
भारत सरकार लवकरच जारी करणार नवीन CNAP सिस्टिम! कॉलिंगमध्ये होणार मोठा बदल, जाणून घ्या सविस्तर
सर्वात महत्त्वाची आणि विशेष गोष्ट म्हणजे ही सिस्टिम युजर्सना अगदी Truecaller सारख्या सुविधा देणार आहे. फरक केवळ इतका असणार आहे की, ही सिस्टिम पूर्णपणे सरकारी व्हेरिफाईड आणि टेलीकॉम नेटवर्कद्वारे जोडलेल्या सिस्टिमवर काम करणार आहे. सरकारची ही नवीन CNAP सिस्टिम नक्की काय आहे आणि यूजर्सना त्याचा कशा पद्धतीने फायदा होणार आहे, याबाबत आता जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)
आतापर्यंत जर तुम्हाला एखाद्या अनोळखी नंबरवरून कॉल आला तर तुमच्या फोनच्या स्क्रीनवर केवळ त्या व्यक्तीचा नंबर दिसत होता. त्यामुळे या नंबरची ओळख पटवण्यासाठी बरेच लोकं Truecaller सारख्या अॅप्सचा वापर करत होते. जेव्हा आपण Truecaller वर एखाद्या व्यक्तिचा नंबर सर्च करतो तेव्हा आपल्याला त्या नंबरबाबत माहिती मिळते. जसे त्या व्यक्तीचे नाव किंवा नंबर स्पॅम आहे की नाही, इत्यादी. मात्र नवीन CNAP सिस्टिम जारी केल्यानंतर तुम्हाला Truecaller सारख्या अॅप्सचा वापर करण्याची गरज भासणार नाही. या अॅप्सचा वापर न करता देखील यूजर्स अनोळखी नंबरची माहिती शोधू शकणार आहेत.
सरकारने नवीन CNAP सिस्टिम जारी केल्यानंतर तुम्हाला एखाद्या अनोळखी नंबरवरून कॉल आला तर तुम्हाला त्या नंबरसोबत जोडण्यात आलेला रजिस्ट्रेशनवालं खरं नाव स्क्रीनवर दिसणार आहे. म्हणजे सिम खरेदी करताना डॉक्यूमेंट्समध्ये दाखल करण्यात आलेलं नाव अनोळखी नंबरसमोर दिसणार आहे. सोप्या शब्दांत सांगायचे तर, आता कॉलरची ओळख वापरकर्त्याच्या डेटावर आधारित नाही, तर दूरसंचार कंपन्यांच्या अधिकृत नोंदींवर आधारित असेल.
या नवीन सिस्टिमच्या चाचणीदरम्यान काही यूजर्सना त्यांच्या स्क्रीनवर अनोळखी नंबरसाठी दोन नावं दिसत होती. जसं की कॉल आल्यानंतर आधी स्क्रीनवर एक नाव दिसत होतं आणि काही सेकंदांनंतर यूजर्सना दुसर नावं दिसत होतं. कारण नेटवर्कवरील सरकारने नोंदणीकृत नाव प्रथम दिसते आणि त्यानंतर तुमच्या संपर्क यादीत सेव्ह केलेले नाव येते. यामुळे काही यूजर्समध्ये गोंधळ देखील निर्माण झाला होता.