फोटो सौजन्य - सोशल मिडिया (US Open Tennis)
यूएस ओपनचा काल जेतेपदासाठी सामना झाला. हा सामना अमेरिकेच्या अमांडा अनिसिमोवा विरुद्ध आर्यना सबालेंका यांच्यात खेळवण्यात आला होता. या सामन्याने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. जगातील नंबर वन बेलारूसची महिला टेनिसपटू आर्यना सबालेंकाने यूएस ओपनमध्ये इतिहास रचला आहे. महिला एकेरीच्या अंतिम फेरीत अमेरिकेच्या अमांडा अनिसिमोवाला हरवून सबालेंकाने सलग दुसऱ्यांदा ट्रॉफी जिंकली. अमेरिकन दिग्गज सेरेना विल्यम्सनंतर सलग दुसऱ्यांदा हे विजेतेपद जिंकणारी सबालेंका पहिली महिला खेळाडू बनली आहे.
तिने अंतिम सामना एक तास ३४ मिनिटांत जिंकला. सेरेनाने २०१२ आणि २०१४ मध्ये हे विजेतेपद जिंकले. सबालेंकाच्या कारकिर्दीतील हे चौथे ग्रँड स्लॅम विजेतेपद आहे. यापूर्वी तिने दोनदा ऑस्ट्रेलियन ओपन विजेतेपद जिंकले होते. अमेरिकन ओपन महिला एकेरीच्या अंतिम फेरीत आर्यना सबालेंकाने अमांडा अनिसिमोवाला ६-३, ७-६(३) असे हरवून आपले जेतेपद राखले. पहिल्यांदाच चॅम्पियन बनण्याच्या इराद्याने अमांडा अंतिम फेरीत पोहोचली पण तिचे जेतेपद जिंकण्याचे स्वप्न भंगले.
The Queen of New York – again 👑
Aryna Sabalenka defeats Amanda Anisimova to defend her US Open title 🏆 pic.twitter.com/yIeZyU1s7K
— Wimbledon (@Wimbledon) September 6, 2025
२०२५ मध्ये सबालेंकाला यापूर्वी दोनदा अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला होता. तिला ऑस्ट्रेलियन ओपन आणि फ्रेंच ओपनच्या अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला होता. यापूर्वी, अमांडा या वर्षी विम्बल्डनच्या अंतिम फेरीतही पराभूत झाली होती जिथे इगा स्वीएटेकने तिला ६-०, ६-० असे पराभूत करून विजेतेपदापासून वंचित ठेवले होते. WTA ने जाहीर केलेल्या ताज्या क्रमवारीत अमांडा आता चौथ्या क्रमांकावर पोहोचेल.विम्बल्डनच्या उपांत्य फेरीत अॅरिना सबालेंका अनिसिमोवाविरुद्ध पराभूत झाली.
तिने याचा बदलाही घेतला. यासह तिने अमेरिकन खेळाडू अमांडाविरुद्धचा तिचा विक्रम सुधारला. या दोन्ही खेळाडूंमध्ये आतापर्यंत खेळल्या गेलेल्या नऊपैकी सहा सामन्यांमध्ये अनिसिमोवाने विजय मिळवला होता. दोन महिन्यांपूर्वी ऑल इंग्लंड क्लबमध्ये सबलेंका यांना पराभूत केल्यानंतर, अनिसिमोवा तिचा पहिला ग्रँड स्लॅम फायनल इगा स्वीटेककडून ६-०, ६-० असा गमावला.
आर्यना सबालेंकाने शेवटची अमेरिकन ओपन फायनलमध्ये सहकारी अमेरिकन खेळाडू जेसिका पेगुलाला हरवले होते. या वर्षी सबालेंका तिसऱ्यांदा ग्रँड स्लॅम फायनलमध्ये पोहोचली होती, त्यापैकी गेल्या दोन वेळा तिला पराभवाचा सामना करावा लागला होता.