवीन एन्क्रिप्टेड चॅट फीचर! DMs केले रिप्लेस, युजर्सना मिळणार या सुविधा
4

X Update: एलन मल्कच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आलं नवीन एन्क्रिप्टेड चॅट फीचर! DMs केले रिप्लेस, युजर्सना मिळणार या सुविधा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.