खरेदीची अशी संधी पुन्हा येणार नाही; Apple च्या सर्वात महागड्या iPhone वर मोठं डिस्काऊंट, तब्बल 20 हजारांहून कमी झाली किंमत
तुम्ही देखील नवीन आयफोन खरेदी करण्याचा विचार करताय का? तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. ई कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर फ्रीडम सेल सुरु झाली आहे. या सेलमध्ये तुम्हाला सर्वात महागडा iPhone म्हणजेच iPhone 16 Pro Max कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. या आयफोनची किंमत तब्बल 20 हजार रुपयांनी कमी झाली आहे. म्हणजेच तुम्हाला हा स्मार्टफोन ऑफर्स आणि डिस्काऊंटसह खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.
जर तुमचं बजेट कमी असेल आणि तुम्ही आयफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी सर्वात चांगली संधी आहे. iPhone 16 Pro Max वर अनेक ऑफर्स आणि डिस्काऊंट उपलब्ध आहेत, ज्यामुळे फोनची किंमत आणखी कमी झाली आहे. एवढंच नाही तर या स्मार्टफोनवर स्पेशल बँक ऑफर्स देखील उपलब्ध आहेत. ज्यामुळे या महागड्या आयफोनवर आणखी 3 हजार रुपयांचे एक्स्ट्रा डिस्काऊंट दिले जाणार आहे. याशिवाय, फोनवर नो कॉस्ट ईएमआई ऑप्शन देखील उपलब्ध आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
Apple च्या ऑफिशियल वेबसाइटवर iPhone 16 Pro Max ची किंमत सध्या 1,44,900 रुपये आहे. मात्र फ्लिपकार्टवर या महागड्या आयफोनवर तब्बल 20 हजार रुपयांचे डिस्काऊंट दिले जात आहे, त्यामुळे आयफोनची किंमत आणखी कमी झाली आहे. डिस्काऊंटसह या आयफोनची किंमत 1,24,900 रुपये झाली आहे. म्हणजेच हजारो रुपयांच्या डिस्काऊंटसह तुम्हाला हा महागडा आयफोन अत्यंत कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. तसेच या आयफोनवर काही बँक ऑफर्स देखील उपलब्ध आहेत.
कंपनी ICICI क्रेडिट कार्डसह आयफोनच्या खरेदीवर 1500 रुपयांचे डिस्काऊंट देत आहे. तसेच HDFC बँकच्या डेबिट आणि क्रेडिट कार्ड EMI ऑप्शनसह देखील 1500 रुपयांचे डिस्काऊंट दिले जाणार आहे. याशिवाय कंपनी SBI क्रेडिट कार्डसह 3000 रुपयांचे प्लॅट डिस्काऊंट ऑफर करत आहे. यामुळे महागडा आयफोन केवळ 1,21,900 रुपयांत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.
iPhone 16 Pro मध्ये 6.9 इंचाचा सुपर रेटिना XDR OLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याची पीक ब्राइटनेस 2000 निट्स आहे. फोटोग्राफीसाठी या आयफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये 48 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा, 48 मेगापिक्सल अल्ट्रावाइड लेंस आणि 5x ऑप्टिक्सझूम वाला 12 मेगापिक्सलचा टेलीफोटो कॅमेरा देण्यात आला आहे.
WhatsApp वर बदलणार कॉल करण्याची पद्धत! नवं फीचर ऑफर करणार शेड्यूलिंग, हँड रेज आणि बरंच काही…
सेल्फीसाठी या महागड्या या आयफोनमध्ये 12 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा दिला आहे. या डिव्हाईसमध्ये 3nm वर बेस्ड पावरफुल A18 Pro चिपसेट देखील देण्यात आले आहे. हा फोन जेनमोजी, इमेज प्लेग्राउंड आणि सिरीसह चॅटजीपीटी सपोर्टसह जड कामांसाठी सर्व अॅपल इंटेलिजेंस वैशिष्ट्यांना देखील समर्थन देतो.