Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्मार्टफोन युजर्सच्या डोक्याला झालाय ताप! अचानक बदलली फोनच्या कॉल आणि डायलरची सेटिंग, काय आहे या बदलाचं कारण?

Smartphone New Update: गेल्या दोन दिवसांपासून सर्व स्मार्टफोन युजर्समध्ये एकच चर्चा आहे, स्मार्टफोन कॉलिंगमध्ये नवीन अपडेट का? विवो, रेडमी, पोको, अशा अनेक स्मार्टफोन्समध्ये या नव्या अपडेटने उच्छाद मांडला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 23, 2025 | 09:20 AM
स्मार्टफोन युजर्सच्या डोक्याला झालाय ताप! अचानक बदलली फोनच्या कॉल आणि डायलरची सेटिंग, काय आहे या बदलाचं कारण?

स्मार्टफोन युजर्सच्या डोक्याला झालाय ताप! अचानक बदलली फोनच्या कॉल आणि डायलरची सेटिंग, काय आहे या बदलाचं कारण?

Follow Us
Close
Follow Us:

तुम्ही देखील अँड्रॉईड स्मार्टफोन युजर आहात का? मग तुम्ही देखील गेल्या दोन दिवसांपासून नक्कीच वैतागला असेल. याचं कारण म्हणजे कॉल आणि डायलर सेटिंगमध्ये झालेला बदल. कोणत्याही अपडेटशिवाय कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलली आहे. विवो, रेडमी, वनप्लस, पोको अशा अनेक स्मार्टफोन्समध्ये हा नवीन बदल पाहायला मिळत आहे. या नवीन बदलांमुळे अनेक स्मार्टफोन युजर्स वैतागले आहेत. या बदलाबाबत सोशल मीडियावर अनेक पोस्ट वायरल होत आहेत. सोशल मीडियावर या बदलाचे कारण विचारले जात आहे. मात्र अनेकांना बदलाबाबत माहिती नाही. फोनमध्ये झालेल्या बदलामुळे युजर्सच्या डोक्याला ताप झाला आहे. हा बदल का झाला आणि याचं कारण काय, तुम्ही तुमची स्मार्टफोन सेटिंग पहिल्यासारखी कशी करू शकता, याबाबत आता जाणून घेऊया.

बजेट फ्रेंडली किंमतीत मिळणार 1.5GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि बरंच काही! आजच करा खरेदी Jio चे हे जबरदस्त रिचार्ज प्लॅन

मिळालेल्या माहितीनुसार, कॉल आणि डायलर सेटिंगमधील हा बदल केवळ अशाच स्मार्टफोनमध्ये झाला आहे, ज्यामध्ये Google Phone App डायलर अ‍ॅप म्हणून सेट करण्यात आला आहे. Google ने त्यांच्या Phone अ‍ॅपमध्ये Material 3 Expressive रीडिझाइन लागू केले आहे, जे आता युजर्सपर्यंत पोहोचण्यास सुरुवात झाली आहे. हे नवीन डिझाइन विशेषतः अधिक आधुनिक, सोपे आणि यूजर-फ्रेंडली बनवण्यासाठी डिझाइन केले आहे. यामध्ये सर्वात मोठा बदल अ‍ॅपच्या नेव्हिगेशन स्टाइलमध्ये दिसून येतो. (फोटो सौजन्य – Pinterest)

कोणता – कोणता बदल झाला आहे?

नव्या बदलांनतर आता अ‍ॅपमध्ये तीन टॅब आहेत. जिथे Favorites आणि Recents ला मिळून Home टॅब बनवण्यात आला आहे. या होम टॅबमध्ये तुमची कॉल हिस्ट्री दिसणार आहे आणि वरच्या बाजूला एक बार/कॅरोसेलमध्ये तुमचे फेवरेट कॉन्टॅक्ट्स दिसणार आहेत. यामुळे वारंवार कॉन्टॅक्ट्स सर्च करण्याची गरज लागणार नाही आणि तुमचे महत्त्वाचे संभाषणे लवकर ऐकता येतात.

Keypad सेक्शनमध्ये झाला बदल

Keypad सेक्शनमध्ये देखील नवीन डिझाईन देण्यात आली आहे. पहिले हे फ्लोटिंग ॲक्शन बटणद्वारे सुरु व्हायचं, मात्र आता हे अ‍ॅप वेगळ्या टॅबद्वारे तयार करण्यात आले आहे. नंबर पॅड आता गोलाकार कडा असलेल्या डिझाइनमध्ये दिसतो, ज्यामुळे इंटरफेस अधिक स्वच्छ दिसतो. त्याच वेळी, व्हॉइसमेल विभागात कोणतेही मोठे बदल झालेले नाहीत, फक्त त्याच्या लिस्ट स्टाइलला एक नवीन लूक देण्यात आले आहे.

