Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

YouTube वर व्हायरल व्हायचंय? यावेळी पोस्ट करा तुमचा व्हिडीओ आणि मिळवा अधिक व्ह्युज

YouTube Tips: युट्यूब पाहणाऱ्यांची संख्या करोडोंच्या घरात आहे. लोकं युट्यूबवर वेगवेगळे व्हिडीओ पाहत असतात. आता आम्ही तुम्हाला युट्यूबवरील वेळेचं गणित सविस्तरपणे सांगणार आहोत, ज्यामुळे तुमचे व्हिडीओ व्हायरल होऊ शकतात.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 17, 2025 | 01:54 PM
YouTube वर व्हायरल व्हायचंय? यावेळी पोस्ट करा तुमचा व्हिडीओ आणि मिळवा अधिक व्ह्युज

YouTube वर व्हायरल व्हायचंय? यावेळी पोस्ट करा तुमचा व्हिडीओ आणि मिळवा अधिक व्ह्युज

Follow Us
Close
Follow Us:

आजच्या डिजीटल काळात व्हिडीओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म YouTube केवळ एक व्हिडीओ प्लॅटफॉर्म नाही तर कमाईचे साधन बनले आहे. सध्या अनेकजण YouTube मध्ये त्यांचे करिअर बनवतात, ज्यांना YouTuber म्हणतात. YouTube वर दररोज लाखो व्हिडीओ अपलोड केले जातात. यातील काही व्हिडीओ व्हायरल होतात, तर काही व्हिडीओंना जास्त व्ह्युज देखील मिळत नाहीत. पण युट्युबवर व्हिडीओ व्हायरल होण्याचं कारण केवळ व्हिडीओमधील कंटेट असतो का? तर नाही. युट्यूबवर व्हिडीओ पोस्ट करण्याची वेळ देखील अत्यंत महत्त्वाची असते. या वेळेमुळे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. (फोटो सौजन्य – Pinterest)

Father’s Day 2025: आपल्या बाबांना गिफ्ट करा हे जबरदस्त कॅमेरा स्मार्टफोन्स, किंमत 25,000 हून कमी

तुम्ही देखील युट्यूबर असाल आणि युट्यूबवर तुमचे वेगवेगळे व्हिडीओ शेअर करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. तुम्ही युट्यूबवर व्हिडीओ तर अपलोड करताय पण व्हिडीओला व्ह्युज मिळत नाही, युट्यूब चॅनेल ग्रो होत नाही. ही तुमची देखील समस्या आहे का? तर आता आम्ही तुम्हाला युट्यूबवरील वेळेचं गणित सांगणार आहोत. युट्यूबवर व्हिडीओ व्हायरल होण्यामागे केवळ कंटेटच नाही तर वेळ देखील एक महत्त्वाचं कारण आहे.

युट्यूबवर व्हिडीओ अपलोड करण्याची योग्य वेळ

युट्यूबवर जेव्हा व्हिडीओ अपलोड केला जातो, तेव्हा सुरुवातीचे काही तास अत्यंत महत्त्वाचे असतात. यावेळी जर लोकांनी तुमचा व्हिडीओ लाईक आण कमेंट केली, तर यूट्यूब एल्गोरिदम तो व्हिडीओ प्रमोट करतो. हे व्हायरल होण्याची पहिली पायरी आहे.

रिसर्चमध्ये काय म्हटलं आहे?

जगभरातील यूट्यूब एक्सपर्ट्स आणि डेटा एनालिस्ट्सच्या रिपोर्टनुसार, सोमवार ते शुक्रवार आणि वीकेंड (शनिवार, रविवार) या दिवशी वेगवेगळे टाईम व्हिडीओ अपलोड करण्यासाठी योग्य असतात.

सोमवार ते शुक्रवार

दुपारी 2 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत, ऑफीस आणि शाळेनंतर लोकं फ्री होतात आणि यूट्यूब ब्राउज करतात. संध्याकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत, हा सर्वात पॉपुलर टाईम आहे, जेव्हा सर्वाधिक लोकं YouTube वर अ‍ॅक्टिव्ह असतात.

Recharge Plan: केवळ 100 रुपयांत मिळणार 90 दिवसांची व्हॅलिडीटी! या युजर्ससाठी बेस्ट आहे Jio चा हा रिचार्ज प्लॅन

शनिवार आणि रविवार

सकाळी 10 वाजल्यापासून ते दुपारी 1 वाजेपर्यंत – लोक आठवड्याच्या शेवटी उशिरा उठतात आणि त्यांच्या मोकळ्या वेळेत YouTube पाहतात. संध्याकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत – वीकेंड एंटरटेनमेंट पीक टाईम आहे.

मोबाइल यूजर्स लक्षात ठेवा

सध्याच्या काळात 70% हून अधिक YouTube व्यूज मोबाईलद्वारे येतात. म्हणून जेव्हा तुम्ही व्हिडिओ पोस्ट करता तेव्हा लोकांची मोबाईल अ‍ॅक्सेसिबिलिटी आणि त्यांचा मोकळा वेळ लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. ऑफिस लंच टाइम (दुपारी 1 ते 2) आणि प्रवास टाइम (सायंकाळी 5 ते 7) हे देखील युट्यूबवर व्हिडीओ पोस्ट करण्यासाठी योग्य वेळ आहे.

Web Title: What is the right time to post you tube videos you will get more views tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2025 | 01:54 PM

Topics:  

  • TECH TIPS
  • YouTube
  • YouTubers

संबंधित बातम्या

Tech Tips: पावसाळ्यात स्मार्टफोनचा वापर करणं ठरू शकतं धोकादायक, क्षणातच होऊ शकतो ब्लास्ट! या टिप्स करा फॉलो
1

Tech Tips: पावसाळ्यात स्मार्टफोनचा वापर करणं ठरू शकतं धोकादायक, क्षणातच होऊ शकतो ब्लास्ट! या टिप्स करा फॉलो

घरावर झालेल्या गोळीबारानंतर समोर आली एल्विशची प्रतिक्रिया, चाहत्यांचे मानले आभार; म्हणाला ‘मी आणि माझे कुटुंब…’
2

घरावर झालेल्या गोळीबारानंतर समोर आली एल्विशची प्रतिक्रिया, चाहत्यांचे मानले आभार; म्हणाला ‘मी आणि माझे कुटुंब…’

एल्विश यादवच्या घरावर कोणी आणि का केला गोळीबार? संपूर्ण प्रकरणाची ‘या’ गँगने घेतली जबाबदारी
3

एल्विश यादवच्या घरावर कोणी आणि का केला गोळीबार? संपूर्ण प्रकरणाची ‘या’ गँगने घेतली जबाबदारी

Elvish Yadav: एल्विश यादवच्या राहत्या घरी गोळीबार, युट्यूबरच्या वडिलांनी दिली माहिती; म्हणाले ‘घराबाहेर… ‘
4

Elvish Yadav: एल्विश यादवच्या राहत्या घरी गोळीबार, युट्यूबरच्या वडिलांनी दिली माहिती; म्हणाले ‘घराबाहेर… ‘

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.