BSNL Recharge Plan: एकदाच रिचार्ज, वर्षभर निवांत! नव्या प्लॅनमध्ये मिळणार अनलिमिटेड कॉलिंग आणि 3GB डेटा... किंमत केवळ इतकी
हा प्लॅन यूजर्ससाठी अतिशय खास असणार आहे, कारण या प्लॅनमध्ये 365 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाणार आहे. त्यामुळे यूजर्सना वर्षभर रिचार्ज प्लॅनची चिंता करण्याची गरज नाही. वर्षभराची व्हॅलिडीटी असणाऱ्या या रिचार्ज प्लॅनमध्ये यूजर्सना रोज 3GB हाय-स्पीड डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देखील दिली जाणार आहे. बीएसएनएलने दावा केला आहे की, हा प्लॅन खास अशा यूजर्ससाठी सादर करण्यात आला आहे, ज्यांना वारंवार रिचार्ज करण्याचा कंटाळा येतो आणि यूजर्सना कोणत्याही समस्येशिवाय डेटा आणि कॉलिंग सर्विसचा फायदा घ्यायचा असतो. या प्लॅनची किंमत किती असणार आहे, या प्लॅनमध्यो कोणते फायदे ऑफर केले जाणार, याबाबत जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)
बीएसएनएलच्या वर्षभराची व्हॅलिडीटी ऑफर करणाऱ्या रिचार्ज प्लॅनची किंमत 2799 रुपये आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना रोज 3GB हाय-स्पीड डेटा ऑफर केले जाणार आहे. या प्लॅनमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग देखील समााविष्ट असणार आहे. याशिवाय, तुम्ही या प्लॅनसह दररोज 100 एसएमएस पाठवू शकता. कंपनीचं असं म्हणणं आहे की, हा प्लॅन विशेषत: अशा यूजर्ससाठी सुरु करण्यात आला आहे, ज्यांना जास्त डेटाची गरज आहे. या प्लॅनची दिर्घकाळ व्हॅलिडिटी ऑफर करण्यात आली आहे.
म्हणजेच या प्लॅनमध्ये 365 दिवसांची व्हॅलिडिटी उपलब्ध आहे. बीएसएनएल कंपनीचा हा प्लॅन फ्रीझ द प्राईस, फ्युएल द इअर या टॅगलाईनसह प्रमोट करत आहे. कंपनीचे म्हणणे आहे की जगभरातील टेलिकॉम कंपन्या त्यांच्या रिचार्ज प्लॅनच्या किमती वाढवत असताना, बीएसएनएल त्यांच्या ग्राहकांना स्थिर आणि किफायतशीर प्लॅन देत आहे. या प्लॅनसह, यूजर्सना संपूर्ण वर्षभर समान किमतीत डेटा, कॉलिंग आणि मेसेजिंगचे फायदे मिळतील.
Ans: जवळच्या BSNL कस्टमर केअर सेंटरमध्ये जाऊन KYC करून नवीन सिम घेता येते.
Ans: होय. BSNL कडे प्रीपेड आणि पोस्टपेड दोन्ही प्रकारचे प्लॅन्स उपलब्ध आहेत.
Ans: सध्या BSNL 5G सेवा उपलब्ध नाही. मात्र 4G नेटवर्कचे विस्तार आणि 5G ट्रायल्स सुरू आहेत.






