JIO Recharge Plan: OTT पाहणाऱ्यांसाठी बेस्ट डील! जिओच्या या ऑफर्सने मनोरंजन होणार डबल, खर्च करावे लागणार केवळ इतके रुपये
जिओच्या पोर्टफोलिओमध्ये 175 रुपयांचा एक प्रीपेड रिचार्ज प्लॅन उपलब्ध आहे. या रिचार्ज प्लॅनमध्ये 28 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाते. या प्लॅनमध्ये 10GB हाय-स्पीड डेटा आणि जियोटीवी अॅपद्वारे 12 प्रीमियम ओटीटी अॅप्लिकेशनचा अॅक्सेस उपलब्ध आहे. हा अॅड ऑन पॅकच्या स्वरुपात डिझाईन करण्यात आला आहे. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड वॉइस कॉलिंगसाठी आधीच एक अॅक्टिव्ह बेस प्लॅन असणं गरजेचं आहे. यामध्ये सोनी लिव, जी5, जियो टीवी, लायंसगेट प्ले, डिस्कवरी+, सनएनएक्सटी, कांचा लन्नका, प्लॅनेट मराठी, चौपाल आणि होइचोई सह 10 ओटीटी अॅप्स उपलब्ध आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
जिओच्या 445 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनची व्हॅलिडीटी 28 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये रोज 2GB डेटा, अनलिमिटेड व्हॉईस कॉल आणि 100 एसएमएसची सुविधा दिली जाते. या प्लॅनमध्ये जिओटीव्हि द्वारे 10 हून अधिक ओटीटी प्लॅटफॉर्म्स (सोनी लिव, जी5 आणि जिओ टीव्हीसह) चा मोफत अॅक्सेस आणि अनलिमिटेड 5G डेटाचे फायदे समाविष्ट आहेत. हा डेटा प्लॅन आहे आणि या प्लॅनमध्ये देखील
जिओ स्पेशल ऑफरचे फायदे दिले जातात. प्लॅनमध्ये सोनी लिव, जी5, जियो टीवी, लायंसगेट प्ले, डिस्कवरी+, सनएनएक्सटी, कांचा लन्नका, प्लॅनेट मराठी, चौपाल, फनकोड आणि होइचोईचा अॅक्सेस दिला जातो. हे 18 महिन्यांसाठी गुगल जेमिनीच्या प्रो-प्लॅनचा लाभ देखील देते.
Republic Day 2026: प्रजासत्ताक दिनी Google ने सादर केलं स्पेशल डूडल, ISRO च्या कामगिरींनी वेधलं लक्ष
जिओच्या 500 रुपयांच्या या प्लॅनची व्हॅलिडीटी देखील 28 दिवसांची आहे. या रिचार्ज प्लॅनमध्ये अनलिमिटेड 5जी डेटा, रोज 2जीबी डेटा, सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि 100 एसएमएस रोज मिळतात. यामध्ये ग्राहकांना ओटीटी फायदे मिळतात. ज्यामध्ये यूट्यूब प्रीमियम, जियो हॉटस्टार (टीवी/मोबाइल), प्राइम व्हिडीओ मोबाइल एडिशन, सोनी लिव, जी5, जियो टीवी, लायंसगेट प्ले, डिस्कवरी+, सनएनएक्सटी, कांचा लन्नका, प्लॅनेट मराठी, चौपाल, फनकोड आणि होइचोईचा अॅक्सेस समाविष्ट आहे. या प्लॅनमध्ये जिओ क्लाउडचा अॅक्सेस आणि जिओ होमचा दोन महिन्यांचा मोफत ट्रायल देखील आहे. गुगल जेमिनी प्रो प्लॅनचा अॅक्सेस देखील समाविष्ट आहे.






