
Weather Alert Apps: अचानक बदलतंय हवामान! चिंता सोडा, आत्ताच डाऊनलोड करा हे अॅप... क्षणोक्षणी मिळणार लाईव्ह अलर्ट्स
चुकीच्या नंबरवर रिचार्ज झाला? घाबरू नका, Reliance Jio चं नवं फीचर देईल तुमचे पैसे परत
हे अॅप केवळ तापमान सांगण्यापुरते मर्यादित नाही, तर यामध्ये लोकेशन आधारित हवामानसंबंधित प्रत्येक महत्त्वाची माहिती शेअर केली जाते. यामध्ये पाऊस, वादळ आणि उष्णता यांसारख्या परिस्थितीबाबत अचून माहिती थेट तुमच्या फोनवर शेअर केली जाते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या अॅपमधील डेटा सतत अपडेट केला जातो. ज्यामुळे प्रत्येक बदलत्या हवामानासाठी तुम्ही सज्ज राहू शकता. (फोटो सौजन्य – Pinterest)
या अॅपमध्ये असं देखील एक फीचर आहे, जे तुम्हाला फील्स लाइक तापमान सांगतं. म्हणजेच प्रत्यक्ष हवामान कसे असते. याशिवाय येणाऱ्या दिवसांत हवामान कसे असू शकते, याबाबत देखील अंदाज वर्तवला जातो. यामुळे नागरिक त्यांच्या प्रवासाचे किंवा कामाचे नियोजन करू शकतात.
भारतीय हवामान विभागाच्या या अॅपचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे अलर्ट सिस्टम. तुमच्या परिसरासाठी जेव्हा हवामानाबाबत कोणताही इशारा जारी केला जातो, त्याचवेळी तुम्हाला फोनमध्ये तात्काळ नोटिफिकेशन मिळते. मुसळधार पाऊस असो किंवा उष्णतेची लाट, तुम्हाला याबाबत आधीच माहिती मिळणार आहे, ज्यामुळे तुम्ही तुमची सुरक्षा वाढवू शकता.
या अँपचा वापर करण्याची प्रोसेस अतिशय सोपी आहे. अँड्राईड युजर्स गूगल प्ले स्टोअरवर आणि अॅपल युजर अॅपल अॅप स्टोअरवर Mausam IMD सर्च करून हे ॲप त्यांच्या फोनमधे डाउनलोड करू शकतात. इंस्टॉल केल्यानंतर जेव्हा तुम्ही अॅप ओपन करता तुम्हाला लोकेशन आणि नॉटिफिकेशनची परवानगी द्यावी लागणार आहे. यानंतर सेटिंगमध्ये जाऊन हवामानासंबंधित अलर्ट, पाऊस आणि उन्हासंबंधित नॉटिफिकेशन चालू करा. आता तुम्हाला वेळोवेळी तुमच्या परिसरातील हवामानविषयी माहिती मिळणार आहे.
आजच्या काळात हवामानाचा अंदाज लावणं अतिशय कठीण आहे. कधी अचानक पाऊस तर कधी अचानक ऊन. यामुळे तुमच्या रोजच्या जीवनात फार मोठा फरक पडतो. अशावेळी हे अॅप तुमच्यासाठी गरजेचा आहे. हे अॅप तुमच्यासाठी एक पर्सनल वेदर असिस्टेंट प्रमाणे काम करते आणि वेळोवेळी तुम्हाला महत्वाचे अपडेट्स देते.