Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Elon Musk यांच्या ‘सुपरइंटेलिजन्स’ मिशनमध्ये भारतीयाची एन्ट्री! कोण आहेत देवेंद्र सिंह चपलोत?

OpenAI, Meta आणि Google सारख्या बड्या कंपन्यांना मागे टाकत 'सुपरइंटेलिजन्स' विकसित करण्याच्या शर्यतीत आता मस्क यांनी भारताच्या एका हुशार संशोधकावर विश्वास दाखवला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 15, 2026 | 02:54 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:
  • Elon Musk तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी क्रांती घडवून आणण्यास सज्ज
  • मस्क यांनी दाखवला भारताच्या हुशार संशोधकावर विश्वास
  • कोण आहेत देवेंद्र सिंह चपलोत?
Who is devendra singh chaplot : जगप्रसिद्ध उद्योजक Elon Musk यांची कंपनी ‘xAI’ सध्या तंत्रज्ञान क्षेत्रात एक मोठी क्रांती घडवून आणण्यासाठी सज्ज झाली आहे. OpenAI, Meta आणि Google सारख्या बड्या कंपन्यांना मागे टाकत ‘सुपरइंटेलिजन्स’ विकसित करण्याच्या शर्यतीत आता Elon Musk यांनी भारताच्या एका हुशार संशोधकावर विश्वास दाखवला आहे. आयआयटी बॉम्बेचे माजी विद्यार्थी देवेंद्र सिंह चपलोत यांची मस्क यांच्या टीममध्ये नियुक्ती करण्यात आली असून, ते आता ‘सुपरइंटेलिजन्स’ विकसित करण्यावर काम करणार आहेत.

3 स्टार की 5 स्टार AC? खिशाला परवडेल आणि वीज बील वाचवेल ‘हा’ स्वस्तात मस्त पर्याय

कोण आहेत देवेंद्र सिंह चपलोत?

देवेंद्र सिंह चपलोत हे फक्त एआय (AI) संशोधक नसून ते एक रोबोटिक्स एक्सपर्ट देखील आहेत. त्यांनी आयआयटी बॉम्बे येथून कॉम्प्युटर सायन्समध्ये पदवी पूर्ण केली आहे. त्यानंतर अमेरिकेतील प्रसिद्ध कार्नेगी मेलन युनिव्हर्सिटी (CMU) मधून त्यांनी मशीन लर्निंगमध्ये पीएचडी केली आहे. देवेंद्र यांचा अनुभव दांडगा आहे.  त्यांनी प्रसिद्ध एआय स्टार्टअप ‘Mistral AI’ च्या फाउंडिंग टीममध्ये काम केले आहे. याशिवाय, त्यांनी ‘फेसबुक एआय रिसर्च’ (FAIR) लॅबमध्ये रिसर्च सायंटिस्ट म्हणून मशीन लर्निंग, कॉम्प्युटर व्हिजन आणि रोबोटिक्स यांसारख्या अवघत क्षेत्रांत महत्त्वाचं योगदान दिलं आहे.

अनेक पुरस्कारांनी सन्मानित

देवेंद्र यांच्या स्कील मस्क यांच्या नजरेतून सुटले नाहीत. त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक मानाचे पुरस्कार पटकावले आहेत. यामध्ये त्यांच्या तुऱ्यात  CVPR-2019 PointNav, CVPR-2020 ObjectNav आणि ‘विजुअल-डूम एआय’ सारख्या स्पर्धांचा समावेश आहे. त्यांना प्रतिष्ठित ‘फेसबुक फेलोशिप अवॉर्ड’ देखील मिळाला आहे. त्यांच्या संशोधनाची दखल MIT टेक्नॉलॉजी रिव्ह्यू, टेकक्रंच आणि डेली मेलसारख्या जागतिक दर्जाच्या मीडिया प्लॅटफॉर्मने देखील घेतली आहे.

ट्वीटद्वारे फोटो शेअर करत घोषणा

देवेंद्र यांनी स्वतः सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर एक पोस्ट करत या निवडीची माहिती दिली. त्यांनी लिहिले की, “मी SpaceX आणि xAI मध्ये सामील होत आहे. एलन मस्क आणि त्यांच्या टीमसोबत ‘सुपरइंटेलिजन्स’ विकसित करण्यासाठी काम करण्यास मी अत्यंत उत्सुक आहे.” मस्क यांनीही त्यांचे स्वागत केले आहे.

I’m joining SpaceX and xAI, working closely with Elon and team to build superintelligence. Together SpaceX and xAI combine physical and digital intelligence under a leader who understands hardware at the deepest level. Add a high-agency culture with frontier-scale resources, and… pic.twitter.com/tjaPUjGUwK — Devendra Chaplot (@dchaplot) March 13, 2026

काय आहे ‘सुपरइंटेलिजन्स’?

सुपरइंटेलिजन्स म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे असे प्रगत रूप, जे तर्कशक्ती, सर्जनशीलता आणि समस्या निवारण यांसारख्या मानवी बुद्धिमत्तेच्या सर्व निकषांवर मानवाला मागे टाकू शकतं. हे केवळ माहिती देणारे यंत्र नसून, ते स्वतःहून शिकू शकतं आणि अधिक स्मार्ट बनू शकतं. हे तंत्रज्ञान भविष्यात विज्ञान, वैद्यकीय क्षेत्र आणि तंत्रज्ञान क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणू शकतं. एलन मस्क यांचा हा प्रयत्न तंत्रज्ञानाच्या जगात एक नवा इतिहास घडवू शकतो.

Appleचा फोल्डेबल iPhone! ‘या’ नावाने मार्केटमध्ये होणार एन्ट्री; मिळतील फिचर्स अन्…

Web Title: Who is devendra singh chaplot indian join elon musk xai team

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 15, 2026 | 02:54 PM

Topics:  

  • ai
  • Bombay IIT
  • elon musk
  • Tech News

संबंधित बातम्या

Free Fire MAX: गेममध्ये करताय Assault Rifle चा वापर? या टिप्स नेहमी लक्षात ठेवा, तुमचा विजय निश्चित
1

Free Fire MAX: गेममध्ये करताय Assault Rifle चा वापर? या टिप्स नेहमी लक्षात ठेवा, तुमचा विजय निश्चित

काय सांगता… हवेत इशारा करताच टाईप होणार मेसेज! Meta चे नवे स्मार्ट ग्लासेस ठरणार गेमचेंजर, असे आहेत फीचर्स
2

काय सांगता… हवेत इशारा करताच टाईप होणार मेसेज! Meta चे नवे स्मार्ट ग्लासेस ठरणार गेमचेंजर, असे आहेत फीचर्स

Recharge Plan Hike: पेट्रोल-डीझेलनंतर आता वाढणार रिचार्ज प्लॅनच्या किंमती? ग्राहकांच्या खिशावर वाढणार ताण? वाचा सविस्तर
3

Recharge Plan Hike: पेट्रोल-डीझेलनंतर आता वाढणार रिचार्ज प्लॅनच्या किंमती? ग्राहकांच्या खिशावर वाढणार ताण? वाचा सविस्तर

ChatGPT वर आलं नवं पर्सनल फाइनेंस फीचर! आता चॅटबोट ठेवणार तुमच्या पैशांचा हिशोब, थेट बँक अकाऊंट्सला होणार कनेक्ट
4

ChatGPT वर आलं नवं पर्सनल फाइनेंस फीचर! आता चॅटबोट ठेवणार तुमच्या पैशांचा हिशोब, थेट बँक अकाऊंट्सला होणार कनेक्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.