Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 19 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नव्या Vivo स्मार्टफोनची भारतात तुफानी एंट्री! 7200mAh बॅटरी अन् स्नॅपड्रॅगन प्रोसेसरसह मिळणार ‘हे’ पावरफुल फीचर्स

Vivo Y31T 5G Launched: विवोने एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीने या स्मार्टफोनची किंमत अद्याप जाहीर केली नाही. कंपनीने लाँच केलेल्या नवीन स्मार्टफोनमध्ये 6.75-इंच 120Hz डिस्प्ले आणि स्नॅपड्रॅगन 4 जेन 2 चिपसेट दिला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 19, 2026 | 02:10 PM
नव्या Vivo स्मार्टफोनची भारतात तुफानी एंट्री! 7200mAh बॅटरी अन् स्नॅपड्रॅगन प्रोसेसरसह मिळणार 'हे' पावरफुल फीचर्स

नव्या Vivo स्मार्टफोनची भारतात तुफानी एंट्री! 7200mAh बॅटरी अन् स्नॅपड्रॅगन प्रोसेसरसह मिळणार 'हे' पावरफुल फीचर्स

Follow Us
Follow Us:
  • Vivo Y31T 5G तीन रॅम-स्टोरेज व्हेरिअंटमध्ये आला असून, फोनची अधिकृत किंमत अद्याप समोर आलेली नाही.
  • 6.75-इंच 120Hz डिस्प्ले आणि स्नॅपड्रॅगन 4 जेन 2 चिपसेटसह फोनमध्ये 50MP ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.
  • 7200mAh बॅटरी आणि 44W फास्ट चार्जिंगसोबत फोनमध्ये एआई इरेजर, एआई कॅप्शन, एआई ट्रांसक्रिप्ट असिस्ट आणि IP68/IP69 रेटिंग मिळते.
Vivo Smartphone Launched: टेक कंपनी विवोने भारतात त्यांचा एक नवीन मिड-रेंज 5G स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीचा हा नवीन स्मार्टफोन Vivo Y31T 5G या नावाने सादर करण्यात आला आहे. कंपनीने कोणत्याही मोठ्या लाँच ईव्हेंटशिवाय त्यांचा हा नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. हा स्मार्टफोन कंपनीच्या वेबसाईटवर देखील लिस्ट करण्यात आला आहे. स्मार्टफोनची किंमत किती आहे आणि कंपनीने त्यांच्या या नवीन स्मार्टफोनमध्ये कोणते फीचर्स दिले आहेत, याबाबत आता जाणून घेऊया.

OpenAI चे किशोरांसाठी खास सरप्राईज! 18 वर्षांखालील मुलांसाठी लाँच केले ChatGPT for Teens, जाणून घ्या फीचर्स

Vivo Y31T 5G ची किंमत

विवोने त्यांचा नवीन स्मार्टफोन 3 रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच केला आहे. ज्यामध्ये 4GB+128GB, 6GB+128GB आणि 6GB+256GB यांचा समावेश आहे. कंपनीने अद्याप या स्मार्टफोनची किंमत जाहीर केली नाही. ग्राहक हा नवीन स्मार्टफोन फेस्टिव रेड, सीशोर ग्रीन आणि नोबल गोल्ड रंगांच्या पर्यायांत खरेदी करू शकतात. (फोटो सौजन्य: Pinterest)
Smartphone Launched:

Vivo Y31T 5G चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

डिस्प्ले

विवोने लाँच केलेल्या नव्या स्मार्टफोनमध्ये 6.75 इंच एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. यासोबतच या स्मार्टफोनमध्ये 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट सपोर्ट देखील देण्यात आला आहे. स्क्रीनची पीक ब्राइटनेस 1250 निट्सपर्यंत वाढवली जाऊ शकते आणि हे 83 टक्के एनटीएससी कलर गॅमट कवर करते. याशिवाय, डिस्प्लेला TÜV ऱ्हाइनलँड लो ब्लू लाईट सर्टिफिकेशन देखील मिळाले आहे.

