Vivo Y19e: आकर्षक डिझाइनसह भारतात नव्या स्मार्टफोनची एंट्री, किंमत केवळ 7,999 रुपये आणि असे आहेत दमदार फिचर्स
चीनचा लोकप्रिय स्मार्टफोन ब्रँड Vivo ने त्यांच्या Y सीरिजमधील नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. चिनी कंपनी Vivo चा नवीन स्मार्टफोन Vivo Y19e भारतात लाँच करण्यात आला आहे. लेटेस्ट स्मार्टफोन मॉडेल 2 रंगाच्या पर्यायात आणि एक स्टोरेज व्हेरियंटमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. हा नवीन फोन बजेट फ्रेंडली रेंजेमध्ये बाजारात लाँच करण्यात आला आहे.
लेटेस्ट स्मार्टफोन मॉडेल Vivo Y19e मध्ये Unisoc T7225 प्रोसेसर आहे आणि 13-मेगापिक्सेलचा AI-समर्थित ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. Vivo Y19e मध्ये 6.74-इंचाचा डिस्प्ले आणि 5,500mAh बॅटरी देण्यात आली आहे. धूळ आणि पाण्यापासून संरक्षणासाठी स्मार्टफोनमध्ये IP64-रेटेड बिल्ड आहे. (फोटो सौजन्य – X)
Vivo Y19e स्मार्टफोन 4GB RAM + 64GB स्टोरेज व्हेरियंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनची भारतातील किंमत अगदी परवडणारी आहे. भारतात Vivo Y19e ची किंमत 4GB RAM + 64GB स्टोरेज व्हेरियंटसाठी 7,999 रुपये ठेवण्यात आली आहे. नवा स्मार्टफोन मॅजेस्टिक ग्रीन आणि टायटॅनियम रंग पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. सध्या हा स्मार्टफोन फ्लिपकार्ट, विवो-इंडिया ई-स्टोअर आणि प्रमुख रिटेल स्टोअर्समधून खरेदी केला जाऊ शकतो.
ड्युअल-सिम (नॅनो) Vivo Y19e हा Android 14 वर आधारित FunTouch OS 14 चालवतो आणि या फोनमध्ये 6.74-इंच HD+ (720×1,600 पिक्सेल) LCD डिस्प्ले आहे. हे ऑक्टा-कोर Unisoc T7225 चिपसेटवर चालते, ज्यामध्ये 4GB RAM आणि 64GB ऑनबोर्ड स्टोरेज आहे.
Style that lasts! The all new vivo Y19e brings the segment’s BIGGEST battery, for all-day performance and the AI Erase feature to remove distractions effortlessly. Stay stylish, stay unstoppable!
Also, get exclusive benefits with Jio.https://t.co/HBhdFg8yA7
*T&C apply… pic.twitter.com/l5CGdvpsVI
— vivo India (@Vivo_India) March 20, 2025
फोटोग्राफीच्या बाबतीत बोलायचं झालं तर, Vivo Y19e मध्ये AI-समर्थित ड्युअल रियर कॅमेरा युनिट आहे ज्यामध्ये 13-मेगापिक्सेलचा प्रायमरी सेन्सर (f/2.2 अपर्चर) आणि 0.08-मेगापिक्सेलचा सेकंडरी कॅमेरा (f/3.0 अपर्चर) समाविष्ट आहे. समोर, सेल्फी आणि व्हिडिओ चॅटसाठी 5-मेगापिक्सेल सेन्सर (f/2.2 अपर्चर) आहे. हा हँडसेट AI Erase आणि AI Photo Enhance सारख्या अनेक AI-बेस्ड फीचर्सना सपोर्ट करतो.
Vivo Y19e वरील कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये ब्लूटूथ 5.2, FM रेडिओ, GPS, OTG, BeiDou, GLONASS, Galileo, QZSS आणि Wi-Fi यांचा समावेश आहे. यात अॅक्सिलरोमीटर, अॅम्बियंट लाईट सेन्सर, ई-कंपास आणि प्रॉक्सिमिटी सेन्सर आहे. बायोमेट्रिक ऑथेंटिकेशनसाठी या स्मार्टफोनमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. त्याचे बिल्ड IP64-रेटेड आहे. या हँडसेटमध्ये SGS आणि मिलिटरी-ग्रेड शॉक रेझिस्टन्स सर्टिफिकेशन असल्याचा दावा आहे, ज्यामुळे स्मार्टफोनचे पडण्यापासून आणि शॉक्सपासून संरक्षण केले जाते.
Vivo Y19e मध्ये 5,500mAh बॅटरी आहे, जी 15W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कंपनीचा दावा आहे की ही बॅटरी एकदा चार्ज केल्यावर 19 तासांचा YouTube व्हिडिओ प्लेबॅक आणि 22.5 तासांपर्यंत Spotify म्युझिक प्लेबॅक वेळ देते. त्याचा आकार 167.3 x 76.95 x 8.19mm मिमी आहे आणि त्याचे वजन सुमारे 199 ग्रॅम आहे.