Tech Tips: पावसाळ्यात किती असावं फ्रिजचं तापमान? अशी आहे रेफ्रिजरेटर वापरण्याची योग्य पद्धत
भारतातील वातावरणात सतत बदल होत असल्याचं पाहायला मिळत आहे. कधी ऊन तर कधी पाऊस, अशी परिस्थिती सध्या भारतात निर्माण झाली आहे. यामुळे भारतीयांच्या आहारात देखील मोठ्या प्रमाणात बदल पाहायला मिळत आहेत. राहणीमानापासून अगदी खाण्या – पिण्यापर्यंत सर्व गोष्टी बदलत आहेत. आपलं आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी आपल्याला हे बदल आत्मसात करणं अत्यंत गरजेचं आहे. अन्यथा आपल्या शरिरावर वाईट परिणाम होऊ शकतात आणि आपल्याला वेगवेगळ्या आजारांना सामोरं जावू लागू शकतं.
Vi युजर्ससाठी आनंदाची बातमी! कंपनीने केली कमाल, नेटवर्कशिवाय करता येणार व्हिडीओ आणि ऑडियो कॉल्स
भारतातील सध्याच्या बदलत्या वातावरणात लोकं एअर कंडीशनर आणि फ्रिजचा अधिक वापर करत आहे. कारण बदलत्या वातावरणामुळे उष्णता वाढली आहे आणि यामुळेच एयर कंडीशनरची गरज असते. तर अन्न खराब होऊ नये, यासाठी फ्रीजचा वापर केला जातो. आपण ज्या प्रकारे एअर कंडीशनर वापरताना काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेतो त्याचप्रमाणे फ्रीजचा वापर करताना देखील काही गोष्टी लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
या बदलत्या वातावरणात फ्रीजचा वापर कशा प्रकारे करावा, याबाबत प्रत्येकाल माहिती असलं पाहिजे, अन्यथा तुमच्या निष्काळजीपणामुळे फ्रीज लवकर खराब होऊ शकतो. याशिवाय फ्रीजमध्ये स्टोअर केलेले पदार्थ देखील लवकर खराब होऊ शकतात. वेगवेगळ्या वातावरणात फ्रीजला एका ठरावीक टेंपरेचरवर सेट करणं अत्यंत गरजेचं आहे. यामुळे दिर्घकाळ फ्रीजचा वापर केला जाऊ शकतो.
तीव्र उन्हाळ्यानंतर अचानक सर्वत्र पावसाला सुरुवात झाली आहे. पावसाळ्यात फ्रीजचे तापमान बदलणं अत्यंत गरजेचं आहे. सध्या बाजारात वेगवेगळ्या मोडसह फ्रीज उपलब्ध आहेत. तर जुन्या फ्रीजमध्ये 1 ते 5 डिग्रीपर्यंत टेंपरेचर सेट करण्याची सुविधा देण्यात आली आहे. काही असे देखील फ्रीज आहेत, ज्यामध्ये मिडियम आणि हाय असे दोन ऑप्शन्स देण्यात आले आहेत.
प्रत्येक वातावरणानुसार फ्रीज योग्य तापमानावर ठेवणं अत्यंत गरेजंच आहे. ज्यामुळे खाद्यपदार्थ अत्यंत सुरक्षित राहण्यासाठी मदत होते. पावसाळ्यात फ्रिजचे तापमान 1.7 डिग्री ते 3.3 डिग्री यादरम्यान असणं अत्यंत गरजेचं आहे. या टेंपरेचरमध्ये तुम्ही कोणत्याही ऋतूत फ्रीजचा वापर करू शकता. जर रेफ्रिजरेटर आणि फ्रीजरसाठी वेगवेगळे तापमान सेट करण्याचा पर्याय असेल, तर सॅमसंगच्या अधिकृत वेबसाइटनुसार, फ्रीजरचे तापमान 19 अंश सेल्सिअस ठेवा. तर, रेफ्रिजरेटरचे तापमान 3 अंश सेल्सिअसवर सेट करावे.
जर तुम्ही भाज्या आणि अन्न जास्त काळ फ्रिजमध्ये ठेवत असाल आणि ते ताजे राहावे असे वाटत असेल, तर योग्य तापमान असलेले फ्रिज वापरा. फ्रिजचे तापमान 3 वर सेट करा. जर काही संख्या नसेल, तर तापमान मध्यमवर ठेवा आणि वापरा. यामुळे फ्रिजमध्ये ठेवलेल्या वस्तू बराच काळ सुरक्षित राहतील आणि त्या खराब होण्यापासून वाचतील.