Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 10 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tech Tips: घरातील जुन्या USB केबल कचऱ्यात फेकताय? थांबा… जाणून घ्या विल्हेवाट लावण्याची योग्य पद्धत

USB Cable Tips: स्मार्टफोन खरेदी केल्यानंतर त्याच्यासोबत नवीन यूएसबी केबल दिली जाते. यामुळे घरातील जुन्या यूएसबी केबल एका कोपऱ्यात पडून राहतात. अनेकांना या केबलचे काय करावे सूचत नाही. त्यामुळे बरेच लोकं या यूएसबी केबल कचऱ्यात फेकतात. पण असं करणं खरंच योग्य आहे का?

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 10, 2026 | 09:46 AM
Tech Tips: घरातील जुन्या USB केबल कचऱ्यात फेकताय? थांबा... जाणून घ्या विल्हेवाट लावण्याची योग्य पद्धत

Tech Tips: घरातील जुन्या USB केबल कचऱ्यात फेकताय? थांबा... जाणून घ्या विल्हेवाट लावण्याची योग्य पद्धत

Follow Us
Follow Us:
  • जुने USB केबल सामान्य कचऱ्यात फेकू नका, कारण त्यातील प्लास्टिक आणि धातू पर्यावरणासाठी हानिकारक ठरू शकतात.
  • तुटलेले किंवा खराब झालेले केबल वापरू नका, कारण शॉर्ट सर्किट, जास्त गरम होणे किंवा डिव्हाइसचे नुकसान होण्याचा धोका असतो.
  • चांगल्या स्थितीतील केबल पुन्हा वापरा किंवा ई-वेस्ट रीसायकलिंग सेंटरमध्ये जमा करा, ज्यामुळे इलेक्ट्रॉनिक कचरा कमी होण्यास मदत होते.
आजच्या काळात प्रत्येत घरात स्मार्टफोन आणि यूएसबी केबल पाहायला मिळतात. पण एखादा नवीन स्मार्टफोन किंवा नवीन चार्जर खरेदी केल्यानंतर जुने केबल घरातील एका कोपऱ्यात पडून असतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे, घरात एका कोपऱ्यात पडलेल्या या यूएसबी केबल किती धोकादायक असू शकतात? त्यामुळे या केबलची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणं अतिशय गरजेचं आहे. यूएसबी केबल धोकादायक का असतात आणि त्यांची कशा पद्धतीने विल्हेवाट लावली जाऊ शकते, याबाबत आता जाणून घेऊ.

Smartphone Tips: 0.5X पासून टेलिफोटोपर्यंत… काय आहे स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याचं खरं काम? जाणून घ्या सविस्तर

का धोकादायक असतात यूएसबी केबल?

मिळालेल्या माहितीनुसार, यूएसबी केबलमध्ये कॉपर, एल्युमिनियम, प्लास्टिक आणि इतर धातूंचा वापर केला जातो. जर तुम्ही सामान्य कचऱ्यात या यूएसबी केबल फेकल्या तर त्या लँडफीलमध्ये जाऊन दिर्घकाळापर्यंत खराब होत नाहीत. याशिवाय जर तुम्ही या केबल चुकीच्या पद्धतीने फेकल्या प्लास्टिक आणि धातूमुळे पर्यावरणाला नुकसान पोहोचू शकते. जर एखादी जुनी केबल तुटलेली असेल किंवा आतून खराब झाली असेल आणि तरी देखील या केबलचा वापर केला जात असेल तर शॉर्ट सर्किट, डिव्हाईस खराब होणं किंवा गरम होणं यासांरख्या समस्या निर्माण होऊ शकतात.  (फोटो सौजन्य: Pinterest)

वापरण्यापूर्वी तपासा यूएसबी केबल

जर तुमच्याकडे एखादे जुने यूएसबी केबल असेल आणि तुम्हाला तिचा पुन्हा वापर करायचा असेल तर सर्वात आधी ती केबल योग्य प्रकारे काम करत आहे की नाही याची तपासणी करणे अत्यंत गरजेचे आहे. बाहेरील आवरण फाटलेले नाही ना, केबलची तार बाहेर आली नाही ना किंवा कनेक्टरमध्ये काही समस्या आहेत का याची तपासणी करून घ्या. जर असे काही आढळले तर केबलचा वापर करू नका. यामुळे फोन लॅपटॉप आणि इतर गॅजेट्सचे नुकसान होऊ शकते.

