
Vivo Y500i: किंमत कमी, परफॉर्मन्स भारी! तगडी बॅटरी लाईफ आणि दमदार प्रोसेसरने सुसज्ज... वाचा स्पेसिफिकेशन्स
कंपनीने लाँच केलेल्या नवीन स्मार्टफोनच्या किंमतीबद्दल बोलायचं झालं तर या डिव्हाईसची किंमत 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज वाल्या बेस व्हेरिअंटसाठी CNY 1,499 म्हणजेच सुमारे 19,000 रुपये आहे. तसेच डिव्हाईसच्या 8GB+256GB व्हेरिअंटची किंमत CNY 1,799 म्हणजेच सुमारे 23,000 रुपये, 8GB+512GB व्हेरिअंटची किंमत CNY 1,999 म्हणजेच सुमारे 26,000 रुपये आणि 12GB+256GB व्हेरिअंटची किंमत CNY 1,999 म्हणजेच सुमारे 26,000 रुपये आहे. टॉप व्हेरिअंटची किंमत CNY 2,199 म्हणजेच सुमारे 28,000 रुपये आहे. टॉप व्हेरिअंट 12GB रॅम आणि 512GB स्टोरेज पर्यायात उपलब्ध आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
नव्या स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर Vivo Y500i मध्ये 6.75-इंच LCD स्क्रीन आणि 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट सपोर्ट देण्यात आला आहे. यासोबतच डिव्हाईसमध्ये डुअल सिम स्लॉट आणि Android 16-बेस्ड OriginOS 6 उपलब्ध आहे. कंपनीच्या नवीन स्मार्टफोनमध्ये क्वालकॉमचा ऑक्टा कोर 4nm स्नॅपड्रॅगन 4 Gen 2 चिपसेट देखील आहे, ज्यामध्ये दोन परफॉर्मेंस कोर आहे. जो 2.2GHz ची क्लॉक स्पीड ऑफर करतात, तर 6 एफिशिएंसी कोर आहे, जो 1.95GHz क्लॉक स्पीड देतो. कंपनीने लाँच केलेल्या या डिव्हाईसमध्ये एड्रेनो 613 GPU देखील आहे.
फोटोग्राफीसाठी या डिव्हाईसमध्ये सिंगल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये f/1.8 अपर्चर, 10x डिजिटल झूम आणि ऑटोफोकससह 50-मेगापिक्सेलचा CMOS सेंसर देखील देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये खास f/2.2 अपर्चरवाला 5-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे. एवढंच नाही तर या डिव्हाईसमध्ये धूळ आणि पाण्याच्या संरक्षणासाठी IP68 + IP69 रेटिंग ऑफर केली आहे. याशिवाय या फोनमध्ये कनेक्टिविटीसाठी 5G सपोर्ट देण्यात आला आहे. Vivo Y500i मध्ये 44W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्टसह 7,200mAh बॅटरी देण्यात आली आहे.
Ans: होय. Vivo चे अनेक स्मार्टफोन भारतात “Make in India” अंतर्गत तयार केले जातात.
Ans: होय. Vivo स्मार्टफोन्स त्यांच्या उत्कृष्ट कॅमेरा क्वालिटीसाठी ओळखले जातात, विशेषतः पोर्ट्रेट आणि लो-लाइट फोटोग्राफीसाठी.
Ans: Vivo स्मार्टफोन्समध्ये Android आधारित Funtouch OS (काही मॉडेल्समध्ये OriginOS) वापरला जातो.