Secret Of Apple Logo: अर्धे सफरचंदच का बनला जगातील सर्वात मोठ्या टेक ब्रँडचा लोगो? काय आहे या डिझाईनमागील रहस्स?
टेक्नोलॉजीच्या जगातील सर्वात मोठं नावं म्हणजेच Apple. टेक जायंट कंपनीची यादी Apple च्या नावाशिवाय अपूर्ण आहे. Apple ने त्यांच्या आयफोन आणि इतर प्रोडक्ट्सने सर्वांचे मन जिंकले आहे. खरं तर Apple हे टेक क्षेत्रातील सर्वात मोठं नाव आहे. Apple ची ओळख म्हणजे त्याचा लोगो. Apple च्या आनोख्या लोगोने सर्वांच्या मनात घर केलं आहे. हा लोगो आज केवळ स्मार्टफोन इंडस्ट्रीमधील फक्त एक नाव नाही तर लग्जरी, विश्वास आणि नाविन्यतेचे प्रतिक बनला आहे. बाकी कोणत्याही कंपनीपेक्षा Apple चा लोगो अगदी वेगळा आणि आकर्षक आहे. पण हा लोगो कंपनीची ओळख कशी बनला आणि कंपनीने याच लोगोची निवड का केली, याबाबत आता सविस्तर जाणून घेऊया.
तुम्ही कधी विचार केला आहे का की, कंपनीचा लोगो एखाद्या साधारण सफरचंदाऐवजी असे अर्धे सफरचंद का आहे? खरं तर याचं उत्तर फारचं मजेदार आहे. Apple कंपनीची सुरुवात 1976 मध्ये कॅलिफोर्नियातील एका गॅरेजमध्ये झाली होती. स्टीव जॉब्स, स्टीव वॉजनिएक आणि रोनाल्ड वेन या तिघांनी कंपनीची सुरुवात केली. त्यावेळी या तिघांचे लक्ष्य होते की, असा एक पर्सनल कंप्यूटर तयार करावा, ज्याचा वापर प्रत्येकजण करू शकेल. यानंतर कंपनीने हळूहळू नवीन प्रोडक्ट्स लाँच करण्यास सुरुवात केली. 2007 मध्ये कंपनीने त्यांचा पहिला आयफोन लाँच केला. (फोटो सौजन्य – Pinterest)
Apple चा पहिला लोगो पूर्णपणे वेगळा आणि लक्षात ठेवण्यास थोडा कठिण होता. रोनाल्ड वेन यांनी कंपनीचा पहिला लोगो डिझाईन केला होता. यामध्ये न्यूटन एका झाडाखाली बसला होता आणि त्याच्यावर एक सफरचंद पडताना दाखवलं होतं. मात्र हा लोगो फारच अवघड होता आणि सहज लक्षात देखील राहत नव्हता. यानंतर कंपनीने 1977 मध्ये डिजाइनर रॉब जेनॉफ यांना नवीन लोगो डिझाईन करण्याची जबाबदारी दिली होती.
रॉबने जेव्हा लोगो डिझाईन केला तेव्हा त्याने केवळ एक साधारण सफरचंद तयार केलं होतं. मात्र त्यानंतर त्याने सफरचंदाला अर्धे केले, ज्यामुळे ते इतर फळं जसे चेरी किंवा टोमॅटोपासून वेगळे दिसेल. हाच साधारण ट्विस्ट लोकांना यूनिक आणि मजेदार वाटला. हा लोगो कमी काळातच कंपनीची नवीन ओळख बनला. वेळेनुसार, यामध्ये कलर आणि डिझाईन बदलण्यात आले मात्र अर्धे सफरचंद तसेच राहिले. हाच लोगो आज लोकांसाठी क्वालिटी, लग्जरी आणि प्रीमियम टेक्नोलॉजीचे प्रतिक बनला आहे.
कंपनीचा हा लोगो आकर्षक नसला तरी देखील यामागे एक मोठा अर्थ लपलेला आहे. एका सिद्धांतानुसार, हा लोगो माणसाच्या ज्ञानाची भूक आणि नवीन गोष्टींचा शोध दर्शवितो. बायबलप्रमाणे, आदाम आणि हव्वेने ज्ञान मिळविण्यासाठी सफरचंद खाल्ले होते. काही जण हे ब्रिटिश शास्त्रज्ञ एलन ट्युरिंग यांना श्रद्धांजली मानतात, ज्यांनी संगणक शास्त्राचा पाया घातला आणि विष प्राशन करून आत्महत्येचे प्रतीक म्हणून सफरचंदाचा वापर केला.
Apple ने त्यांच्या प्रोडक्ट्सच्या सौंदर्य, दमदार परफॉर्मेंस आणि खास यूजर एक्सपीरियंससह या लोगोला ब्रँड व्हॅल्यू दिली. याचा परिणाम असा झाला आहे की, आज लोकांचा याच अर्ध्या सफरचंदावर पूर्ण विश्वास आहे. लोकं चांगल्या यूजर एक्सपीरियंस आणि उत्तम प्रोडक्टसाठी Apple ची निवड करत आहेत.