whirlpool(फोटो सौजन्य- pinterest)
आजच्या धावपळीच्या जीवनात, ग्राहकांना वेळ वाचवणारी आणि त्यांच्या गरजा पूर्ण करणारी उपकरणे हवी असतात. त्यात किचन मध्ये जर वेळ वाचवणारी उपक्रम मिळाली तर अतिउत्तम. व्हर्लपूलचा हा नवीनतम शोध याच उद्देशाने डिझाइन केला आहे. किराणा सामानाचा साठा करणे असो, पार्टीची तयारी करणे असो किंवा अनपेक्षित पाहुणे येणे असो, वापरकर्त्यांना आता अतिरिक्त फ्रीज जागेसाठी तासन्तास वाट पाहावी लागणार नाही.
भारतापूर्वी या देशात सुरु होणार Elon Musk ची स्टारलिंक सेवा, आता सिमशिवाय वापरता येणार इंटरनेट
Whirlpool ने भारतातील सर्वात वेगवान कन्वर्टिबल रेफ्रिजरेटर लाँच केला आहे. इंटेलीफ्रेश प्रो सिरीज १० मिनिटांपेक्षा थोड्या जास्त वेळात फ्रीजरचे रेफ्रिजरेटरमध्ये रूपांतर करते. १०-इन-१ मोड्स आणि सिक्स्थ सेन्स टेक्नॉलॉजीमुळे, ते वेळ वाचवते आणि अन्न ताजे ठेवते. मायक्रोब्लॉक तंत्रज्ञान ९९% बॅक्टेरिया थांबवते. २३५L-३२७L क्षमतेमध्ये उपलब्ध, ही श्रेणी ३५,००० रुपयांपासून सुरू होते.
या रेफ्रिजरेटर श्रेणीमध्ये वेगवेगळ्या कूलिंग गरजा पूर्ण करण्यासाठी १०-इन-१ कन्व्हर्टिबल मोड्स आहेत. व्हर्लपूलच्या खास 6th सेन्स तंत्रज्ञानाने सुसज्ज, हा फोन तापमान, आर्द्रता आणि हवेचा प्रवाह आपोआप ओळखतो आणि फक्त एका बटणाने ऑप्टिमल कूलिंग प्रदान करतो.
ही आहेत मुख्य वैशिष्ट्ये :
सर्वात वेगवान कन्वर्जन: फ्रीजरमधून फ्रीजमध्ये फक्त १० मिनिटांत जाते.
१० रूपांतरित मोड: प्रत्येक प्रसंगासाठी अनेक स्टोरेज सेटिंग्ज.
सिक्स्थ सेन्स टेक्नॉलॉजी: स्मार्ट तापमान आणि आर्द्रता नियंत्रण.
प्रीमियम लूक: आकर्षक डिझाइन आणि एकसंध इंटीरियर.
वापरकर्ता-अनुकूल डिझाइन: प्रशस्त मांडणी आणि मजबूत काचेच्या शेल्फ.
या लाँचबद्दल कमेंट करतांना व्हर्लपूल ऑफ इंडियाचे वाइस प्रेसिडेंट (मार्केटिंग) नकुल तिवारी म्हणाले, ‘भारतात सर्वात वेगवान कन्वर्जन टेक्नोलॉजी सादर करताना आम्हाला आनंद होत आहे. या सुधारणांमुळे आधुनिक भारतीय घरांमध्ये अतुलनीय सुविधा येतील.”
IntelliFresh Pro टॉप-माउंट रेफ्रिजरेटर्स २३५ लिटर ते ३२७ लिटर क्षमतेमध्ये उपलब्ध आहेत, ज्यांचे एनर्जी रेटिंग २ ते ३ स्टार दरम्यान आहे. त्यांची किंमत ३५,००० रुपयांपासून सुरू होते.
ही रेंज आघाडीच्या रिटेल स्टोअर्स आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. यामध्ये व्हर्लपूलची अधिकृत वेबसाइट देखील समाविष्ट आहे. या लाँचसह, व्हर्लपूलने कंज्यूमर-सेंट्रिक इनोवेशनवर आपली पकड मजबूत केली आहे, प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरासाठी स्मार्ट, स्टायलिश आणि वेळ वाचवणारी उपकरणे देत आहे.