फोटो सौजन्य: iStock
आजकाल आपली सगळी कामं ऑनलाईन झाल्यामुळे ऑनलाईन स्कॅम देखील वाढले आहे. रोज आपण अशा अनेक बातम्या बघत असतो ज्यात लोकांना खासकरून जेष्ठ नागरिकांना हॅकर्स मंडळी लाखांचा गंडा घालतात. यामुळे फक्त जेष्ठांमध्येच नाही तर तरुणांमध्ये सुद्धा भीतीचे वातावरण आहे. अनेक जण तर ऑनलाईन पेमेंट करायला सुद्धा घाबरत असतात. पण योग्य खबरदारी घेतली तर नक्कीच तुम्ही ऑनलाईन स्कॅम टाळू शकता.
सध्या सायबर फसवणुकीची अनेक घटना समोर येत आहेत. या प्रकारच्या फसवणुकीत खात्यातून काढलेले पैसे परत मिळणे खूपच अवघड असते. यामुळेच अनेक जण निराश होऊन बसतात. पण, थोडीशी सक्रियता तुम्हाला मदत करू शकते. अशीच सक्रियता उत्तराखंडातील लोकांनी दाखवली ज्यामुळे त्यांना त्यांचे पैसे परत मिळाले. काय आहे हे प्रकरण? चला जाणून घेऊया.
Tech Tips: Instagram वर मित्राचे DM वाचा आणि त्याला कळणारही नाही! ही आहे सोपी ट्रीक
उत्तराखंडामधील हरदोईमध्ये पोलिसांनी सायबर फसवणुकीला बळी पडलेल्या 40 लोकांचे पैसे परत केले आहेत. वास्तविक, स्कॅमनंतर 30 मिनिटे खूप महत्वाची असतात. या दरम्यान तुम्ही काही महत्वाची पावले उचलून फसवणूक करणाऱ्यांच्या खिशात तुमचा स्वतःचा पैसा जाण्यापासून रोखू शकता. चला या टिप्सबद्दल जाणून घेऊया.
ऑनलाईन स्कॅम झाल्यानंतर, सर्वप्रथम तुमच्या बँकेला फसवणुकीची माहिती द्या. यांनतर तुमची बँक तुमचे बँक खाते फ्रिज करेल, त्यामुळे त्यातील पैशांचे व्यवहार थांबतील. याशिवाय तुमचे डेबिट आणि क्रेडिट कार्ड बँकेतून ब्लॉक करा. हे काम केल्यानंतर, सायबर पोलिसांना या प्रकरणाची माहिती द्या आणि नॅशनल सायबर क्राइम रिपोर्ट पोर्टलवर तुमची तक्रार नोंदवा. यासोबतच सायबर हेल्पलाइन 1930 वर कॉल करूनही तुम्हाला मदत मागता येईल.
2025 येताच Telegram ने आणले ‘हे’ नवीन फीचर्स, वापरकर्त्यांची सुरक्षितता होणार अधिक मजबूत
वास्तविक, सायबर फ्रॉडमध्ये फसवणूक करणारे लोकांच्या खात्यातून पैसे त्यांच्या स्वतःच्या खात्यात ट्रान्सफर करत असतात. जर रक्कम जास्त असेल तर ती अनेक बँक खात्यांमध्ये ट्रान्स्फर करावी लागेल. ही रक्कम खात्यातून काढण्यासाठी थोडा वेळ लागतो. या काळात सक्रिय राहून, तुम्ही तुमचे पैसे फसवणूक करणाऱ्यांच्या खिशात जाण्यापासून रोखू शकता, परंतु एकदा फसवणूक करणाऱ्यांनी खात्यातून पैसे काढले की ते परत मिळवणे खूपच कठीण होऊन होते.
हरदोईचे एपी नीरज कुमार जदौन म्हणाले की, पोलिसांच्या सक्रियतेमुळे फसवणुकीला बळी पडलेल्या 40 लोकांना 32 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम परत करण्यात आली आहे. ते म्हणाले की, जिल्ह्यातील सायबर गुन्ह्यांची वाढती घटना पाहता सायबर पोलीस ठाण्याचे पथक कार्यान्वित करण्यात आले आहे.