Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tech Tips: Megapixel नक्की काय असतं? चांगल्या फोटोसाठी खरंच गरजेचं आहे का? जाणून घ्या सविस्तर

फोटोग्राफीसाठी मेगापिक्सेल खरंच गरज असते का? एक मेगापिक्सेल म्हणजे नक्की किती पिक्सेल? असे अनेक प्रश्न तुमच्या मनात नेहमीच येत असतील. आता आम्ही तुम्हाला तुमच्या या सर्व प्रश्नांची उत्तरं देणार आहोत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 04, 2025 | 09:42 AM
Tech Tips: Megapixel नक्की काय असतं? चांगल्या फोटोसाठी खरंच गरजेचं आहे का? जाणून घ्या सविस्तर

Tech Tips: Megapixel नक्की काय असतं? चांगल्या फोटोसाठी खरंच गरजेचं आहे का? जाणून घ्या सविस्तर

Follow Us
Close
Follow Us:
  • स्मार्टफोन कॅमेऱ्याचा मेगापिक्सेल नक्की काय असतो?
  • एक मेगापिक्सेल म्हणजे 10 लाख पिक्सेल
  • फोटोमध्ये छोटे-छोटे स्क्वेयर पाहायला मिळतात
स्मार्टफोन खरेदी करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट असते कॅमेरा. जर तुम्ही देखील स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याने फोटोग्राफी करत असाल तर तुम्ही देखील मेगापिक्सेलचं नाव नक्कीच ऐकलं असेल. कारण फोटोग्राफीसाठी स्मार्टफोन कॅमेऱ्याचा मेगापिक्सेल अत्यंत गरजेचा असतो. पण मेगापिक्सेल नक्की काय असतो आणि फोटोग्राफीसाठी मेगापिक्सेल किती गरजेचं आहे, याबाबत अनेकांना माहिती नाही. आता आम्ही तुम्हाला मेगापिक्सेल नक्की काय असतं, याबाबत सविस्तरपणे सांगणार आहोत.

Free Fire MAX: बॅटलग्राऊंड गेममध्ये झाली Evo Access ची धमाकेदार एंट्री, फ्री गन स्किन मिळवण्याची हीच सर्वोत्तम संधी

मेगापिक्सेल नक्की काय असतं?

एक मेगापिक्सेल म्हणजे 10 लाख पिक्सेल. पिक्सेल म्हणजे खूप छोटे-छोटे रंगीत स्क्वेयर असतात. हे छोटे-छोटे रंगीत स्क्वेयर मिळून एक डिजिटल फोटो तयार होतो. जेव्हा तुम्ही एखादा फोटो क्लिक करता तेव्हा कॅमेरा अनेक लाख पिक्सेल कॅप्चर करतो, हे सर्व पिक्सेल एका ग्रिडमध्ये अरेंज करतो. ही संपूर्ण प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर एक फोटो तयार होतो. जेव्हा तुम्ही एखादा फोटो खूप झूम करता तेव्हा तुम्हाला त्या फोटोमध्ये छोटे-छोटे स्क्वेयर पाहायला मिळतात.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

जास्त मेगापिक्सेलमुळे फोटो चांगला येतो का?

अनेक लोकांचं असं मत असतं की, चांगली क्वालिटी आणि शार्प इमेजसाठी जास्त मेगापिक्सेल असलेला कॅमेरा असणं अत्यंत गरजेचं आहे. मात्र असं गरेजचं नाही. जास्त मेगापिक्सेलवाला सेंसर जास्त डिटेल्स कॅप्चर करतो, ज्यामुळे मोठे प्रिंट किंवा क्रॉपिंगवेळी कोणतीही समस्या येत नाही. मात्र इमेज क्वालिटीसाठी केवळ मेगापिक्सेलच गरजेचा नसतो. लेंस क्वालिटी, सेंसरची साइज, लाइटिंग आणि कॅमेरा सॉफ्टवेयर इत्यादी सर्व गोष्टी मिळून इमेज क्वालिटी ठरते. कमी पिक्सेल असलेला चांगल्या दर्जाचा सेन्सर देखील उत्तम प्रतिमा कॅप्चर करू शकतो.

जास्त मेगापिक्सेलची गरज का असते?

