12GB रॅम आणि 50MP कॅमेऱ्यासह लाँच झाला Vivo Y300c, किंमत 17 हजारांहून कमी! असे आहेत स्पेसिफिकेशन्स
गेल्या काही दिवसांपासून विवो सतत नवीन स्मार्टफोन लाँच करत आहे. आता देखील कंपनीने त्यांचा एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. हा स्मार्टफोन बजेट डिव्हाईस आहे. नवीन स्मार्टफोन कंपनीने Vivo Y300c या नावाने लाँच केला आहे. कंपनीने सध्या हा स्मार्टफोन केवळ होम टाउन चीनमध्ये लाँच केला आहे.
लवकरच हा स्मार्टफोन भारतात देखील लाँच केला जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र अद्याप या स्मार्टफोनची भारतातील लाँच डेट जाहीर करण्यात आली नाही. वीवो Y सीरीजचा हा नवीन आणि बजेट स्मार्टफोन मीडियाटेक 6300 चिपसेटने सुसज्ज आहे. या स्मार्टफोनमध्ये 12GB रॅम आणि 512GB पर्यंत स्टोरेज देण्यात आलं आहे. हा स्मार्टफोन तीन कलर व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. (फोटो सौजन्य – X)
स्मार्टफोन दोन स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. ज्यामध्ये 12GB रॅम + 256GB स्टोरेज आणि 12GB रॅम + 512GB स्टोरेज यांचा समावेश आहे. या स्मार्टफोनच्या 12GB रॅम + 256GB स्टोरेज मॉडेलची किंमत CNY 1,399 म्हणजेच सुमारे 16,000 रुपये आणि 12GB रॅम + 512GB स्टोरेज मॉडेलची किंमत CNY 1,599 म्हणजेच सुमारे 19,000 रुपये आहे. हा स्मार्टफोन ग्रीन पाइन, स्नो व्हाइट आणि स्टार डायमंड ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. चीनमध्ये हे डिव्हाईस वीवो वेबसाइटद्वारे खरेदी केले जाऊ शकते. हा स्मार्टफोन ग्लोबल मार्केटमध्ये कधी लाँच केला जाणार आहे, याबाबत अद्याप कंपनीने कोणतीही माहिती दिली नाही.
नवीन स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर हे डिव्हाईस अँड्रॉइड 15 वर बेस्ड OriginOS 5 सह लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.77-इंचाचा फुल-एचडी OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट वाला डिस्प्ले आहे, ज्यामध्ये 800 निट्स पीक ब्राइटनेस आणि 130Hz पर्यंत टच सँपलिंग रेट देण्यात आला आहे. डिव्हाईसमध्ये पावरसाठी मीडियाटेक 6300 सह 12GB LPDDR4X रॅम आणि 512GB पर्यंत UFS2.2 स्टोरेज देण्यात आलं आहे.
Vivo चा हा नवीन डिव्हाईस डुअल रियर कॅमेऱ्याने सुसज्ज आहे. यामध्ये f/1.8 अपर्चर वाला 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आणि f/2.4 अपर्चर वाला 2-मेगापिक्सेलचा ब्लर कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फीसाठी डिव्हाईसमध्ये 8-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
कनेक्टिविटीसाठी फोनमध्ये ब्लूटूथ 5.4, GPS, AGPS, Beidou, OTG, Wi-Fi, GLONASS, Galileo, QZSS आणि USB टाइप-C पोर्ट देण्यात आला आहे. फोनमध्ये ई-कंपास, जायरोस्कोप, ग्रेविटी सेंसर, लाइट सेंसर आणि प्रॉक्सिमिटी सेंसर देखील दिला आहे. फोनमध्ये बायोमेट्रिक ऑथेंटिकेशनसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. याशिवाय हा फोन फेस अनलॉकला देखील सपोर्ट करतो.