Vivo X300 Pro vs Pixel 9 Pro: 1 लाखांच्या बजेटमध्ये मार्केटमध्ये कोण घालणार धुमाकूळ? कॅमेरा आणि परफॉर्मंसमध्ये तीव्र स्पर्धा
दोन्ही स्मार्टफोनच्या किंमती लाखोंच्या घरात आहेत. पण या दोन्हीपैकी एका स्मार्टफोनची निवड करायची असेल तर निर्णय घेणं कठिण आहे. तुमचा हा गोंधळ दूर करण्यासाठी, आम्ही या दोन्ही फ्लॅगशिप फोनच्या डिझाइन, डिस्प्ले, कॅमेरा आणि परफॉर्मन्सची तुलना केली आहे.
Free Fire Max: प्लेअर्सना मोफत मिळणार यूनीक Hair स्टाइल, क्लेम करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स
Vivo X300 Pro मध्ये 6.78-इंचाचा मोठा AMOLED डिस्प्ले दिला जाणार आहे. हा स्मार्टफोन मेटल आणि ग्लास डिझाईनसह अतिशय मजबूत आहे. याची स्क्रीन जास्त ब्राइटनेस आणि डोळ्यांच्या सुरक्षेवर अधिक फोकस करणार आहे. तर Google Pixel 9 Pro मध्ये 6.3-इंचाचा LTPO OLED पॅनल आहे. हा स्मार्टफोन हातात अगदी सहज फिट होतो. गूगलचा डिस्प्ले नेचुरल कलर्स आणि रियलिस्टिक व्यूइंग एक्सपीरियंससाठी ओळखला जातो.
Vivo X300 Pro हा आगामी स्मार्टफोन मीडियाटेकच्या Dimensity 9500 चिपसेटसह लाँच केला जाणार आहे. जर तुम्ही गेमिंग करत असाल आणि अनेक अॅप्सचा एकाचवेळी वापर करत असाल या स्मार्टफोनची स्पीड अतिशय चांगली आहे. Google Pixel 9 Pro मध्ये गूगलची Tensor G4 चिप आहे. रॉ स्पीडच्या बाबतीत हा स्मार्टफोन थोडा मागे असू शकतो. मात्र वॉईस प्रोसेसिंग, इमेज रिकग्निशन आणि AI फीचर्समध्ये याला तोड नाही.
Vivo X300 Pro मध्ये हार्डवेयर देखील लक्ष दिले आहे. या आगामी स्मार्टफोनमध्ये Zeiss ऑप्टिक्स आणि हाई-रेजोल्यूशन पेरिस्कोप लेंस दिली जाणार आहे. कमी प्रकाशात आणि झूम फोटोग्राफीसाठी हा एक चांगला पर्याय आहे. यामध्ये एक वेगळा सेंसर देखील आहे, जो फोटोमध्ये अचूक रंग दाखवतो. Google Pixel 9 Pro ची जादू त्याच्या सॉफ्टवेयरमध्ये आहे. याचे कम्प्यूटेशनल फोटोग्राफी एल्गोरिदम प्रत्येक फोटोला बॅलेंस करतो आणि परफेक्ट बनवतो. बेस्ट टेक आणि झूम इंन्हांस सारख्या फीचर्समुळे फोटोग्राफीचा अनुभव अधिक चांगला होतो.
Vivo X300 Pro मध्ये मोठी बॅटर आणि वायर्ड आणि वायरलेस दोन्हीमध्ये सुपरफास्ट चार्जिंग दिली जाण्याची अपेक्षा आहे. ज्यांना सतत त्यांचा फोन चार्ज करायला आवडत नाही त्यांच्यासाठी हा चांगला पर्याय आहे. Google Pixel 9 Pro ची बॅटरी लाईफ अतिशय उत्तम आहे. मात्र याची चार्जिंग स्पीड वीवोच्या तुलनेत थोडी कमी आहे. दोन्ही स्मार्टफोनच्या किंमती 1,09,999 रुपयांपर्यंत आहेत.
जर तुम्हाला गेमिंग, सुपरफास्ट चार्जिंग आणि एडवांस कॅमेरा हार्डवेअर (Zeiss) साठी रॉ परफॉर्मन्स हवा असेल तर तुम्ही Vivo X300 Pro ची निवड करू शकता. जर तुम्हाला क्लीन सॉफ्टवेयर, 7 वर्षांचे अपडेट्स, स्मार्ट AI फीचर्स आणि एक कॉम्पॅक्ट फोन पाहिजे असेल तर Google Pixel 9 Pro तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरणार आहे.
Ans: Vivo (V series / X series / iQOO) गेमिंगसाठी जास्त शक्तीशाली प्रोसेसर आणि कूलिंग सिस्टम देते. Pixel गेमिंगपेक्षा AI फीचर्सवर लक्ष केंद्रित करतो.
Ans: Vivo मध्ये जास्त क्षमतेची बॅटरी आणि 44W–120W फास्ट चार्जिंग असते. Pixel मध्ये स्थिर बॅटरी परफॉर्मन्स पण चार्जिंग स्पीड कमी.
Ans: Pixel हे सर्वोत्तम – सर्वात आधी व सर्वात जास्त Android अपडेट्स. Vivo अपडेट्स देते, पण Pixelइतके वेगाने नाही.