आता WhatsApp ही बनलं जाहिरातींचं केंद्र! Status ओपन करताच दिसणार Ads, Meta चा नवा प्लॅन युजर्ससाठी ठरणार का डोकेदुखी?
टेक जायंट कंपनी Meta सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबूक आणि इंस्टाग्रामद्वारे मोठी कमाई करते. या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसोबतच आता आणखी एक नवीन अॅप जोडलं जाणार आहे. आता WhatsApp देखील मेटासाठी कमाईचे एक मोठं साधन बनलं आहे. WhatsApp स्टेटसमध्ये आता लवकरच बदल केला जाणार आहे. कंपनीने त्यांच्या लेटेस्ट Android Beta वर्जन 2.25.21.11 मध्ये दोन नवीन फिचर्स सादर केले जाणार आहेत. यामध्ये Status Ads आणि Promoted Channels यांचा समावेश असणार आहे.
कंपनीने घेतलेला हा निर्णय WhatsApp ची आतापर्यंतची सर्वात मोठी मॉनेटाइजेशन स्ट्रॅटेजी मानली जात आहे. या नवीन स्ट्रॅटेजीमुळे बिजनेस आणि कंटेंट क्रिएटर्सना त्यांचे प्रोडक्ट्स आणि सर्विसेज प्रमोट करण्याची संधी मिळणार आहे. म्हणजेच आता इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मप्रमाणेच WhatsApp स्टेटसवर देखील जाहिराती दिसणार आहेत. खरं तर कंपनीने त्यांच्या WhatsApp युजर्ससाठी अनेक फीचर्स लाँच केले आहेत. हे फीचर्स युजर्ससाठी वरदान ठरत आहेत. मात्र आता सादर केलं जाणार अपडेट युजर्ससाठी वरदान ठरणार की डोकेदुखी, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
नवीन अपडेटमुळे बिजनेस आणि कंटेंट क्रिएटर्सना त्यांचे प्रोडक्ट्स आणि सर्विसेज प्रमोट करण्याची संधी मिळणार असली तरी देखील सामान्य युजर्ससाठी हे फीचर डोकेदुखी ठरू शकते. त्यामुळे आता मेटा या समस्येवर काय निर्णय घेणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. Meta ने दावा केला आहे की, जाहिराती फक्त अपडेट्स टॅब (स्टेटस आणि चॅनेल) पुरत्या मर्यादित असतील. खाजगी चॅट्स किंवा ग्रुप्समध्ये कोणत्याही जाहिराती दिसणार नाहीत.
नव्या अपडेटमध्ये प्रामुख्याने तीन नवे Ad फॉर्मेट्स असणार आहेत.
या सर्व जाहिराती सध्या फक्त निवडक अँड्रॉइड बीटा टेस्टर्सना दाखवल्या जात आहेत. लवकरच हे अपडेट सर्व युजर्ससाठी जारी केलं जाऊ शकतं.
आता बिझनेस अकाऊंट युजर्स Status फीडमध्ये स्पॉन्सर्ड कंटेंट पाहू शकणार आहेत. या जाहिराती तुमच्या मित्र आणि कुटूंबियांच्या स्टेटस अपडेट्समध्ये पाहायला मिळणार आहेत. ज्याप्रमाणे Instagram Stories मध्ये जाहिराती दिसतात, त्याचप्रमाणे आता WhatsApp स्टेटसमध्ये देखील स्पॉन्सर्ड कंटेंट दिसणार आहे. तथापि, यावर “स्पॉन्सर्ड ” असे लेबल लावले जाईल जेणेकरून यूजरना कळेल की हे प्रमोशनल कंटेंट आहे.
WhatsApp आता अॅपच्या चॅनेल डायरेक्टरी विभागात काही Public Channels ना प्रमोटेड रूपमध्ये दाखवणार आहे. म्हणजेच एखाद्या चॅनेलला प्रसिद्धी मिळवण्याची इच्छा असेल, तर ते पैसे देऊन चॅनेल प्रमोट करू शकतात. इथे देखील युजर्सना Sponsored टॅग दिसणार आहे.
WhatsApp लवकरच पेड सब्सक्रिप्शनवाले चॅनल्स देखील प्रमोट करणार आहे, ज्यामुळे हे चॅनेल्स जास्तीत जास्त युजर्सपर्यंत पोहोचू शकतील.