
Smartphone Tips: रोज की आठवड्यातून एकदा.... फोनची स्क्रीन कधी स्वच्छ करावी? तुमची एक चूक आणि होईल मोठं नुकसान
ट्रेनमध्ये, बसमध्ये, रस्त्यावर देखील आपण स्मार्टफोनचा वापर करतो. यामुळे स्मार्टफोनच्या स्क्रीनवर धूळ, घाम, फेस ऑयल इत्यादी जमा होते. यामुळे हाइजिनची चिंता देखील वाढते. अशावेळी काही लोकं सतत त्यांच्या स्मार्टफोनची स्क्रीन साफ करतात. पण यामुळे तुमच्या स्मार्टफोनचे नुकसान देखील होऊ शकतं. त्यामुळे स्क्रीन कधी साफ करावी, दिवसातून आणि आठवड्यातून स्मार्टफोनच्या स्क्रीनची किती वेळा स्वच्छता करावी याबाबत प्रत्येक स्मार्टफोन यूजरला माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा तुमच्या एका चुकीच्या सवयीमुळे स्मार्टफोनचं नुकसान होऊ शकतं. (फोटो सौजन्य – Pinterest)
जर तुम्ही बस, ट्रेन किंवा एखाद्या सार्वजनिक ठिकाणाहून परतत असाल तर अशा परिस्थितीत स्क्रीनवर धूळ, माती आणि घाम इत्यादी जमा होते. अशावेळी तुम्ही घरी येताच तुमच्या स्मार्टफोनची स्क्रीन स्वच्छ करू शकता. यासाठी माइक्रोफाइबर किंवा कॉटन सारख्या कपड्यांचा वापर करून स्मार्टफोनच्या स्क्रीनची स्वच्छता केली जाऊ शकते. कपडा थोडा ओला करा आणि स्क्रीनवर हळूवारपणे फिरवा. स्क्रीन साफ करताना त्यावर कोणताही द्रव फवारला जाणार नाही किंवा दाब दिला जाणार नाही याची काळजी घ्या. अन्यथा स्मार्टफोनचा डिस्प्ले खराब होण्याची शक्यता असते.
जर तुम्ही बाथरुम, किचन किंवा मार्केट यासारख्या ठिकाणी स्मार्टफोनचा वापर करत असाल, तर अशावेळी स्मार्टफोन स्वच्छ करण्याचा सल्ला दिला जातो. पण जर तुम्ही घराबाहेर जात नसाल आणि घरीच फोनचा वापर करत असाल तर तुम्ही आठवड्यातून एकदा स्मार्टफोन स्वच्छ करू शकता. यासाठी तुम्ही बाजारात उपलब्ध असलेल्या डिसइंफेक्टेंट लिक्विडचा वापर करू शकता. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की, स्मार्टफोन स्वच्छ करताना लिक्विड थेट फोनच्या संपर्कात येऊ नये. तसेच, तुमचा फोन स्वच्छ करताना हार्ड केमिकल वापरणे टाळा. हार्ड केमिकल वापरल्याने काही दिवसांतच फोनचा रंग फिका पडेल आणि तुम्हाला पुन्हा खर्च करावा लागू शकतो.