सोलापूर येथील फताटेवाडी ग्रामपंचायतीत तब्बल 4.42 कोटींचा अपहार; सरपंच, उपसरपंचासह ग्रामसेवकांवर गुन्हा
रमजानच्या महिन्यात लाखो भारतीय उपवास करतात आणि दानधर्म करतात. मात्र याच काळात सायबर गुन्हेगार अॅक्टिव्ह होतात. हॅकर्स देखील याच संधीचा फायदा घेऊन लोकांची फसवूणक करतात. ज्यामध्ये क्रिप्टो गिवअवे, फर्जी डोनेशन कॅम्पेन आणि नकली ई-कॉमर्स सेल्स सारख्या योजनांचा समावेश असतो. या सगळ्या ट्रीक्सचा वापर करून सायबर गुन्हेगार लोकांची फसणूक करतात.
रमजानमध्ये, अनेक लोक गरजूंना मदत करण्यासाठी चॅरिटी आणि स्वयंसेवी संस्थांना देणगी देतात. स्कॅमर्स लोकांच्या या भावनेचा फायदा घेत बनावट चॅरिटी वेबसाइट तयार करतात किंवा व्हॉट्सअॅप, इंस्टाग्राम आणि फेसबुकवर खऱ्या संस्थांची नक्कल करतात. स्कॅमर्स लोकांना मॅसेज पाठवतात ज्यामध्ये असं सांगितलं जात की, इफ्तार जेवण, अनाथाश्रम किंवा वैद्यकीय मदतीसाठी देणगी गोळा केली जात आहे. मॅसेजमध्ये वेबसाईटची एक लिंक देखील दिली जाते. जेव्हा आपण या लिंकवर पैसे ट्रांसफर करतो तेव्हा ते पैसे कोणत्या संथ्येला नाही तर हॅकर्सच्या अकाऊंटला जमा होतात. (फोटो सौजन्य – Pinterest)
भारतात क्रिप्टोकरन्सीची वाढती लोकप्रियता पाहता, हॅकर्स रमजानच्या नावाखाली बनावट क्रिप्टो गिव्हवे देखील सुरु करत आहेत. या प्लॅनमध्ये स्कॅमर्स लोकांना मोफत बिटकॉइन, इथेरियम किंवा इस्लामिक-थीम असलेले टोकन देण्याचे वचन देतात. मात्र यासाठी स्कॅमर्स लोकांकडून काही रक्कम वसूल करतात आणि त्यांची फसवूणक करतात. ट्विटर, टेलिग्राम आणि इंस्टाग्रामवर या स्कॅमच्या बनावट जाहिराती पोस्ट केल्या जातात. रिवॉर्ड मिळवण्यासाठी युजर्सना त्यांचे क्रिप्टो वॉलेट कनेक्ट करण्यास सांगितले जाते. क्रिप्टो वॉलेट कनेक्ट करताच स्कॅमर्स त्यांचं काम सुरु करतात आणि काही क्षणातच पिडीतीचं पाकीट पूर्णपणे रिकामे होते.
अनेक स्कॅमर बनावट वेबसाइट तयार करतात आणि कपडे, परफ्यूम आणि घराच्या सजावटीवर मोठ्या प्रमाणात सूट देण्याचा दावा करतात. जेव्हा आपण प्रत्यक्षात या वेबसाईटवररून एखादी वस्तू ऑर्डर करतो तेव्हा आपली फसवणूक केली जाते. कारण स्कॅमर्स आपल्याकडून पैसे घेतात आणि आपण ऑर्डर केलेली वस्तू देखील पाठवली जात नाही. गुगल, फेसबुक आणि इंस्टाग्रामवर 70-80% पर्यंत सूट देणाऱ्या जाहिराती दाखवल्या जातात. वापरकर्ते UPI, क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंगद्वारे पैसे देतात परंतु त्यांना त्यांचं प्रोडक्ट मिळत नाही.
स्कॅमर्स वेरीफाइड सोशल मीडिया अकाउंट्स हॅक करून बनावट जकात किंवा रमजान गिवअवे सुरु करतात. ते ब्लू टिक्स आणि AI ची मदत घेऊन युजर्सचा विश्वास संपादन करतात. युजर्सना डीएम किंवा पोस्टद्वारे रमजान स्पर्धेत सहभागी होण्यास सांगितले जाते. त्यांना मोठ्या बक्षीसाच्या बदल्यात वैयक्तिक माहिती भरण्यास सांगितले जाते किंवा थोडे पैसे देण्यास सांगितले जाते. तुमची माहिती हॅकर्सच्या हाती लागताच तुमची फसवणूक केली जाते.