Flipkart – Amazon Sale 2025: कुठे स्वस्त मिळतोय Samsung Galaxy S24 Ultra 5G? बेस्ट Deal वर एक नजर टाका
तुम्हाला देखील एक प्रिमियम सॅमसंग स्मार्टफोन खरेदी करण्याची इच्छा आहे का? मग आता तुमची ही इच्छा पूर्ण करण्याची वेळ आली आहे. कारण आता Samsung Galaxy S24 Ultra 5G च्या खरेदीवर फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल आणि अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल सेलमध्ये मोठं डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे. Samsung Galaxy S24 Ultra 5G हा प्रिमियम स्मार्टफोन खरेदी करण्याची हीच संधी आहे. पण हा प्रिमियम स्मार्टफोन कोणत्या प्लॅटफॉर्मवर कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे, तुम्हाल माहिती आहे का? दोन्ही प्लॅटफॉर्मवर या स्मार्टफोनच्या किंमती वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे तुमचा फायदा कोणत्या डिलमध्ये होऊ शकतो, हे आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या डिलमुळे तुम्हाला नवीन प्रिमियम स्मार्टफोन कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे आणि तुमची बचत देखील होणार आहे.
सर्वात आधी फ्लिपकार्टवर सुरु असलेल्या फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल 2025 बद्दल बोलूया. फ्लिपकार्टवर हा प्रिमियम स्मार्टफोन 88,990 रुपयांच्या किंमतीत खरेदीसाठी उपलब्ध आहे. कंपनी या स्मार्टफोनच्या खरेदीवर काही खास बँक ऑफर्स देखील देत आहे, त्यामुळे या स्मार्टफोनची किंमत आणखी कमी होते. फ्लिपकार्ट एसबीआई क्रेडिट कार्डद्वारे खरेदी केल्यास स्मार्टफोनवर 4,000 रुपयांचे आणखी डिस्काऊंट दिलं जाणार आहे. आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्ड ईएमआय पर्यायासह, तुम्ही फोनवर 1,500 रुपयांपर्यंत सूट मिळवू शकता. (फोटो सौजन्य – Pinterest)
अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल सेलबद्दल बोलायचं झालं तर या स्मार्टफोनची किंमत या सेलमध्ये 73,999 रुपये झाली आहे. फ्लिपकार्टपेक्षा या प्लॅटफॉर्मवर स्मार्टफोनची किंमत प्रचंड कमी आहे. मात्र या डिलमध्ये कोणतेही बँक ऑफर्स समाविष्ट नाहीत. त्यामुळे ही याा स्मार्टफोनची फायनल किंमत आहे. तथापि, तुम्ही Amazon Pay ICICI बँक क्रेडिट कार्ड वापरून 2,219 रुपयांपर्यंत सूट मिळवू शकता, ज्यामुळे ही डिल आणखी खास बनते. याचा अर्थ Amazon हा फोन खूपच कमी किमतीत खरेदी करण्याची संधी देत आहे.
प्रिमियम स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर या डिव्हाईसमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.8-इंचाचा मोठा LTPO AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनमध्ये पावरफुल स्नॅपड्रॅगन 8 जेनरेशन 3 प्रोसेसर देखील देण्यात आला आहे, ज्यासोबत एड्रेनो 750 GPU देखील आहे. याचा अर्थ या फोनवर तुम्ही बराच वेळ गेमिंगचा आनंद घेऊ शकता. या डिव्हाइसमध्ये 45W फास्ट चार्जिंग आणि 15W वायरलेस चार्जिंगसह 5000mAh बॅटरी आहे.
कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झालं तर हा प्रिमियम स्मार्टफोन आणखी दमदार आहे. या स्मार्टफोनमध्ये 200MP चा प्रायमरी कॅमेरा , 50MP पेरिस्कोप टेलीफोटो, 10MP टेलीफोटो आणि 12MP अल्ट्रा वाइड कॅमेरा देण्यात आला आहे. ज्यामुळे तुम्ही चांगले फोटो आणि व्हिडीओ कॅप्चर करू शकता. सेल्फीसाठी या डिव्हाईसमध्ये 12MP चा फ्रंट कॅमेरा देखील देण्यात आला आहे.