6,000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेरा... असे आहेत Vivo च्या नव्या Smartphone चे फीचर्स, किंमत तुमच्या बजेटमध्ये
Vivo Y19s Pro स्मार्टफोन निवडक ग्लोबल मार्केट्समध्ये लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 4G सपोर्ट देण्यात आला आहे. याशिवाय Unisoc T612 चिपसेट देखील आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच या फोनची किंमत. तर विवोने लाँच केलेल्या या नवीन स्मार्टफोनची किंमत सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये आहे. नवीन स्मार्टफोन 6,000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेरा अशा कमाल फीचर्सनी सुसज्ज आहे. स्मार्टफोनची किंमत काय आहे, त्याचे फीचर्स काय आहेत, याबद्दल जाणून घेऊया.
Vivo Y19s Pro स्मार्टफोनटच्या बांग्लादेश आणि मलेशियामधील किंमती समोर आल्या आहेत. हा स्मार्टफोन तीन व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. ज्यामध्ये 4GB + 128GB, 6GB + 128GB आणि 8GB + 256GB यांचा समावेश आहे. Vivo Y19s Pro ची किंमत बांग्लादेशात 4GB + 128GB व्हेरिअंटसाठी BDT 15,499 म्हणजेच सुमारे 10,900 रुपये आणि 6GB + 128GB व्हेरिअंटसाठी BDT 16,999 म्हणजेच सुमारे 12,000 रुपये आहे. मलेशियामध्ये 6GB + 128GB व्हेरिअंटची किंमत MYR 499 म्हणजेच सुमारे 10,100 रुपये आणि 8GB + 256GB व्हेरिअंटची किंमत MYR 599 म्हणजेच सुमारे 12,100 रुपये आहे. हा स्मार्टफोन डायमंड ब्लॅक, ग्लेशियर ब्लू आणि पर्ल सिल्वर कलर ऑप्शनमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन ग्राहक ऑफिशियल रीजनल ई-स्टोर्समधून खरेदी करू शकतात. (फोटो सौजन्य – X)
Never compromise on the adventure😎
vivo Y19s Pro’s Anti-Drop Design brings Pro-level toughness!Learn More https://t.co/SsMAvg3Vcg pic.twitter.com/Tklm1ozFWD
— vivo Bangladesh (@BangladeshVivo) May 31, 2025
Vivo Y19s Pro मध्ये 6.68-इंच HD+ (720×1,608 पिक्सेल) LCD स्क्रीन आहे. ज्यामध्ये 90Hz रिफ्रेश रेट आणि1,000 निट्स पर्यंत ब्राइटनेस आहे. डिस्प्ले वेट टच टेक्नोलॉजी सपोर्ट करते आणि याला TÜV Rheinland लो ब्लू लाइट सर्टिफिकेशन मिळालं आहे. हँडसेटमध्ये 12nm ऑक्टा-कोर Unisoc T612 चिपसेट आहे, ज्याला 8GB पर्यंत LPDDR4X रॅम आणि 256GB पर्यंत eMMC 5.1 स्टोरेजसह जोडण्यात आलं आहे. हा Android 15-बेस्ड FuntouchOS 15 वर चालतो.
फोटोग्राफीसाठी, Vivo Y19s Pro मध्ये 50-मेगापिक्सेल मेन सेंसर (f/1.8 अपर्चर) आणि 0.08-मेगापिक्सल सेकेंडरी सेंसर (f/3.0 अपर्चर) देण्यात आलं आहे. फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 5-मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा सेंसर (f/2.2 अपर्चर) आहे. यामध्ये डुअल स्पीकर यूनिट आहे. सिक्योरिटीसाठी साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर देखील फोनमध्ये देण्यात आला आहे.
Vivo Y19s Pro मध्ये 6,000mAh बॅटरी आहे, जी 44W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. या हँडसेटमध्ये अनेक AI फीचर्स देण्यात आले आहेत. ज्यामध्ये Google चे सर्कल टू सर्च आणि AI स्क्रीन ट्रांसलेशन जसे प्रोडक्टिविटी टूल्स यांचा समावेश आहे.
तुमच्याही मोबाईलमध्ये येतेय नेटवर्क समस्या? Android आणि iPhone साठी फॉलो करा या Tech Tips
कनेक्टिविटी ऑप्शन्समध्ये डुअल 4G VoLTE, Wi-Fi, Bluetooth 5.2, GPS, OTG आणि USB Type-C पोर्ट समाविष्ट आहेत. यामध्ये IP64 रेटिंग, MIL-STD-810H मिलिट्री-ग्रेड ड्यूरेबिलिटी आणि SGS फाइव-स्टार ओवरऑल यूनिट ड्रॉप रेसिस्टेंस सर्टिफिकेशन आहे.