चुकीच्या नंबरवर रिचार्ज झाला? घाबरू नका, Reliance Jio चं नवं फीचर देईल तुमचे पैसे परत
कारण भारतातील आघाडीची टेलिकॉम कंपनी रिलायंस जियो त्यांच्या यूजर्ससाठी एक खास फीचर घेऊन आली आहे. या फीचरअंतर्गत चुकीच्या नंबरवर रिचार्ज झाल्यास यूजर्सना त्यांचे पैसे परत मिळणार आहेत. याला तुम्ही एखादा हॅक किंवा ट्रिक बोलू शकता. ज्याच्या मदतीने चुकीच्या नंबरवर रिचार्ज झाल्यास एका मर्यादित वेळेपर्यंत तुम्हाला तुमचे पैसे रिफंड मिळणार आहेत. यामुळे तुम्हाला कोणत्याही नुकसानाला सामोरे जावे लागणार नाही आणि तुमचे पैसे देखील वाया जाणार नाहीत. (फोटो सौजन्य – Pinterest)
जिओच्या या फिचरचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही चुकून ज्या व्यक्तिच्या नंबरवर रिचार्ज केला आहे, त्या व्यक्तीला नं सांगता तुम्हाला तुमचा रिफंड मिळणार आहे. यासाठी कंपनीने एक अट ठेवली आहे. कंपनीची अट अशी आहे की, हा रिचार्ज MyJio वरून केला पाहिजे. जर तुम्ही पेटीएम, फोनपे किंवा गूगल पे सारख्या इतर कोणत्याही ॲपद्वारे चुकीचा रिचार्ज केल्यास, तुम्हाला तुमचे पैसे परत मिळवण्याची सुविधा मिळत नाही. त्यामुळे जिओ यूजर्स नेहमी लक्षात ठेवा की, MyJio वरून रिचार्ज केल्यास तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो.