HONOR Magic V Flip2: दमदार लूक आणि शानदार कॅमेरा! 5500mAh बॅटरीसह लाँच झाला Honor चा नवा फ्लिप फोन

गुगलने नवीन नेव्हिगेशन ड्रॉवरमध्ये संपर्क विभाग सादर केला आहे. अ‍ॅपच्या सर्च फील्डमधून ते अ‍ॅक्सेस करता येते. या ड्रॉवरमध्ये कॉन्टॅक्ट्स व्यतिरिक्त, सेटिंग्ज, क्लियर कॉल हिस्ट्री आणि मदत आणि फीडबॅक पर्याय दिले आहेत. यासोबतच इनकमिंग कॉल स्क्रीनला देखील नवीन लूक देण्यात आले आहे. आता रिसिव्ह किंवा रिजेक्ट करण्यासाठी तुम्हाला हॉरिजॉन्टल स्वाइप किंवा सिंगल टॅपचा ऑप्शन मिळणार आहे. यामुळे तुम्ही सेटिंग्ज > इनकमिंग कॉल जेश्चर सेट करू शकता.

In-call इंटरफेसमध्ये देखील बदल

In-call इंटरफेसमध्ये देखील बदल झाला आहे. आता कॉलदरम्यान वापरले जाणारे बटन पिल-शेपमध्ये दिसते. जेव्हा तुम्ही त्यांना निवडता तेव्हा ते राउंडेड रेक्टेंगलमध्ये बदलतात. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे एंड कॉल बटण पूर्वीपेक्षा मोठे केले गेले आहे.

अंस बदलू शकता हे फीचर

जर तुम्हाला हे फीचर आवडत नसेल तर तुम्ही ते बदलू शकता. यासाठी तुम्हाला कॉल अ‍ॅपची सेटिंग ओपन करून सर्वात आधी क्लिअर कॅशेवर टॅप करावे लागणार आहे. यानंतर वरच्या बाजूला दिसणाऱ्या तीन डॉटवर क्लिक करा आणि अनइंस्टॉल अपडेटवर क्लिक करा. यानंतर तुमची कॉल आणि डायलर सेटिंग पूर्वीसारखी होणार आहे.

Web Title: Why smartphone call and dialer settings has been changed know the reason and how to fix it tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2025 | 09:20 AM

Topics:  

  • smartphone tips
  • TECH TIPS
  • tech updates

संबंधित बातम्या

दिल्ली-मुंबई नंतर आता या शहरात सुरू होणार Apple चे नवीन रिटेल स्टोअर, सप्टेंबर महिन्यात होणार ग्रँड ओपनिंग
1

दिल्ली-मुंबई नंतर आता या शहरात सुरू होणार Apple चे नवीन रिटेल स्टोअर, सप्टेंबर महिन्यात होणार ग्रँड ओपनिंग

तुमच्याही स्मार्टफोनमध्ये दिसत आहेत ही लक्षणं? कोणी स्क्रीन रिकॉर्डिंग तर करत नाही ना? या सोप्या टिप्सनी ओळखा
2

तुमच्याही स्मार्टफोनमध्ये दिसत आहेत ही लक्षणं? कोणी स्क्रीन रिकॉर्डिंग तर करत नाही ना? या सोप्या टिप्सनी ओळखा

Tech Tips: या अपडेटेड फीचर्सशिवाय तुमचा नवा फ्रीजही काहीच कामाचा नाही! जाणून घ्या सविस्तर
3

Tech Tips: या अपडेटेड फीचर्सशिवाय तुमचा नवा फ्रीजही काहीच कामाचा नाही! जाणून घ्या सविस्तर

Tech Tips: पावसाळ्यात स्मार्टफोनचा वापर करणं ठरू शकतं धोकादायक, क्षणातच होऊ शकतो ब्लास्ट! या टिप्स करा फॉलो
4

Tech Tips: पावसाळ्यात स्मार्टफोनचा वापर करणं ठरू शकतं धोकादायक, क्षणातच होऊ शकतो ब्लास्ट! या टिप्स करा फॉलो

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.