WhatsApp युजर्सना मिळालं मोठं गिफ्ट! iPhone आणि Android साठी आले 6 नवे फीचर्स, मेसेजिंग आणि कॉलिंग आता होणार अधिक मजेदार
तुम्ही तुमच्या स्मार्टफोनमध्ये असलेल्या मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp चा वापर न करता एक दिवस तरी राहू शकता का? WhatsApp आपल्या अनेक कामांसाठी मदत करतो. मेसेजिंग, कॉलिंग, फोटो आणि व्हिडीओ शेअरींग, डॉक्युमेंट शेअरिंग, पेमेंट, ईव्हेंट, ओपिनियन पोल, असे असंख्य फीचर्स WhatsApp मध्ये आहेत. याशिवाय WhatsApp चं सर्वात मोठं अपडेट म्हणजे AI. याच सर्व गोष्टींमुळे आपण आपल्या सर्व कामासांठी WhatsApp चा वापर करतो. फॅमिलि ग्रुप असो किंवा ऑफीसचा ग्रुप, WhatsApp वर सतत मेसेज सुरुच असतात.
ईमेजवर क्लिक करताच रिकामं होणार बँक अकाऊंट! WhatsApp वर सुरु झालाय नवा Scam, अशी करा तुमची सुरक्षा
जगभरात WhatsApp चे 2 अब्जाहून अधिक युजर्स आहेत. या सर्व युजर्सना WhatsApp वापरताना कोणत्याही अडचणी येऊ नयेत आणि WhatsApp चा अनुभव अधिक मजेदार व्हावा, यासाठी कंपनी नेहमीच नवीन फीचर्स आणि अपडेट रिलीज करत असते. थोडक्यात सांगायचं झालं तर WhatsApp आपल्या संभाषणांचा, ऑफिसमधील संवादाचा आणि नियोजनाचा एक भाग बनला आहे. फॅमिली ग्रुपमधील फोटो शेअर करणे असो किंवा ऑफिस मीटिंग अपडेट्स असो, प्रत्येक काम आता WhatsApp द्वारे करता येते. (फोटो सौजन्य – Pinterest)
आता युजर्सची हीच काम अधिक लवकर आणि सोप्या पद्धतीने केली जावी, यासाठी कंपनीने काही फीचर्स रिलीज केले आहेत. आता WhatsApp मध्ये काही नवीन स्मार्ट वैशिष्ट्ये जोडली जात आहेत. ज्यामुळे चॅटिंग जलद आणि वैयक्तिकृत होते. चला तर मग आता WhatsApp वरील या फीचर्सबद्दल जाणून घेऊया.
आता WhatsApp ग्रुप्समध्ये एका वेळी किती लोक ऑनलाइन आहेत हे दिसणार आहे. कोण कोण ऑनलाईन आहे याची नाव दिसणार नाहीत पण तुम्हाला ग्रुपच्या नावाखाली किती लोकं ऑनलाईन आहेत, याची संख्या दिसणार आहे.
आता WhatsApp द्वारे वैयक्तिक चॅटमध्येही इव्हेंट तयार करता येतील. तुम्ही या फीचरमध्ये कोणालाही आमंत्रित करू शकता, शेवटची तारीख-वेळ जोडू शकता आणि त्यांना चॅटमध्ये पिन करू शकता.
आम्ही तुम्हाला सांगतो की हे आयफोनसाठी एक नवीन वैशिष्ट्य आहे ज्यामध्ये तुम्ही थेट WhatsApp वरून कागदपत्रे स्कॅन करून पाठवू शकता. हे करण्यासाठी, तुम्हाला अटॅचमेंट आयकॉनवर टॅप करावे लागेल.
आयफोनवर, तुम्ही WhatsApp ला तुमचे डीफॉल्ट कॉल आणि मेसेजिंग अॅप बनवू शकता. याचा अर्थ असा की जेव्हा तुम्ही एखाद्याला कॉल किंवा मेसेज कराल तेव्हा ते WhatsApp द्वारे आपोआप होईल.
आयफोन वापरकर्ते आता स्वतःवर किंवा दुसऱ्या व्यक्तीच्या व्हिडिओवर व्हिडिओ कॉलमध्ये पिंच-टू-झूम करू शकतात. यामुळे वापरकर्त्यांना कोणत्याही गोष्टीकडे बारकाईने लक्ष ठेवता येते.
जर तुम्ही WhatsApp चॅनल चालवत असाल तर आता तुम्हाला चॅनल शेअर करण्यासाठी क्यूआर कोड मिळतील. हा QR कोड कोणत्याही पोस्टर किंवा इन्स्टा स्टोरीमध्ये वापरता येतो.