Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ स्मार्टफोन्सना मिळणार Android 16 अपडेट! लाइव्ह प्रोग्रेस इंडिकेटरपासून मल्टीटास्किंगपर्यंत मिळणार बरंच काही

येत्या काही दिवसांतच Android 16 सर्वांसाठी रिलीज केलं जाण्याची शक्यता आहे. Android 16 अपडेटचे काही अपेक्षित फीचर्स आणि हे अपडेट कोणत्या स्मार्टफोन्ससाठी उपलब्ध असेल याबाबत माहिती समोर आली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 24, 2025 | 10:51 AM
'या' स्मार्टफोन्सना मिळणार Android 16 अपडेट! लाइव्ह प्रोग्रेस इंडिकेटरपासून मल्टीटास्किंगपर्यंत मिळणार बरंच काही

'या' स्मार्टफोन्सना मिळणार Android 16 अपडेट! लाइव्ह प्रोग्रेस इंडिकेटरपासून मल्टीटास्किंगपर्यंत मिळणार बरंच काही

Follow Us
Close
Follow Us:

टेक जायंट कंपनी गूगलने Google I/O 2025 ईव्हेंटचं आयोजन केलं आहे. या ईव्हेंटमध्ये अनेक नवीन डिव्हाईस लाँच केले जाण्याची शक्यता आहे. शिवाय आणखी एक आनंदाची गोष्ट म्हणजेच या ईव्हेंटमध्ये Android 16 अपडेट देखील रिलीज केलं जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा ईव्हेंट अँड्रॉईड युजर्ससाठी अतिशय खास असणार आहे. कंपनीने अद्याप याबात कोणतीही अधिकृत घोषणा केली नसली, तरी अशी शक्यता वर्तवली जात आहे. शिवाय Android 16 अपडेटचे काही फीचर्स देखील समोर आले आहेत.

Apple iPhone Update: Apple च्या फोल्डेबल iPhone बाबत समोर आली मोठी अपडेट, अशी असू शकते हटके डिझाईन

गुगलने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये Android 16 चा पहिला डेव्हलपर प्रिव्ह्यू रिलीज केला. यासोबतच, कंपनीने त्यांचा पहिला पब्लिक बीटा देखील लाँच केला आहे.आता लवकरच Android 16 अपडेट सर्व अँड्रॉईड युजर्ससाठी रिलीज केलं जाण्याची शक्यता आहे. (फोटो सौजन्य – Pinterest) 

Android 16 रिलीज टाइमलाइन

  • डेवलपर प्रीव्यू 1 – 18 नोव्हेंबर 2024
  • पब्लिक बीटा 1 – 23 जानेवारी 2025
  • प्लेटफॉर्म स्टेबिलिटी – मार्च 2025 (अपेक्षित)
  • फायनल स्टेबल वर्जन – मे 2025 नंतर

अशी माहिती समोर आली आहे की, Android 16 अपडेट प्रथम गुगल पिक्सेल डिव्हाइसेसाठी रिलीज केले जाईल. यानंतर, सॅमसंग, वनप्लस, शाओमी, विवो आणि इतर स्मार्टफोन कंपन्या त्यांच्या युजर्ससाठी अपडेट आणतील. चला तर मग Android 16 अपडेट कोणत्या स्मार्टफोन्ससाठी रिलीज केलं जाणार आहे, याबाबत जाणून घेऊया.

या स्मार्टफोन्सना मिळणार Android 16 अपडेट

Google Pixel

  • Pixel 9 सीरीज आणि Pixel 9 Pro Fold
  • Pixel 8 सीरीज
  • Pixel 7 सीरीज
  • Pixel 6 सीरीज
  • Pixel Fold आणि Pixel Tablet

Samsung

  • Galaxy S25, S24, S23, S22 सीरीज
  • Galaxy Z Fold6, Fold5, Fold4
  • Galaxy Z Flip6, Flip5, Flip4
  • Galaxy A73, A55, A54, A53, A35, A34, A33, A25, A24 5G, A16, A15 5G
  • Galaxy M55, M54, M35, M34, M33, M15

OnePlus

  • OnePlus 13, 12, 11, 10 सीरीज
  • OnePlus Open
  • OnePlus Nord 4, Nord CE 4, Nord CE 3 सीरीज

Xiaomi आणि POCO

  • Xiaomi 14, 13 सीरीज
  • Redmi K70, K60, Note 14, Note 13 सीरीज
  • POCO F6, F5, X6, X5, M6 सीरीज

