Redmi A5 4G: Xiaomi चा धमाका! 10 हजारांहून कमी किंमतीत घरी घेऊन या 'हा' लेटेस्ट स्मार्टफोन, 5,200mAh बॅटरी आणि असे आहेत फीचर्स
स्मार्टफोन कंपनी Redmi ने बांगलादेशामध्ये त्यांचा नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. नवीन स्मार्टफोनचं नाव Redmi A5 4G आहे. या स्मार्टफोनची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स आता अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहेत. हा एक बजेट फ्रेंडली स्मार्टफोन आहे, ज्याची किंमत 10 हजारांहून कमी आहे. रिपोर्ट्सनुसार, Xiaomi च्या सब-ब्रँडचा हा नवीन फोन अधिकृत लाँच होण्यापूर्वीच विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे.
Xiaomi सध्या Redmi 5A 4G चा टीझर शेअर केला आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर या नवीन स्मार्टफोनचा टीझर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. भारतासह इतर बाजारपेठांमध्ये हा ब्रँड न्यू स्मार्टफोन POCO C71 या नावाने लाँच होण्याची अपेक्षा आहे. कंपनीने इतर देशातील लाँचिंगबाबत अद्याप कोणतीही घोषणा केली नाही. शिवाय हा नवीन स्मार्टफोन इतर देशांमध्ये लाँच होताना त्याच्या फीचर्स आणि डिझाईनमध्ये कोणता बदल होणार का, याबाबत देखील अद्याप कोणतीही माहिती देण्यात आली नाही. (फोटो सौजन्य – X)
खरेदीदारांनी केलेल्या फेसबुक पोस्टनुसार, Redmi A5 4G ची किंमत 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज असलेल्या बेस मॉडेलसाठी BDT 10,999 म्हणजेच अंदाजे 7,855 रुपयांपासून सुरू होते. या स्मार्टफोनचा दुसरा व्हेरिअंट 6GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह येतो. या व्हेरिअंटची किंमत BDT 12,999 म्हणजेच अंदाजे 9,283 रुपये आहे. हा स्मार्टफोन चार रंगांच्या पर्यायांमध्ये लाँच करण्यात आला आहे. ज्यामध्ये काळा, बेज, निळा आणि हिरवा यांचा समावेश आहे. Redmi A5 4G सध्या बांगलादेशमध्ये ऑफलाइन रिटेलर्सद्वारे खरेदीसाठी उपलब्ध आहे.
Redmi A5 4G मध्ये 6.88-इंचाचा HD+ LCD डिस्प्ले आहे जो 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. त्याच्या समोर एक नॉच डिझाइन आहे. फोनमध्ये Unisoc T7250 चिपसेट आहे. या स्मार्टफोनमध्ये 32MP चा AI रियर कॅमेरा आणि सेल्फीसाठी 8MP फ्रंट कॅमेरा आहे. त्याचा कॅमेरा ओवल-शेप्ड आहे.
Redmi A5 4G मध्ये 5,200mAh बॅटरी आहे, जी 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. बॉक्समध्ये 15W चार्जर दिला आहे. फोनमध्ये AG फ्रोस्टेड ग्लास बॅक आणि साइड-फेसिंग फिंगरप्रिंट सेन्सर आहे.
iPhone नंतर आता Apple च्या या प्रोडक्टचीही भारतात होणार निर्मिती, काय आहे कंपनीचा प्लॅन? जाणून घ्या
Redmi A5 4G भारतासारख्या इतर बाजारपेठांमध्ये POCO C71 म्हणून लाँच केला जाण्याची अपेक्षा आहे. मात्र कंपनीने अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. हा एक बजेट फोन असेल, ज्याची किंमत 10,000 रुपयांपेक्षा कमी असेल. POCO कडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही. पण हा फोन वेगळ्या नावाने लाँच होण्याची शक्यता आहे, कारण काही जागतिक बाजारपेठांमध्ये Redmi A4 हा स्मार्टफोन POCO C75 म्हणून लाँच करण्यात आला होता. तथापि, तो एक 5G फोन होता, तर POCO C71 हा 4G फोन असेल, त्यामुळे त्याची किंमत मागील मॉडेलपेक्षा कमी असण्याची अपेक्षा आहे.