Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tech Tips: एक क्लिक… आणि सगळं गायब! फोन Factory Reset कधी करावा? तुमचे एक पाऊल ठरू शकते मोठी चूक

Smartphone Factory Reset : तुम्ही देखील छोट्या - छोट्या समस्यांसाठी स्मार्टफोन फॅक्ट्री रिसेट करता का? तुमची ही सवय तुमच्यासाठी अतिशय घातक ठरू शकते. कारण सतत फॅक्ट्री रिसेट करणं स्मार्टफोनसाठी धोकादायक ठरू शकतं.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 25, 2026 | 10:45 AM
Tech Tips: एक क्लिक… आणि सगळं गायब! फोन Factory Reset कधी करावा? तुमचे एक पाऊल ठरू शकते मोठी चूक

Tech Tips: एक क्लिक… आणि सगळं गायब! फोन Factory Reset कधी करावा? तुमचे एक पाऊल ठरू शकते मोठी चूक

Follow Us
Close
Follow Us:
  • स्मार्टफोनच्या प्रत्येक समस्येवरील उपाय फॅक्ट्री रिसेट नसतो
  • स्मार्टफोनच्या वापरासोबतच त्याची स्पीड थोडी स्लो होणं अतिशय सामान्य
  • या स्मार्टफोन सोडवण्यासाठी फॅक्ट्री रिसेटचा पर्याय निवडणं योग्य
स्मार्टफोनचा वापर करताना छोट्या – छोट्या गोष्टींमध्ये समस्या येणं, अतिशय सामान्य गोष्ट आहे. कधी स्मार्टफोन थोडा स्लो होतो, तर कधी हँग होतो, तर कधी स्मार्टफोनमधील अ‍ॅप्स योग्य पद्धतीने काम करत नाहीत किंवा काहीवेळेस स्मार्टफोनचे स्टोरेज फुल होतं. या सर्व समस्यांवरील उपाय म्हणून काही लोकं थोडाही विचार न करता स्मार्टफोन फॅक्ट्री रिसेट करतात. फॅक्ट्री रिसेट केल्यावर स्मार्टफोन अतिशय वेगाने काम करतो असं अनेकांना वाटतं. पण स्मार्टफोनच्या प्रत्येक समस्येवरील उपाय फॅक्ट्री रिसेट नसतो.

Confer Launch: डेटा लीकची भीती संपली! Signal फाऊंडरने लाँच केला जगातील सर्वात सुरक्षित AI चॅटबोट, प्रायव्हसीवर असणार फोकस

फॅक्ट्री रिसेटचा पर्याय योग्य आहे का?

स्मार्टफोनच्या वापरासोबतच त्याची स्पीड थोडी स्लो होणं अतिशय सामान्य आहे. आपण रोज फोनमध्ये अनेक फोटो, व्हिडीओ, फाईल्स सेव्ह करतो. विविध अ‍ॅप्सचा वापर करतो. यामुळे स्मार्टफोनमधील डेटा वाढतो आणि स्मार्टफोन स्लो होऊ लागतो. या स्मार्टफोन सोडवण्यासाठी फॅक्ट्री रिसेटचा पर्याय निवडणं खरंच योग्य आहे का? मात्र, सत्य असं आहे की, स्मार्टफोनवरील प्रत्येक समस्येचा उपाय फॅक्ट्री रिसेट करणं नाही. (फोटो सौजन्य – Pinterest)

प्रोसेस वारंवार फॉलो करावी लागेल

प्रत्येक छोट्या समस्येसाठी स्मार्टफोन फॅक्ट्री रिसेट करत असाल तर यामुळे इतर काही समस्या निर्माण होऊ शकतात. स्मार्टफोन फॅक्ट्री रिसेट केल्यानंतर सर्व महत्त्वाच्या फाइल्सचा बॅकअप घेणं, डेटा पुन्हा ट्रांसफर करणं आणि स्मार्टफोनमधील सर्व अ‍ॅप्स पुन्हा इंस्टॉल करण्यासाठी काही कालावधी लागू शकतो. ही संपूर्ण प्रक्रिया अतिशय किचकट असते. जर तुम्ही वारंवार तुमचा स्मार्टफोन फॅक्ट्री रिसेट करत असाल तर तुम्हाला ही सर्व प्रोसेस वारंवार फॉलो करावी लागेल आणि यामुळे तुमचा अनुभव पूर्ण खराब होऊ शकतो.

