Apple ला टक्कर देण्यासाठी Google ची मोठी तयारी, अमेरिकेनंतर आता 'या' देशातही सुरु करणार रिटेल स्टोअर
टेक जायंट कंपनी गुगल भारतात त्यांचे रिटेल स्टोअर्स ओपन करण्याचा विचार करत आहे. जगप्रसिद्ध स्मार्टफोन कंपनी अॅपलचे रिटेल स्टोअर्स भारतात आधीपासूनच सुरु करण्यात आले आहेत. शिवाय भारतीयांमध्ये अॅपल प्रोडक्ट्सची क्रेझ देखील प्रचंड आहे. काही महिन्यांपूर्वीच अॅपल कंपनीने स्टोअर्स वाढवण्याची योजना देखील आखली. या योजनेप्रमाणे पुणे, बेंगळुरू, दिल्ली-एनसीआर आणि मुंबई येथे चार नवीन स्टोअर्स सुरु करण्यात आले. त्यामुळे एकूणच भारतात अॅपलच्या रिटेल स्टोअर्समध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. मात्र आता अॅपलला टक्कर देण्यासाठी गुगल तयारी करत आहे.
VPN नक्की आहे तरी काय? हॅकर्सपासून वाचवतं की जाळ्यात अडकवतं? डाऊनलोड करण्यापूर्वी वाचा सविस्तर
अमेरिकेत गुगलचे रिटेल स्टोअर्स आधीपासूनच उपलब्ध आहेत. मात्र आता कंपनी त्याचा विस्तार करणार आहे. त्यामुळे आता भारतातील दोन प्रमुख शहरांत गुगलचे रिटेल स्टोअर्स सुरु केले जाणार आहेत. अमेरिकेबाहेर गुगल आपले रिटेल स्टोअर्स उघडण्याची ही पहिलीच वेळ असेल आणि कंपनीने यासाठी भारताची निवड केली आहे. म्हणजेच आता अमेरिकेनंतर भारतात गुगल रिटेल स्टोअर्स सुरु केले जाणार आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest)
रिपोर्ट्सनुसार, गुगल प्रथम नवी दिल्ली आणि मुंबईत आपले स्टोअर सुरु करण्याची योजना आखत आहे. या रिटेल स्टोअर्ससाठी जागा शोधण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. भारत हा गुगलसाठी प्रमुख बाजारपेठांपैकी एक मानला जातो. गुगल देशात 10 अब्ज डॉलर्स (सुमारे 86,759 कोटी रुपये) गुंतवणूक करणार आहे. गुगलकडे सध्या 5 फिजिकल रिटेल स्टोअर्स आहेत. हे सर्व अमेरिकेत आहेत. आता नवीन रिटेल स्टोअर्स भारतात सुरु केले जाणार आहेत.
भारतात आपले स्टोअर सुरु करून, गुगल पिक्सेल स्मार्टफोन, स्मार्टवॉच आणि इअरबड्स सारख्या उत्पादनांची विक्री वाढवू इच्छिते. कंपनी अॅपलसारख्या भारतीय ग्राहकांना एक चांगला खरेदी अनुभव देण्याची योजना आखत आहे. जगभरात अॅपलचे 500 हून अधिक रिटेल स्टोअर्स आहेत. ज्यामध्ये भारताचाही समावेश आहे. या रिटेल स्टोअर्समधून अॅपल प्रोडक्ट्सच्या विक्रीत लक्षणीय वाढ झाली आहे. आता याच अॅपल प्रोडक्ट्सला टक्कर देण्यासाठी गुगल सज्ज झाला आहे.
गुगल भारतात प्रथम दिल्ली आणि मुंबईत रिटेल स्टोअर्स सुरु करणार आहे. या रिटेल स्टोअर्सचे क्षेत्रफळ 15,000 चौरस फूट असण्याची अपेक्षा आहे. ही रिटेल स्टोअर्स उघडण्यासाठी 6 महिने लागू शकतात. दिल्ली आणि मुंबईसह, कंपनी बंगळुरूमध्ये आपले स्टोअर सुरु करू शकते. जर अहवालांवर विश्वास ठेवला तर, कंपनी दिल्ली एनसीआरमध्ये गुरुग्राम येथे स्टोअर उघडू शकते. उबर, मेटा आणि युनिक्लो सारख्या अनेक जागतिक कंपन्यांचे येथे आधीच स्टोअर्स आहेत. ज्यात आता गुगल स्टोअरची देखील भर पडणार आहे.
HP Laptop: गेमिंगची मजा आता आणखी वाढणार! HP ने भारतात लाँच केला नवा लॅपटॉप, किंमत वाचून फुटेल घाम
भारतात पिक्सेल स्मार्टफोनची किंमत सुमारे 30,000 रुपयांपासून सुरू होते आणि 1.6 लाख रुपयांपर्यंत जाते. दुसरीकडे, आयफोनची किंमत सुमारे 43,000 रुपयांपासून सुरू होते आणि 1.75 लाख रुपयांपर्यंत जाते. 2024 मध्ये भारतातील प्रीमियम स्मार्टफोन बाजारपेठेत अॅपलचा वाटा 55% असेल असा अंदाज आहे, तर पिक्सेलचा बाजार हिस्सा फक्त 2% होता. या वेगाने वाढणाऱ्या विभागात सुमारे 712 दशलक्ष स्मार्टफोन युजर्स आहेत. गुगल याला एक मोठी संधी म्हणून पाहत आहे.