जर तुम्हाला एखाद्या ईमेजची मोठी प्रिंट घ्यायची असेल किंवा एखादा फोटो क्रॉप करून त्याचा केवळ छोटा भाग वापरायचा असेल, तर अशा परिस्थितीत जास्त मेगापिक्सेलची गरज पडते. त्यामुळे फॅशन आणि प्रोडक्ट फोटोग्राफर हाय-रेजॉल्यूशन म्हणजेच जास्त मेगापिक्सेल असलेला कॅमेरा वापरतात.

BSNL Recharge Plan: दररोज 2GB हाय स्पीड डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग… 50 दिवस व्हॅलिडीटी असलेल्या रिचार्ज प्लॅनची किंमत केवळ इतकी

थोडक्यात फोटोग्राफीसाठी मेगापिक्सेल गरजेचा असतो. पण चांगल्या फोटोसाठी केवळ मेगापिक्सेलच गरजेचा नसतो. याशिवाय इतर गोष्टी देखील महत्त्वाच्या असतात. ज्यामध्ये लेंस क्वालिटी, सेंसरची साइज, लाइटिंग आणि कॅमेरा सॉफ्टवेयर इत्यादींचा समावेश असतो. त्यामुळे जर तुम्ही फोटोग्राफीसाठी स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल अशावेळी केवळ मेगापिक्सेल पाहणं गरजेचं नसतं. इतर गोष्टी देखील पाहणं गरेजचं असतं.

FAQs (संबंधित प्रश्न)

स्मार्टफोनचा कॅमेरा किती मेगापिक्सेलचा असावा?
मेगापिक्सेल जितके जास्त तितका फोटो शार्प मिळतो, पण लेन्स क्वालिटी आणि सेन्सर साईझ जास्त महत्त्वाची असते. 12MP ते 50MP दरम्यान कॅमेरा उत्तम समजला जातो.

OIS आणि EIS यात काय फरक आहे?
OIS (Optical Image Stabilization) म्हणजे लेन्स हालचाल कमी करून फोटो स्थिर ठेवतो, तर EIS (Electronic Image Stabilization) हे सॉफ्टवेअरच्या मदतीने व्हिडिओ स्थिर ठेवते.

HDR मोड म्हणजे काय?
HDR (High Dynamic Range) मोड फोटोमधील उजेड आणि सावलीचा समतोल राखतो, ज्यामुळे फोटो अधिक नैसर्गिक दिसतो.

AI Camera म्हणजे काय?
AI कॅमेरा सीन ओळखून ऑटोमॅटिक कलर, लाइट आणि कॉन्ट्रास्ट अ‍ॅडजस्ट करतो, जेणेकरून फोटो अधिक परफेक्ट मिळतो.

Web Title: What is the meaning of megapixel is it necessary for photos know in details tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 04, 2025 | 09:42 AM

Topics:  

  • Tech News
  • TECH TIPS
  • tech updates

संबंधित बातम्या

ChatGPT ने दिलं सीक्रेट ख्रिसमस गिफ्ट! फक्त एक ईमोजी आणि सांताक्लॉज स्वत: बनवणार तुमचा व्हिडीओ, नवं अपडेट पाहून यूजर्स खूश
1

ChatGPT ने दिलं सीक्रेट ख्रिसमस गिफ्ट! फक्त एक ईमोजी आणि सांताक्लॉज स्वत: बनवणार तुमचा व्हिडीओ, नवं अपडेट पाहून यूजर्स खूश

YouTube चा नवा प्रयोग! शॉर्ट्समधील Dislike बटणाची जागा बदलण्याची शक्यता, कंपनी करतेय मोठं प्लॅनिंग
2

YouTube चा नवा प्रयोग! शॉर्ट्समधील Dislike बटणाची जागा बदलण्याची शक्यता, कंपनी करतेय मोठं प्लॅनिंग

Tech Tips: फोनवरच अडकलंय आयुष्य? फक्त या 5 सवयी बदला… 72 तासांत तुम्हालाही दिसेल चकित करणारा फरक
3

Tech Tips: फोनवरच अडकलंय आयुष्य? फक्त या 5 सवयी बदला… 72 तासांत तुम्हालाही दिसेल चकित करणारा फरक

iPhone 20 मध्ये होणार सर्वात मोठा बदल! डिझाईन-फीचर्स ते किंमत… Apple यूजर्सना मिळणार खास सरप्राईज
4

iPhone 20 मध्ये होणार सर्वात मोठा बदल! डिझाईन-फीचर्स ते किंमत… Apple यूजर्सना मिळणार खास सरप्राईज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.