xAI लाँच करणार AI मॉडेल Grok 3, हे आहेत स्पेशल फीचर्स! काय म्हणाला Elon Musk, जाणून घ्या
अमेरिकन अब्जाधीश, टेस्ला आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सचा मालक Elon Musk ची AI कंपनी xAI आज त्यांचे नवीन AI मॉडेल लाँच करणार आहे. Grok AI मॉडेलचं नवीन अपडेट Grok 3 लवकरच लाँच केलं जाणार आहे. Grok 3 हे जगातील सर्वात स्मार्ट AI मॉडेल असेल, असे Elon Musk ने म्हटलं आहे. त्यामुळे Grok 3 अनेक प्रगत वैशिष्ट्यांसह लाँच केला जाण्याची शक्यता आहे.
Elon Musk ने म्हटलं आहे की, आज सोमवारी रात्री 8.30 वाजता (भारतीय वेळेनुसार मंगळवारी सकाळी 9.30 वाजता) लाईव्ह डेमोसह xAI चं नवीन AI मॉडेल Grok 3 लाँच केलं जाणार आहे. Elon Musk ने शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये म्हटलं आहे की, डिव्हाईसवर काम करण्यासाठी ते आठवड्याच्या शेवटी ऑफलाइन राहतील. Elon Musk ने एका कार्यदरम्यान देखील Grok 3 बाबत भाष्य केलं आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
एका कार्यक्रमादरम्यान Grok 3 बद्दल बोलताना Elon Musk म्हणाला की, Grok 3 मध्ये एक दमदार रीजनिंग कॅपेबिलिटीज आहे. आतापर्यंत घेण्यात आलेल्या चाचण्यांदरम्यान Grok 3 ने इतर सर्व AI मॉडेल्सना मागे सोडलं आहे, आणि हा एक उत्तम संकेत आहे. यामुळे असा अंदाज लावला जाऊ शकतो की, AI मॉडेल Grok 3 जगातील सर्वात स्मार्ट AI मॉडेल असणार आहे. Grok 3 नक्कीच त्याच्या सर्व युजर्सना हैराण करेल. हे AI मॉडेल वापरताना युजर्सना आतापर्यंतचा सर्वात चांगला अनुभव मिळणार आहे. हे मॉडेल असे उपाय घेऊन येत आहे ज्यांचा लोकांनी कधी विचारही केला नसेल आणि कल्पनाही करू शकत नाहीत.
Grok 3.0 will be the most powerful A.I. in the world.
— DogeDesigner (@cb_doge) February 16, 2025
Grok 3 बाबत मस्क म्हणाला की, हे AI मॉडेल सिंथेटिक डेटासह प्रशिक्षित आहे आणि लॉजिकल कंसिस्टेंसी प्राप्त करण्याचा प्रयत्न करते. जर त्याला कोणताही चुकीचा डेटा आढळला तर तो आपोआप विचार करेल आणि तो डेटा हटवेल. त्याचे मूळ रीजनिंग खूप चांगले आहे. त्यामुळे Grok 3 वरून कोणतीही चुकीची माहिती शेअर केली जाण्याची शक्यता फार कमी आहे.
Grok 3 बद्दल अद्याप जास्त माहिती समोर आलेली नाही, परंतु असे मानले जाते की त्यात अनेक प्रगत वैशिष्ट्ये आढळू शकतात. कारण मस्कने दावा केला आहे की, Grok 3 हे जगातील सर्वात स्मार्ट AI मॉडेल असणार आहे. यात टेक्स्ट-टू-वीडियो कन्वर्जन असू शकते, जे टेक्स्ट प्रॉम्प्टवरून व्हिडिओ तयार करण्यास अनुमती देईल. तसेच ते इतर मॉडेल्सपेक्षा अधिक कार्यक्षम असण्याची अपेक्षा आहे. जर असे झाले, तर ते OpenAI च्या GPT-4, गुगलच्या जेमिनी आणि अँथ्रोपिकच्या Claude ला जोरदार टक्कर देऊ शकते.