चिपसेट

परफॉर्मंससाठी या स्मार्टफोनमध्ये 4nm प्रोसेसवर तयार करण्यात आलेला दमदार स्नॅपड्रॅगन 4 जेन 2 चिपसेट मिळणार आहे. यासोबतच फोनमध्ये ऑक्टा-कोर सीपीयू मिळणार आहे, ज्याची कमाल क्लॉक स्पीड 2.2GHz आहे. या डिव्हाईसमध्ये एलपीडीडीआर4एक्स रॅम आणि यूएफएस 3.1 स्टोरेज मिळणार आहे. याशिवाय, डिव्हाईसमध्ये एक्सटेंडेड रॅम फीचर देखील मिळणार आहे, ज्याच्या मदतीने 6GB पर्यंत जास्तीची रॅम देखील मिळणार आहे.

कॅमेरा

फोटोग्राफी लवर्ससाठी फोनमध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप मिळणार आहे. या फोनमध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 2MP चा बोकॅह सेंसर मिळणार आहे. स्मार्टफोनच्या समोरील बाजूला सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 8MP चा फ्रंट कॅमेरा दिला आहे.

बॅटरी

फोनमध्ये 44W फ्लॅशचार्ज फास्ट चार्जिंग सपोर्टसह 7200mAh बॅटरी दिली आहे. कंपनीच्या लॅब चाचण्यांनुसार, हा फोन 62 तासांपर्यंत म्युझिक प्लेबॅक, 32 तासांपर्यंत व्हिडिओ प्लेबॅक, 10.2 तास नेव्हिगेशन आणि 11.4 तास गेमिंगची सुविधा देऊ शकतो.

लिक्विड कूलिंग सिस्टिमसह नवा iQOO स्मार्टफोन लाँच! स्टायलिश डिझाईन जिंकणार यूजर्सचं मन, किंमत ऐकून व्हाल थक्क

एआय फीचर्स

डिव्हाईसमध्ये ओरिजीनओएस 6 मिळणार आहे, जो अँड्रॉईड 16 वर आधारित आहे. यासोबतच या डिव्हाईसमध्ये एआय इरेज, एआय कॅप्शन्स, एआय ट्रान्सक्रिप्ट असिस्ट आणि एआय क्रिएशन सारखे एआय फीचर्स देखील मिळणार आहेत. फोनमध्ये एआय सुपरलिंक कनेक्टिविटी फीचर देखील मिळणार आहे. याशिवाय डिव्हाईसमध्ये पाणी आणि धुळीपासून सुरक्षेसाठी IP68 आणि IP69 रेटिंग दिली आहे.

Web Title: Vivo y31t 5g launched in india with 7200mah battery and powerful features tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 19, 2026 | 02:10 PM

Topics:  

  • smartphone
  • tech launch
  • vivo

संबंधित बातम्या

अरे देवा! ‘या’ Samsung स्मार्टफोन्सच्या वाढल्या किंंमती, Xiaomi नेही ग्राहकांना दिला धक्का… बजेटवर होणार थेट परिणाम
1

अरे देवा! ‘या’ Samsung स्मार्टफोन्सच्या वाढल्या किंंमती, Xiaomi नेही ग्राहकांना दिला धक्का… बजेटवर होणार थेट परिणाम

लिक्विड कूलिंग सिस्टिमसह नवा iQOO स्मार्टफोन लाँच! स्टायलिश डिझाईन जिंकणार यूजर्सचं मन, किंमत ऐकून व्हाल थक्क
2

लिक्विड कूलिंग सिस्टिमसह नवा iQOO स्मार्टफोन लाँच! स्टायलिश डिझाईन जिंकणार यूजर्सचं मन, किंमत ऐकून व्हाल थक्क

6,500mAh बॅटरी अन् 50MP कॅमेरा… Pova च्या नव्या स्मार्टफोनचा धमाका, जाणून घ्या फीचर्स आणि किंमती
3

6,500mAh बॅटरी अन् 50MP कॅमेरा… Pova च्या नव्या स्मार्टफोनचा धमाका, जाणून घ्या फीचर्स आणि किंमती

OnePlus स्मार्टफोन्स महागले! तब्बल 4 हजार रुपयांनी वाढली किंमत, ग्राहकांना बसणार महागाईचा फटका
4

OnePlus स्मार्टफोन्स महागले! तब्बल 4 हजार रुपयांनी वाढली किंमत, ग्राहकांना बसणार महागाईचा फटका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.