इंस्टाग्राम एक लोकप्रिय फोटो आणि व्हिडिओ शेअरिंग सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. विशेषतः तरुणांमध्ये याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. मेसेजिंग, फोटो शेअरिंगसोबतच याचा वापर व्हॉईस कॉलसाठीही केला जातो. आपल्या फीचर्समुळे हे प्लॅटफॉर्म तरुणांमध्ये फार चर्चित आहे. इथे युजर्सना मल्टिमीडिया कंटेंट पाहता आणि शेअर करता येतो. तथापि, इथे असेही काही लोक आहेत जे लोकांचा पाठलाग करण्यासाठी या व्यासपीठाचा वापर करतात. हे असे लोक आहेत जे तुमच्या फॉलोअर्सच्या यादीत नाहीत, पण ते शांतपणे तुमच्या प्रोफाईलवर जातात आणि तुमची ॲक्टिव्हिटी पाहत राहतात. ते गुपचूप तुमच्या अकाउंटवर नजर ठेवून असतात.
तुमच्या प्रोफाईलवर गुप्तपणे डोकावल्यामुळे तुमची प्रायव्हसी धोक्यात येऊ शकते. एवढेच नाही तर असे लोक तुमच्या ॲक्टिव्हिटींचा मागोवाही घेऊ शकतात. त्यामुळे प्रायव्हसी जपण्यासाठी अशा लोकांबाबत सजग राहणे अत्यंत आवश्यक आहे. तुम्हालाही तुमच्या इंस्टग्राम अकाउंटला स्टाॅक करणाऱ्या स्टाॅकर्सना शोधायचे असतील तर आजची ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे. आज आम्ही तुम्हाला या स्टाॅकर्सना कसे शोधायचे याची एक सोपी ट्रिक सांगणार आहोत.
टेक संबंधित बातम्या वाचण्यास इथे क्लिक करा
आम्ही तुम्हाला सांगतो की, जगभरातील लाखो लोक दररोज इंस्टाग्राम वापरतात. Meta च्या मालकीच्या या ॲपमध्ये, तुम्हाला विविध [प्रायव्हसी सेटिंग्ज दिल्या जातात ज्याद्वारे तुम्ही तुमचा पर्सनल डेटा सुरक्षित ठेवू शकता. कोणत्याही थर्ड पार्टी ॲपशिवाय तुमचे प्रोफाईल कोण तपासत आहे हे तुम्हाला सहज कळू शकते. यासाठी तुम्हाला इंस्टाग्रामच्या सेटिंगमध्ये जाऊन काही बदल करावे लागतील. चला तर मग यासाठी नक्की काय करावे लागेल ते स्टेप बाय स्टेप जाणून घेऊयात.
टेक संबंधित बातम्या वाचण्यास इथे क्लिक करा
स्टाॅकर्सना कसे शोधायचे?