अँड्रॉईड यूजर्ससाठी बदलणार WhatsApp वापरण्याचा अनुभव! डिझाईनमध्ये होणार मोठा बदल, पाहून तुम्हीही व्हाल चकित
हा बदल सध्या व्हॉट्सॲप बिटा फॉर अँड्रॉईडच्या वर्जन 2.26.38.10 मध्ये डेव्हलपमेंट स्तरावर पाहायला मिळाला आहे. याचा अर्थ असा आहे की, अद्याप हे नवीन अपडेट सर्व बीटा यूजर्ससाठी उपलब्ध करण्यात आले नाही. त्यामुळे सामान्य यूजर्सपर्यंत हे अपडेट पोहोचण्यासाठी बराच कालावधी लागू शकतो. नव्या डिझाईनमध्ये बॉटम नेव्हिगेशन बार स्क्रीनच्या इतर भागांपेक्षा थोडा वेगळा दिसणार आहे. याच्या चारही बाजूला गोलाकार कोपरे दिसणार आहेत, ज्यामुळे हे एका फ्लोटिंग बारसारखे दिसू शकते. हे डिझाईन सध्याच्या नेव्हिगेशनच्या तुलनेत अधिक मॉडर्न लुक देईल. (फोटो सौजन्य: Pinterest)
या बदलामध्ये केवळ बारचा आकारच नाही, तर त्यातील टॅब्स आणि कंट्रोल्सचे व्हिज्युअल डिझाईन यांचाही समावेश असू शकतो. मिळालेल्या रिपोर्ट्सनुसार, लाईट थिममध्ये हे नवीन डिझाईन आणखी सहजपणे पाहायला मिळणार आहे तर डार्क थीममध्ये हा बदल कमी दिसू शकतो. व्हॉट्सॲपचे नवीन अँड्रॉईड डिझाईन आयफोन ॲपच्या फ्लोटिंग टॅब बारसारखेच असल्याचे सांगितलं जात आहे. आयओएसवर व्हॉट्सॲपने ॲपलच्या नव्या लिक्विड ग्लास डिझाईनला अनुरुप फ्लोटिंग आणि राउंडेड नेविगेशन एलिमेंट सादर केले आहे. अँड्रॉईडवर देखील अशाच प्रकारचे फ्लोटिंग कॉन्सेप्ट पाहायला मिळू शकते.
तथापी, अँड्रॉईड ॲपमध्ये आयफोनवाले डिझाईन जसेच्या तसे कॉपी केले जाणार नाही. व्हॉट्सॲप अँड्रॉईडसाठी वेगळे डिझाईन तत्त्वे फॉलो करणार आहे. यासाठी दोन्ही प्लॅटफॉर्मवर नेव्हिगेशनचा अनुभव एकसारखा दिसत असला तरी दोन्हीचे विझ्युअल डिझाईन वेगळे असणार आहे.
व्हॉट्सॲपने अँड्रॉईड ॲपमध्ये मुख्य सेक्शन बॉटम नेव्हिगेशनमध्ये सुमारे 3 वर्षांपूर्वी शिफ्ट केले होते. बिटा वर्जन 2.23.10.6 सह चॅट्स, कम्युनिटीज, अपडेट्स आणि कॉल्सला स्क्रीनच्या खालील बाजूला शिफ्ट करण्यात आले होते. यामुळे यूजर्सना सेक्शनमध्ये स्विच करणं आणखी सोपे झाले होते. आता कंपनी याच नेव्हिगेशन बारला एक नवीन रुप देण्याचे काम करत आहे. नवीन डिझाईन यूजर्ससाठी कधी उपलब्ध होणार आहे, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आली नाही.