Vivo आणि iQOO

  • Vivo X200, X100 Ultra, X100s सीरीज
  • Vivo Fold3
  • Vivo V40, V30, V29 सीरीज
  • iQOO Neo 9, iQOO 12 सीरीज

Android 16 अपडेटचे अपेक्षित फीचर्स

लाईव्ह प्रोग्रेस इंडिकेटर: आता गुगल मॅप्स, उबर, स्विगी आणि इतर ट्रॅकिंग अ‍ॅप्ससाठी स्टेटस बारमध्ये लाईव्ह अपडेट्स दिले जाऊ शकतात. लाईव्ह प्रोग्रेस इंडिकेटर युजर्सना त्यांच्या ट्रिप किंवा ऑर्डरचे स्टेटस सहजपणे पाहण्याची परवानगी देईल.

फोल्डेबल स्मार्टफोनसाठी उत्तम मल्टीटास्किंग सपोर्ट: Android 16 फोल्डेबल स्मार्टफोनसाठी उत्तम मल्टीटास्किंग फीचरला सपोर्ट करेल. याद्वारे, युजर्स स्क्रीनवर एकाच वेळी दोन किंवा अधिक अ‍ॅप्स वापरू शकतील.

एडवांस प्राइवेसी आणि सिक्योरिटी अपडेट: Android 16 युजर्सच्या प्राइवेसीसाठी आणि सिक्योरिटीसाठी एक सँडबॉक्स प्रदान करेल. यासोबतच, आरोग्य डेटा साठवण्यासाठी एक नवीन सुविधा उपलब्ध होईल.

थर्ड-पार्टी कॅमेरा अ‍ॅप्समध्ये नाईट मोड: आता युजर्सना इंस्टाग्राम आणि स्नॅपचॅट सारख्या अ‍ॅप्समध्येही नाईट मोडचा सपोर्ट मिळेल. यामुळे कमी प्रकाशात फोटोग्राफी आणखी चांगली होईल.

Apple ला टक्कर देण्यासाठी Google ची मोठी तयारी, अमेरिकेनंतर आता ‘या’ देशातही सुरु करणार रिटेल स्टोअर

बॅटरी लाइफ आणि परफॉर्मन्स सुधारणा: Android 16 बद्दलच्या अहवालांमध्ये असा दावा केला जात आहे की बॅकग्राउंडमध्ये चालणारे अ‍ॅप्स कमी बॅटरी वापरतील. यासोबतच, युजर्सना चांगले पॉवर मॅनेजमेंट मिळेल आणि ते जलद चार्जिंगला सपोर्ट करेल.

Web Title: Which smartphones will get android 16 updates what will be its features know in detail tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2025 | 10:51 AM

Topics:  

  • android users
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Made by Google 2025: अवघे काही तास शिल्लक! लवकरच सुरु होणार Google चा सर्वात मोठा टेक ईव्हेंट, हे गॅझेट्स होणार लाँच
1

Made by Google 2025: अवघे काही तास शिल्लक! लवकरच सुरु होणार Google चा सर्वात मोठा टेक ईव्हेंट, हे गॅझेट्स होणार लाँच

Jio युजर्सना झटका! कंपनीने गुपचूप बंद केला हा बजेट-फ्रेंडली प्लॅन, आता दुसरा ऑप्शन कोणता? जाणून घ्या
2

Jio युजर्सना झटका! कंपनीने गुपचूप बंद केला हा बजेट-फ्रेंडली प्लॅन, आता दुसरा ऑप्शन कोणता? जाणून घ्या

Lava Play Ultra 5G: दमदार 5G बजेट स्मार्टफोन लवकरच करणार एंट्री, 64MP कॅमेरासह डेडिकेटेड गेमबूस्ट मोडने सुसज्ज
3

Lava Play Ultra 5G: दमदार 5G बजेट स्मार्टफोन लवकरच करणार एंट्री, 64MP कॅमेरासह डेडिकेटेड गेमबूस्ट मोडने सुसज्ज

सर्वसामान्यांना चुना लावण्यासाठी स्कॅमर्स पुन्हा सज्ज, Screen Mirroring Fraud चुटकीसरशी रिकामं करेल तुमचं बँक अकाऊंट
4

सर्वसामान्यांना चुना लावण्यासाठी स्कॅमर्स पुन्हा सज्ज, Screen Mirroring Fraud चुटकीसरशी रिकामं करेल तुमचं बँक अकाऊंट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.