Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

यूजर्ससाठी आनंदवार्ता! आता WhatsApp न उघडताच पाठवू शकता व्हाईस मेसेज, ॲपवर लवकरच येत आहे भन्नाट फिचर

व्हॉट्सॲप अँड्रॉइड यूजर्ससाठी एक नवीन फिचर विकसित करत आहे. या फीचरमुळे व्हॉइस मेसेज पाठवण्याची प्रक्रिया अधिक जलद आणि सोपी होणार असून यूजर्सना ॲप उघडण्याचीही गरज भासणार नाही.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 18, 2026 | 10:20 AM
यूजर्ससाठी आनंदवार्ता! आता WhatsApp न उघडताच पाठवू शकता व्हाईस मेसेज, ॲपवर लवकरच येत आहे भन्नाट फिचर

यूजर्ससाठी आनंदवार्ता! आता WhatsApp न उघडताच पाठवू शकता व्हाईस मेसेज, ॲपवर लवकरच येत आहे भन्नाट फिचर

Follow Us
Follow Us:
  • होम स्क्रीनवरून थेट व्हॉइस नोट रेकॉर्ड करून पाठवता येणार.
  • वेळ वाचवण्यासाठी नवीन व्हिजेटवर कंपनीचे काम सुरू.
  • स्टेटस अपडेटसाठीही स्वतंत्र होम स्क्रीन विजेट येण्याची शक्यता.
आपल्या यूजर्सचा अनुभव सुधारण्यासाठी व्हाॅट्सॲप नवनवीन फिचर्स घेऊन येत आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, Android यूजर्ससाठी व्हाॅट्सॲप एक नवीन फिचर घेऊन येत आहे. या फिचरच्या मदतीने आता यूजर्सना आणखीन सहजपणे व्हाईस मेसेज पाठवता येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी एक असे होम स्क्रीन विजेट विकसित करत आहे, जे वापरकर्त्यांना व्हाॅट्सॲप ॲप न उघडताच व्हॉइस नोट्स रेकॉर्ड करून पाठवण्याची सुविधा देईल.

WhatsApp Update: डेस्कटॉप यूजर्सची प्रतीक्षा संपणार! आता लॅपटॉपमधून होणार व्हॉट्सअ‍ॅप कॉलिंग… नव्या फीचरची चाचणी सुरु

व्हाॅट्सॲपच्या या नव्या फिचरची माहिती WABetaInfo या वेबसाईटने आपल्या रिपोर्टमध्ये शेअर केली आहे. त्यांनी यात सांगितले की, हे आगामी फीचर गूगल प्ले स्टोअरवरील अँड्रॉइडसाठीच्या व्हॉट्सॲप बीटाच्या 2.26.24.2 अपडेटमध्ये दिसून आले आहे. हे व्हिजेट सध्या डेव्हलपमेंट फेजमध्ये असून याचे काम सुरु करण्यात आले आहे. हे फिचर अद्याप बीटा टेस्टर्सपर्यंत पोहचले नाही आहे परंतु यावरून आपल्याला कल्पना येते की व्हॉट्सॲप वारंवार वापरली जाणारी फीचर्स अधिक सुलभ बनवण्याची कशी योजना आखत आहे.

नवीन फिचर वाचवेल वेळ

नवीन व्हिजेट डायरेक्ट होम स्क्रिनवर दिसून येईल ज्यामुळे व्हाईस मेसेज पाठवण्यासाठी तुम्हाला ॲप ओपन करण्याची गरज भासणार नाही. या फिचरच्या मदतीने यूजर्स व्हिजेटवर क्लिक करुनच आपला व्हाईस रेकाॅर्ड करु शकतात आणि नंतर त्याला सेंड करु शकतात. या व्हिजेटद्वारे एकाच वेळी अनेकांना व्हाईस नोट पाठवण्यात येण्याची सुविधा असेल अशी अपेक्षा आहे. हे फिचर त्या यूजर्ससाठी अधिक फायद्याचे ठरेल जे दिवसभर एकाहून अधिक व्हाईस मेसेजेस पाठवत असतात. या फिचरच्या मदतीने त्यांना व्हॉट्सॲप उघडून, चॅट शोधून, आणि मग रेकॉर्डिंग सुरू करण्याची गरज भासणार नाही.

होम स्क्रिन व्हिजेट

माहितीनुसार, व्हाॅट्सॲप फक्त व्हाईस मेसेज व्हिजेटवर काम करत नाहीये तर कंपनी स्टेटस अपडेट करण्यासाठी वेगवेगळ्या होम स्क्रिन व्हिजेटवरही काम करत आहे. याच्या मदतीने यूजर्सना स्टेटस एक्टिव्हीटी पाहण्यासाठी किंवा नवीन स्टेटस अपडेट करण्यासाठी ॲप खोलण्याची गरज भासणार नाही तुम्ही सहज होम स्क्रिनवरुन या गोष्टी हाताळू शकता.

NEET परीक्षेपूर्वी बंदीच्या निर्णयाविरोधात ‘Telegram’ थेट हायकोर्टात; तातडीने सुनावणी घेण्याची विनंती मंजूर!

अधिकृत घोषणा झाली नाही

व्हाॅट्सॲप मेसेज व्हिजेट अजूनही डेव्हलपमेंट स्टेजवर असून कंपनीने याविषयी आतापर्यंत कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही. यासोबतच नवे फिचर यूजर्ससाठी कधीपर्यंत उपलब्ध केले जाईल याचीही अधिकृत माहिती समोर आली नाही. हे फीचर व्यापक स्तरावर उपलब्ध करण्यापूर्वी प्रथम बीटा टेस्टर्ससाठी उपलब्ध होईल अशी अपेक्षा आहे.

 

Web Title: Whatsapp voice message widget feature android users home screen shortcut update marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2026 | 10:20 AM

Topics:  

  • Tech News
  • TECH TIPS
  • WhatsApp

संबंधित बातम्या

AI च्या युगातील मानसिक आरोग्य! बंगळुरुमधील MindTech Summit 2026 मध्ये तज्ज्ञ एकवटले, भविष्यावर चर्चा
1

AI च्या युगातील मानसिक आरोग्य! बंगळुरुमधील MindTech Summit 2026 मध्ये तज्ज्ञ एकवटले, भविष्यावर चर्चा

Tech Tips: नवीन स्मार्टफोन खरेदी केल्यानंतर पहिल्यांदाच किती वेळ अन् किती टक्के चार्ज करणं ठरणार योग्य? काय आहे नियम? वाचा सविस्तर
2

Tech Tips: नवीन स्मार्टफोन खरेदी केल्यानंतर पहिल्यांदाच किती वेळ अन् किती टक्के चार्ज करणं ठरणार योग्य? काय आहे नियम? वाचा सविस्तर

Second Hand iPhone: सेकंड हँड किंवा रिफर्बिशड आयफोन खरेदी करण्याचा प्लॅन करताय? थांबा, खरेदीपूर्वी असा तपासा वॉरंटी स्टेटस
3

Second Hand iPhone: सेकंड हँड किंवा रिफर्बिशड आयफोन खरेदी करण्याचा प्लॅन करताय? थांबा, खरेदीपूर्वी असा तपासा वॉरंटी स्टेटस

COEP आणि ARAI चा ऐतिहासिक निर्णय! देशातील पहिले ‘प्रगत श्रमदक्षता शास्त्र’ संशोधन केंद्र पुण्यात उभारणार
4

COEP आणि ARAI चा ऐतिहासिक निर्णय! देशातील पहिले ‘प्रगत श्रमदक्षता शास्त्र’ संशोधन केंद्र पुण्यात उभारणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.