तुमच्याही मोबाईलमध्ये येतेय नेटवर्क समस्या? Android आणि iPhone साठी फॉलो करा या Tech Tips
जेव्हा तुम्ही एखाद्या ठिकाणी फिरायला गेला असाल आणि तुमच्या मोबाईलचं नेटवर्क अचानक गेलं तर? मोबाईलमध्ये नेटवर्क नसेल तर अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. तुम्ही कॉल करू शकत नाही, मेसेज नाही किंवा गुगलचा वापर करू शकत नाही. एवढंच काय तर तुम्ही एखाद्या अनोळखी ठिकाणी असाल तर गुगल मॅपचा देखील वापर करू शकत नाही. अशावेळी नेमकं काय करावं असा प्रश्न निर्माण होतो. या लेखात आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत, ज्या तुमची नेटवर्क समस्या सोडवण्यासाठी मदत करू शकतात.
JioHotstar वर IPL 2025 ची फायनल मॅच FREE मध्ये पहायची आहे? आत्ताच करा हा ‘जुगाड’
नेटवर्क समस्या सोडवण्याची सर्वात सोपी पद्धत आहे एयरप्लेन मोड ऑन करा आणि काही सेकंदांनी बंद करा. यामुळे तुमच्या फोनचं हरवलेलं नेवटर्क पुन्हा एकदा कनेक्ट होतं. एवढंच नाही तर यामुळे आधीपेक्षा उत्तम सिग्नल मिळतो. Android मध्ये स्क्रिन खाली स्लाइड करा आणि एयरप्लेन आयकॉनवर टॅप करा. आता 15 सेकंद थांबा आणि त्यानंतर एयरप्लेन मोड बंद करण्यासाठी पुन्हा एकदा टॅप करा. आयफोनवर, स्क्रीन वरच्या उजव्या कोपऱ्यातून खाली स्लाइड करा, एअरप्लेन आयकॉनवर टॅप करा (ते चालू असताना केशरी रंगाचा दिसेल), नंतर ते बंद करण्यासाठी 15 सेकंदांनी पुन्हा टॅप करा. (फोटो सौजन्य – Pinterest)
एयरप्लेन मोड ऑन-ऑफ केल्यानंतर देखील नेटवर्क समस्या सुटली नसेल तर नेटवर्क सेटिंग्स रीसेट करा. यामुळे Wi-Fi पासवर्ड्स, Bluetooth पेयरिंग्स आणि VPN सेटिंग्स डिलीट होणार आहे. Android मध्ये Settings मध्ये जा, “Reset network settings” किंवा “Reset Wi-Fi, mobile & Bluetooth” ऑप्शन निवडा. iPhone मध्ये Settings > General > Transfer or Reset iPhone > Reset > Reset Network Settings या स्टेप्स फॉलो करा.
कॅरियर किंवा सॉफ्टवेयर अपडेटमुळे देखील नेटवर्क समस्या निर्माण होते. नेटवर्क प्रोवाइडर वेळोवेळी कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी अपडेट पाठवतात. हे अपडेट तपासा. iPhone वर जर कोणतं अपडेट उपलब्ध असेल तर तुम्हाला नोटिफिकेशन पाठवली जाईल. किंवा Settings > General > About या स्टेप्स फॉलो करून तुम्ही मॅन्युअली देखील तपासू शकता. अँड्रॉइडवर Settings > Network & Internet > Carrier Settings या स्टेप्स फॉलो करून तुम्ही मॅन्युअली अपडेट तपासू शकता.
काहीवेळा फोन रिस्टार्ट केल्याने देखील नेटवर्क समस्या सोडवली जाऊ शकते. Android मध्ये तुम्ही पावर बटन काही वेळ प्रेस करून ठेवल्यास Restart चा ऑप्शन येतो. त्यावर टॅप करा. आयफोनवर पॉवर स्लायडर दिसेपर्यंत साइड बटण आणि व्हॉल्यूम बटणांपैकी एक एकाच वेळी दाबा आणि धरून ठेवा. आता फोन बंद करा, नंतर चालू करण्यासाठी पुन्हा साइड बटण दाबा.
शेवटचा उपाय म्हणजे सिम कार्ड काढून पुन्हा घालणे. यामुळे फोन नेटवर्कशी पुन्हा कनेक्ट करण्याचा प्रयत्न करेल. जर सिम कार्ड खराब झालेले दिसत असेल, तर नवीन ऑर्डर करणे चांगले.