Smartphone पाण्यात पडल्यानंतर तुम्हीही त्याला तांदळाच्या डब्यात ठेवताय? पण ही पद्धत योग्य की अयोग्य? जाणून घ्या
सध्याच्या या डिजिटल काळात स्मार्टफोन आपली गरज बनला आहे. स्मार्टफोन बंद पडला, खराब झाला किंवा पाण्यात पडला तर तो पुन्हा सुरू करण्यासाठी सर्वात आधी घरगुती उपाय केले जातात. पण इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसच्या बाबतीत अशा प्रकारे घरगुती उपाय कारण खरंच योग्य आहे का?
आपला स्मार्टफोन जेव्ह पाण्यात पडतो, अशावेळी आपण त्याला एखाद्या मोबाईल रिपेअर स्टोअरमध्ये घेऊन जाण्याऐवजी तांदळाच्या डब्यात ठेवतो. यामुळे तांदूळ स्मार्टफोनमध्ये असलेलं पाणी शोषून घेतो आणि स्मार्टफोन पुन्हा आधीसारखा काम करण्यास सुरुवात करतो. पण काही घटनांमध्ये असं करण धोकादायक ठरू शकत, असा अंदाज तज्ञांनी वर्तवला आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
पाण्याच्या संपर्कात आल्याने स्मार्टफोनची बॅटरी खराब होऊ शकते तसेच फोन काम करणे देखील थांबवू शकतो. याच भीतीने बहुतेक लोक त्यांचा फोन पाण्यात पडल्यावर तांदळाच्या डब्यात ठेवतात. पण हे करणे योग्य आहे का? जर फोन पाण्यात पडला तर तो तांदळात ठेवून आपण खरोखर पैसे वाचवू शकतो का? यात किती तथ्य आहे ते आपण जाणून घेऊया?
खरंतर, जर फोन पाण्यात पडला तर बहुतेक लोक तो तांदळात ठेवतात जेणेकरून तांदूळ फोनचा ओलावा लवकर शोषून घेऊ शकेल. जर फोन पाण्याच्या संपर्कात आला असेल तर तो तांदळाच्या डब्यात ठेवल्याने काही प्रमाणात मदत होऊ शकते. तथापि, बहुतेक तज्ञांचा असा विश्वास आहे की कच्च्या तांदळाचा वापर करून ओल्या वस्तू वाळवू नयेत. कच्चा तांदूळ फोनमधील पाणी योग्यरित्या शोषू शकत नाही.
असे मानले जाते की लोकं जितका विचार करतात तितका तांदूळ प्रभावी नाही. तांदूळ हळूहळू ओलावा शोषून घेते, त्यामुळे पाणी फोनमध्ये जास्त काळ राहू शकते. इतकेच नाही तर असे केल्याने तांदूळ चार्जिंग पोर्ट इत्यादींमध्ये अडकू शकतो आणि यामुळे फोनचा ब्लास्ट होण्याची देखील शक्यता असते. त्यामुळे जर फोन पाण्यात पडला असेल तर तो तांदळाच्या डब्यात न ठेवता तुम्ही इतर उपाय देखील वापरू शकता.
जर फोन पाण्यात पडला आणि तरीही चालू असेल तर फोन ताबडतोब बंद करा. फोन बंद केल्याने शॉर्ट सर्किट होण्याची शक्यता कमी होते.
जर फोन पाण्यात पडला तर तो ताबडतोब कोरड्या कापडाने पुसून टाका परंतु फोनचा चार्जिंग सॉकेट, स्पीकर आणि हेडफोन जॅक व्यवस्थित स्वच्छ केले आहेत याची खात्री करा. फोनच्या चार्जिंग सॉकेटमध्ये पाणी राहिल्यास स्मार्टफोन चार्ज करताना ब्लास्ट होऊ शकतो किंवा इतर समस्या देखील निर्माण होऊ शकतात.
जर फोन पाण्यात पडला तर त्याचे कव्हर आणि स्क्रीन गार्ड काढून टाका आणि ताबडतोब 5 ते 7 तास उन्हात ठेवा.
जर तुमच्या घरी हेअर ड्रायर असेल तर फोन ताबडतोब सुकविण्यासाठी हेअर ड्रायरची मदत घ्या. कमीत कमी 10 ते 15 मिनिटे हेअर ड्रायर संपूर्ण फोन स्क्रीनवर पूर्णपणे फिरवा.