रिसायकलिंग सेंटर

तज्ज्ञ नेहमी सल्ला देतात की, यूएसबी केबल किंवा कोणतेही इलेक्ट्रॉनिक सामान किंवा ॲक्सेसरीज कचरा पेटीत टाकू नका. यूएसबी केबल देखील इलेक्ट्रॉनिक कचऱ्याचा एक भाग मानला जातो. या केबल आणि इतर इलेक्ट्रॉनिक गॅजेट ई-वेस्ट कलेक्शन सेंटर किंवा रजिस्टर्ड रिसायकलिंग सेंटरपर्यंत पोहोचवणे एक चांगला निर्णय मानला जातो.

पर्यावरणावरील दबाव कमी होतो

यूएसबी केबलमध्ये असलेल्या तांब्यासारख्या किंमती धातूंना रिसायकलिंग करून त्यांचा वापर केला जाऊ शकतो. यामुळे नवीन धातूची गरज पडत नाही, एनर्जी वाचते, आणि पर्यावरणावरील दबाव देखील कमी होतो. योग्य प्रकारे रिसायकलिंग केल्यास इलेक्ट्रॉनिक कचरा मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत मिळू शकते.

सेकंडरी चार्जिंग केबल

प्रत्येक जुने केबल खराब नसते. जर तुमच्या घरातील एका कोपऱ्यात पडलेले यूएसबी केबल योग्य प्रकारे काम करत असेल तर तुम्ही त्याला सेकंडरी चार्जिंग केबलच्या स्वरूपात घरात ऑफिसमध्ये किंवा कारमध्ये वापरू शकता. तसेच तुम्ही केबल गरजू लोकांना देखील देऊ शकता. यामुळे नवीन केबल खरेदी करण्याची गरज पडत नाही आणि ई वेस्ट देखील वाढत नाही.

बिल भरणं तुमच्याही लक्षात राहत नाही का? चिंता करू नका, फोनपे-गुगल पेवर असा सेट करा UPI ऑटोपे

डेटा ट्रांसफर केबल

काही युएसबी केबल केवळ चार्जिंगसाठीच नाही तर डेटा ट्रांसफर करण्यासाठी देखील वापरल्या जातात. जर एखाद्या जुन्या यूएसबी केबलचा वापर डेटा ट्रांसफर करण्यासाठी केला गेला असेल तर ही केबल फेकण्यापूर्वी त्याच्यासोबत कोणते ड्राईव्ह किंवा स्टोरेज डिव्हाईस जोडलेले नाही ना याची खात्री करा.

लक्षात ठेवा

जर यूएसबी केबलला चार्जर एडॉप्टर, प्लास्टिक टाई किंवा दुसऱ्या कोणत्या अ‍ॅक्सेसरीज जोडलेली असेल तर केबल सेंटरमध्ये देण्यापूर्वी या अ‍ॅक्सेसरीज काढयला विसरू नका. यामुळे रीसाइक्लिंग प्रोसेस आणखी सोपी होईल आणि वेगवेगळे मटेरियल योग्य पद्धतीने प्रोसेस केले जाऊ शकते.

Web Title: Why you should not throw old usb cables in the trash and how to recycle them know in details tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 10, 2026 | 09:46 AM

Topics:  

  • Tech News
  • TECH TIPS
  • tech updates

संबंधित बातम्या

Smartphone Tips: 0.5X पासून टेलिफोटोपर्यंत… काय आहे स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याचं खरं काम? जाणून घ्या सविस्तर
1

Smartphone Tips: 0.5X पासून टेलिफोटोपर्यंत… काय आहे स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याचं खरं काम? जाणून घ्या सविस्तर

AI Job Layoffs : सांगताय काय? ज्या AI ची जगभर चर्चा, त्याच क्षेत्रात हाहाःकार? 66% कर्मचाऱ्यांवर… धक्कादायक वास्तव उघड
2

AI Job Layoffs : सांगताय काय? ज्या AI ची जगभर चर्चा, त्याच क्षेत्रात हाहाःकार? 66% कर्मचाऱ्यांवर… धक्कादायक वास्तव उघड

पावरफुल बॅटरी अन् दमदार फीचर्स… लवकरच येणार नवा Motorola स्मार्टफोन, लाँचपूर्वीच समोर आले डिटेल्स
3

पावरफुल बॅटरी अन् दमदार फीचर्स… लवकरच येणार नवा Motorola स्मार्टफोन, लाँचपूर्वीच समोर आले डिटेल्स

बिल भरणं तुमच्याही लक्षात राहत नाही का? चिंता करू नका, फोनपे-गुगल पेवर असा सेट करा UPI ऑटोपे
4

बिल भरणं तुमच्याही लक्षात राहत नाही का? चिंता करू नका, फोनपे-गुगल पेवर असा सेट करा UPI ऑटोपे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.