BSNL Recharge Plan: दररोज 2GB हाय स्पीड डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग... 50 दिवस व्हॅलिडीटी असलेल्या रिचार्ज प्लॅनची किंमत केवळ इतकी
प्रायव्हेट टेलीकॉम कंपन्यांना टक्कर देण्यासाठी BSNL ने पुन्हा एकदा एक नवीन रिचार्ज प्लॅन सादर केला आहे. हा रिचार्ज प्लॅन युजर्सना 50 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर करत आहे. म्हणजेच एकदा रिचार्ज केल्यानंतर दीड महिना चिंता करण्याची गरज नाही. जर तुम्ही BSNL युजर असाल किंवा तुम्ही BSNL वर स्विच करण्याचा विचार करत असाल तर कंपनीचा हा नवीन रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी एक चांगला ऑप्शन ठरू शकतो. कंपनीने त्यांच्या एक्स अकाऊंटवर पोस्ट करत या नवीन रिचार्ज प्लॅनबाबत माहिती दिली आहे. कंपनीने सादर केलेल्या या नवीन रिचार्ज प्लॅनची किंमत 400 रुपयांहून कमी आहे.
BSNL चा हा जबरदस्त रिचार्ज प्लॅन त्यांच्या युजर्सनाा दिर्घकाळ व्हॅलिडीटी आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा ऑफर करतो. याशिवाय या प्लॅनमध्ये युजर्ससाठी भरपूर डेटा देखील ऑफर केला जातो. हा प्लॅन विशेषतः अशा लोकांसाठी बनवण्यात आला आहे ज्यांना वारंवार रिचार्ज करण्याचा त्रास टाळायचा आहे. या प्लॅनमध्ये कॉलिंग, डेटा आणि मेसेजिंगचे फायदे मिळतात. चला या अद्भुत प्लॅनबद्दल सविस्तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)
Binge Without Fear – 100GB for 50 Days! Switch to the BSNL ₹347 Plan and enjoy: Unlimited Calls
2GB Data/Day
100 SMS/Day
50 Days Validity Desh ka Network, Desh ki Choice – BSNL! pic.twitter.com/BQRVpMJKw0 — BSNL India (@BSNLCorporate) November 1, 2025
अलीकडेच सरकारी टेलिकॉम कंपनीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट शेअर करत या नवीन प्लॅनची घोषणा केली आहे. कंपनीने सांगितलं आहे की, जर तुम्ही दिर्घकाळ व्हॅलिडीटी असणाऱ्या बजेट फ्रेंडली रिचार्ज प्लॅनच्या शोधात असाल तर 347 रुपयांचा प्लॅन तुमच्यासाठी एक चांगला ऑप्शन ठरणार आहे. या प्लॅनमध्ये युजर्सना अनलिमिटेड कॉलिंग ऑफर केली जाते, याचा अर्थ युजर्स कोणत्याही जास्तीच्या खर्चाशिवाय देशभरातील कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग करू शकतो.
याशिवाय कंपनीच्या या प्लॅनमध्ये युजर्सना रोज 2GB हाय-स्पीड डेटा देखील ऑफर केला जातो. डेटा लिमिट संपल्यानंतर ही स्पीड 80 kbps होते. यासोबतच या प्लॅनमध्ये रोज 100 एसएमएस देखील मिळतात. यामुळे तुम्ही कोणत्याही नेटवर्कवर मेसेज पाठवू शकता. या प्लॅनची व्हॅलिडीटी 50 दिवसांची आहे, म्हणजेच तुम्हाला सुमारे दीड महिना वारंवार रिचार्ज करण्याची आवश्यकता नाही.
दुसऱ्या प्रायव्हेट कंपन्यांच्या तुलनेत BSNL हा रिचार्ज प्लॅन बराच स्वस्त आहे. ज्या युजर्सना जास्त डेटाची आवश्यकता असते, त्यांच्यासाठी हा रिचार्ज प्लॅन बेस्ट आहे. BSNL ने अलीकडेच आपले नेटवर्क लक्षणीयरीत्या सुधारले आहे आणि अनेक शहरांमध्ये 4G सेवा सुरू केल्या आहेत. म्हणूनच, ही योजना विशेषतः अशा भागात राहणाऱ्यांसाठी फायदेशीर ठरेल जिथे BSNL चे नेटवर्क कव्हरेज चांगले आहे.
BSNL कोणती कंपनी आहे?
BSNL (भारत संचार निगम लिमिटेड) ही भारत सरकारची टेलिकॉम कंपनी आहे, जी मोबाईल, ब्रॉडबँड आणि फायबर सेवा पुरवते.
BSNL SIM कसा मिळवायचा?
तुम्ही जवळच्या बीएसएनएल ग्राहक सेवा केंद्र, रिटेलर किंवा BSNLच्या अधिकृत वेबसाइटवरून SIM घेऊ शकता.
BSNL मध्ये कोणते रिचार्ज प्लॅन उपलब्ध आहेत?
BSNL मध्ये प्रिपेड, पोस्टपेड, डेटा, कॉलिंग आणि सीनियर सिटिझन प्लॅन्स उपलब्ध आहेत.
माझा BSNL नंबरचा बॅलन्स कसा तपासायचा?
तुम्ही *123# डायल करून किंवा BSNL Selfcare App मधून बॅलन्स व डेटा तपासू शकता.






