
खरेदीदारांची वाढली चिंता! Xiaomi चा 'हा' स्मार्टफोन तब्बल 10 हजार रुपयांनी झाला महाग, आता मोजावे लागणार इतके पैसे
शाओमी 17 टी स्मार्टफोन भारतात 12GB+ 256GB आणि 12GB + 512GB या रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंट्समध्ये लाँच करण्यात आला होता. या व्हेरिअंट्सच्या किंमतीत यापूर्वी 5 हजार रुपयांची वाढ करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा या स्मार्टफोन व्हेरिअंट्सच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे. खरं तर, सेल आणि सणांच्या काळात स्मार्टफोनवर डिस्काऊंट ऑफर केलं जातं. ज्यामुळे ग्राहकांना कमी किंमतीत स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी मिळते. मात्र आता ऐन सणांच्या काळात स्मार्टफोनच्या किंमतीत वाढ झाल्याने ग्राहकांना मोठा झटका बसला आहे. (फोटो सौजन्य: Xiaomi)
शाओमी 17 टी स्मार्टफोनच्या 256GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत आता 69,999 रुपये झाली आहे. हे व्हेरिअंट 59,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आले होते. कंपनीने जुलै महिन्यात या व्हेरिअंटची किंमत 5 हजार रुपयांनी वाढवली. त्यानंतर ही किंमत 64,999 रुपये झाली होती. मात्र आता पुन्हा एकदा झालेल्या दरवाढीनंतर हे व्हेरिअंट खरेदी करण्यासाठी 69,999 रुपये मोजावे लागणार आहेत.
512GB स्टोरेज व्हेरिअंट 64,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आले होते. कंपनीने जुलै महिन्यात या व्हेरिअंटची किंमत 69,999 रुपयांपर्यंत वाढवली. मात्र आता पुन्हा एकदा या व्हेरिअंटच्या किंमतीत वाढ करण्यात आली असून आता हे स्मार्टफोन व्हेरिअंट खरेदी करण्यासाठी 74,999 रुपये खर्च करावे लागणार आहेत. लाँचिंगनंतर आतापर्यंत या दोन्ही व्हेरिअंटच्या किंमतीत 10 हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
Tech Tips: स्मार्टफोनची रॅम दमदार, पण तरीही वारंवार होतोय हँग? ही असू शकतात कारणं, वाचा सविस्तर
जून महिन्यात लाँच करण्यात आलेल्या या स्मार्टफोनमध्ये 6.59-इंच अमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच, या डिव्हाईसमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 8500-अल्ट्रा प्रोसेसर मिळणार आहे. ग्राहक हा स्मार्टफोन ब्लॅक, ब्लू आणि वॉयलेट फिनिश रंगांच्या पर्यायांत खरेदी करू शकतात.