अशावेळी निवडा फॅक्ट्री रिसेटचा पर्याय

प्रत्येकवेळी स्मार्टफोन फॅक्ट्री रिसेट करणं योग्य नसतं. पण काही कठीण परिस्थितीत तुम्ही हा पर्याय निवडू शकता. उदारहणार्थ, जेव्हा तुम्हाला तुमचा फोन विकायचा असेल किंवा नवीन स्मार्टफोन खरेदी करताना तुम्ही जुना स्मार्टफोन एक्सचेंज करत असाल तर अशावेळी तुम्ही फॅक्ट्री रिसेटचा पर्याय निवडू शकता. अशा परिस्थितीत, तुमची वैयक्तिक माहिती इतर कोणाच्याही हाती लागू नये म्हणून फॅक्टरी रीसेट करणे खूप महत्वाचे आहे.

Sony चा हटके प्रयोग! कंपनीने लाँच केले क्लिप स्टाईलवाले ईयरबड्स; तब्बल 37 तासांची बॅटरी लाईफ आणि बरंच काही… वाचा किंमत

या समस्यांवर उपाय म्हणून तुम्ही फॅक्ट्री रिसेटचा पर्याय निवडू शकता

याशिवाय जर तुमचा स्मार्टफोन गरजेपेक्षा जास्त हँग होत असेल आणि तुम्हाला सतत सामान्य उपाय जसे कैश क्लियर करणं किंवा नको असलेले अ‍ॅप्स हटवणं अशी काम करावी लागत असतील तर अशा सर्व समस्यांवर उपाय म्हणून तुम्ही फॅक्ट्री रिसेटचा पर्याय निवडू शकता. कधीकधी, नवीन सॉफ्टवेअर अपडेट इन्स्टॉल केल्यानंतर, तुमचा फोन पूर्वीपेक्षा हळू किंवा अधिक अस्थिर होतो. अपडेटनंतर समस्या कायम राहिल्यास, फॅक्टरी रीसेट केल्याने समस्या सोडवता येते. तसेच जर तुमच्या स्मार्टफोनमध्ये वायरस किंवा मालवेयर गेला असेल किंवा एखाद्या थर्ड पार्टी वेबसाईटद्वारे डाऊनलोड केलेली फाईल तुमच्या स्मार्टफोनला नुकसान पोहोचवत असेल तर अशावेळी फॅक्ट्री रिसेटचा पर्याय निवडणं योग्य ठरतं. जेव्हा खरंच गरज असेल किंवा एखादी मोठी समस्या निर्माण झाली असेल तर तुम्ही फॅक्ट्री रिसेट करू शकता. पण सतत फॅक्ट्री रिसेट केल्यास स्मार्टफोनला नुकसान पोहोचू शकतं.

Web Title: When to do smartphone factory reset what is the right time know in details tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 25, 2026 | 10:45 AM

Topics:  

  • smartphone
  • smartphone tips
  • TECH TIPS

संबंधित बातम्या

Vivo V70: लाँचपूर्वीच Leak झाली विवोच्या आगामी स्मार्टफोन सीरीजची किंमत, दमदार बॅटरीसह भारतात करणार एंट्री
1

Vivo V70: लाँचपूर्वीच Leak झाली विवोच्या आगामी स्मार्टफोन सीरीजची किंमत, दमदार बॅटरीसह भारतात करणार एंट्री

अ‍ॅप डाउनलोडमध्ये भारत आघाडीवर, मायक्रोड्रामा प्लॅटफॉर्मचीही झपाट्याने वाढ! जाणून घ्या सविस्तर
2

अ‍ॅप डाउनलोडमध्ये भारत आघाडीवर, मायक्रोड्रामा प्लॅटफॉर्मचीही झपाट्याने वाढ! जाणून घ्या सविस्तर

iQOO 15R vs OnePlus 15R: मिड-रेंज किंमतीत कोणता स्मार्टफोन ऑफर करणार दमदार फीचर्स? वाचा संपूर्ण तुलना
3

iQOO 15R vs OnePlus 15R: मिड-रेंज किंमतीत कोणता स्मार्टफोन ऑफर करणार दमदार फीचर्स? वाचा संपूर्ण तुलना

Realme Neo 8: अखेर तो क्षण आलाच! 8,000mAh बॅटरी आणि 80W फास्ट चार्जिंगसह चीनमध्ये स्मार्टफोनची एंट्री, वाचा फीचर्स
4

Realme Neo 8: अखेर तो क्षण आलाच! 8,000mAh बॅटरी आणि 80W फास्ट चार्जिंगसह चीनमध्ये स्मार्टफोनची एंट्री, वाचा फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.