IPL 2025 Final: 18 वर्षांनतर विजेतेपद अन् Instagram अकाऊंट झालं क्रॅश! RCB फॅन्सच्या जल्लोषाने इंटरनेटही हादरलं
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांनी 18 वर्षांनी कमाल करत आयपीएल 2025 ची ट्रॉफी पटकावली आहे. जियोहॉटस्टारवर आयपीएल 2025 ची फायनल मॅच पाहणाऱ्यांच्या संख्येने सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. या विजयानंतर ना केवळ 18 वर्षांचा वनवास संपला तर इंटरनेट हादरवून टाकलं. पंजाब किंग्ज विरोधात आरसीबीने मिळवलेल्या विजयानंतर इंस्टाग्रामवर इतक्या पोस्ट शेअर करण्यात आल्या की टीमचे ऑफिशियल इंस्टाग्राम अकाऊंट क्रॅश झाले होते. ज्यामुळे पोस्ट लोड होत नव्हत्या. याबाबत अॅडमीनने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट शेअर करत माहिती दिली.
आरसीबीच्या विजयानंतर फॅन्सनी इंस्टाग्रामवर प्रचंड पोस्ट शेअर केल्या, ज्यामध्ये टीमचे ऑफिशियल इंस्टाग्राम अकाऊंट टॅग करण्यात आलं होतं. शिवाय अकाऊंटची फॉलोवर्स संख्या देखील क्षणभरात प्रचंड वाढली. यामुळे काही वेळासाठी अकाऊंट क्रॅश झाले होते. ज्यामुळे कोणत्याही पोस्ट लोड होत नव्हत्या. (फोटो सौजन्य – X)
RCB च्या सोशल मीडिया अॅडमीनने लगेच X वर इंस्टाग्राम पेजचा स्क्रीनशॉट शेअर केला आणि कॅप्शनमध्ये सांगितलं होतं की, आम्ही खरंच इंस्टाग्राम क्रॅश केलं आहे. ही पोस्टवर प्रचंड व्हायरल झाली. या पोस्टवर देखील आरसीबी फॅन्सनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. 20.8 मिलियन फॉलोअर्स असलेल्या संघाच्या इंस्टाग्राम हँडलवर अभिनंदनचे संदेश, विराट कोहलीच्या भावनिक रिअॅक्शनचे क्लिप्स आणि स्टेडियममधील आनंदाचे क्षण पाहायला मिळत आहे, ज्यामुळे प्लॅटफॉर्मचे सर्व्हर काही काळ ठप्प झाले.
WE’VE LITERALLY CRASHED INSTAGRAM.
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) June 3, 2025
इंस्टाग्राम अकाउंट क्रॅश झाल्याची पोस्ट शेअर केल्यानंतर आरसीबीने त्यांच्या अकाऊंटवरून आणखी एक पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये लिहीलं होतं की, आम्ही देशाला रांग रंगाने रंगवलं आहे. सोशल मीडियावर आरसीबी फॅन्सनी धुमाकूळ घातला होता. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर #CongratulationsRCB ट्रेंड करत होतं.
18 वर्षानंतर मिळालेल्या या विजयाचा आनंद सर्व खेळाडू आणि चाहत्यांनी साजरा केला. या विजयाचे काही फोटो विराट कोहलीने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. या फोटोंना केवळ 7 मिनिटांत 1 मिलीयन लाईक्स मिळाले आहेत. शिवाय चांहत्यांनी या फोटोंवर कमेंट देखील केल्या आहेत.
इंस्टाग्राम क्रॅश, चाहत्यांच्या शुभेच्छांचा वर्षाव यासोबतच आरसीबीने JioHotstar वर रेकॉर्डतोड व्यूअरशिप मिळवली आहे. जियोहॉटस्टारवर आयपीएल 2025 ची फायनल मॅच पाहणाऱ्यांच्या संख्येने सर्व रेकॉर्ड तोडले आहेत, ज्यामुळे हा सामना आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक पाहिलेल्या सामन्यांपैकी एक बनला. शेवटच्या ओवर्समध्ये जिओहॉटस्टारवरील व्ह्यूअरशिप 60 कोटींपेक्षा जास्त झाली.