Apple iPhone 18 Update: अपकमिंग आयफोन सिरीजबाबत समोर आली मोठी अपडेट! 2026 मध्ये नाही होणार लाँच, केवळ हेच मॉडेल्स घेणार एंट्री
अमेरिकी टेक कंपनी Apple दरवर्षी त्यांची नवीन आयफोन सिरीज लाँच करत असते. दरवर्षी कंपनी काही अपग्रेडसह आणि नवीन फीचर्ससह त्यांची आयफोन सिरीज लाँच करते. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला देखील कंपनीने एक मोठा ईव्हेंट आयोजित केला होता. या ईव्हेंटंमध्ये कंपनीने त्यांची नवीन आयफोन 17 सिरीज लाँच केली आहे. या सिरीजमध्ये 4 मॉडेल्स कंपनीने लाँच केले आहेत. सध्या सर्वत्र कंपनीच्या आयफोन 17 सिरीजची विक्री सुरु झाली आहे.
आयफोन 17 सिरीजनंतर आता कंपनीच्या अपकमिंग आयफोन 18 बाबत चर्चा सुरु झाली आहे. असं सांगितलं जात होतं की, कंपनी त्यांचा अपकमिंग आयफोन 18 2026 मध्ये लाँच करणार आहे. मात्र अलीकडेच समोर आलेल्या अहवालांवर विश्वास ठेवला तर असं सांगितंलं जात आहे की, 2026 मध्ये आयफोन 18 लाँच केला जाणार नाही. कंपनीने त्यांच्या लाँच टाइमलाइनमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. आयफोन 18 खरेदी करण्याची योजना आता आखणाऱ्यांना बराच काळ वाट पाहावी लागणार आहे.
कंपनी दरवर्षी नवीन लाइनअपमध्ये स्टँडर्ड आणि प्रो मॉडल्स एकत्र लाँच करते. मात्र 2026 मध्ये हा पॅटर्न बदलणार आहे.
चाइनीज लीकस्टर डिजिटल चॅट स्टेशनमध्ये दिलेल्या माहितीनुसार, 2026 मध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या ईव्हेंटमध्ये कंपनी आयफोन 18 प्रो मॉडल्स आणि आयफोन एयर 2 लाँच करणार आहे. यामागील कारण म्हणजे सणासुदीच्या हंगामापूर्वी, कंपनी आपल्या ग्राहकांना फक्त प्रीमियम पर्याय सादर करू इच्छिते.
कंपनीने यावर्षी फेब्रुवारी महिन्यात iPhone 16e लाँच केला होता. यामध्ये आयफोन 16 ची अनेक वैशिष्ट्ये परवडणाऱ्या किमतीत देण्यात आली आहेत. कंपनी पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये आयफोन 17e लाँच करण्याची तयारी करत आहे. आयफोन 18 ला 2027 मध्ये अशाच प्रकारच्या ई व्हेरिअंटसह लाँच होऊ शकतो. मात्र अद्याप कंपनीने याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही.
आतापर्यंत समोर आलेल्या अहवालांवर विश्वास ठेवला तर असा अंदाज लावला जाऊ शकतो की, कंपनी पुढील वर्षी सप्टेंबर महिन्यात त्यांचा पहिला फोल्डेबल आयफोन लाँच करू शकते. कंपनी बऱ्याच काळापासून यावर काम करत आहे आणि लवकरच याचे प्रोडक्शन सुरू होऊ शकते. यात चार कॅमेरे आणि दोन आयफोन एअर्स सारखी डिझाइन असेल.