OMG! भरपूर AI फीचर्स आणि 6,000mAh बॅटरीसह Infinix चा नवा स्मार्टफोन लाँच, डिझाईन पाहताच प्रेमात पडाल...
Infinix ने Hot 60 Series सिरीजमधील एक नवीन मॉडेल लाँच केला आहे. हे नवीन मॉडेल Hot 60i 5G या नावाने लाँच करण्यात आले आहे. ब्रँडचा हा लेटेस्ट बजट-सेंट्रिक स्मार्टफोन अनोख्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्ससह लाँच करण्यात आला आहे. या फोनमध्ये 6.75-इंच HD+ डिस्प्ले आणि 120Hz स्क्रीन रिफ्रेश रेट सपोर्ट देण्यात आला आहे. हा एक बजेट स्मार्टफोन आहे, ज्याची किंमत 10 हजार रुपयांपेक्षा कमी आहे. हा स्मार्टफोन ई कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. या स्मार्टफोनची किंमत आणि इतर स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊया.
भारतात Infinix Hot 60i 5G स्मार्टफोन एकाच व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. ज्यामध्ये 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज याचा समावेश आहे. स्मार्टफोनच्या या व्हेरिअंटची किंमत 9,299 रुपये ठेवण्यात आली आहे. मात्र बँक ऑफर्ससह ग्राहक हा स्मार्टफोन 8,999 रुपयांना खरेदी करू शकतात. फ्लिपकार्ट आणि निवडक रिटेल स्टोर्सद्वारे 21 ऑगस्ट 2025 रोजी या स्मार्टफोनची विक्री सुरु होणार आहे. हा स्मार्टफोन शॅडो ब्लू, मानसून ग्रीन, प्लम रेड आणि स्लीक ब्लॅक या चार रंगात खरेदीसाठी उपलब्ध आहे. (फोटो सौजन्य – X)
Infinix Hot 60i 5G डुअल-टोन डिझाइन लँग्वेजसह लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये IP64 रेटिंगसह TUV सर्टिफिकेशन देखील देण्यात आले आहे, जे 5 वर्षांपर्यंत लॅग-फ्री अनुभव देतो. या स्मार्टफोनमध्ये 6.75-इंच HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे रेजोल्यूशन 720×1600 पिक्सेल आहे. फोन 20:9 आस्पेक्ट रेशियो, 670 निट्स पीक ब्राइटनेस, 120Hz स्क्रीन रिफ्रेश रेट, 240Hz टच सँपलिंग रेट आणि 90.3% स्क्रीन-टू-बॉडी रेशियो ऑफर करते.
Made To Be Seen, that’s HOT!
The Infinix HOT 60i 5G, with a stunning new design, True 5G Connectivity and a massive 6000mAh Battery, is here at just ₹8,999!
Sale starts 21st August.#HOT60i5G #MadeToBeSeen pic.twitter.com/b3WLcU66hn
— Infinix India (@InfinixIndia) August 16, 2025
हा स्मार्टफोन MediaTek Dimensity 6400 प्रोसेसर आणि Mali-G57 GPU वर चालतो. या स्मार्टफोनमध्ये 4GB LPDDR4X रॅम आणि 128GB eMMC स्टोरेज देण्यात आला आले आहे. मेमरी कार्डसह स्मार्टफोनचे स्टोरेज 2TB पर्यंत वाढवले जाऊ शकते. डिव्हाईस Android 15 वर बेस्ड XOS 5.1 कस्टम UI सह लाँच करण्यात आले आहे.
ब्रँडने असा दावा केला आहे की, Hot 60i 5G अनेक AI फीचर्सने सुसज्ज आहे. या स्मार्टफोनमध्ये सर्कल टू सर्च, AI कॉल ट्रांसलेशन, AI समराइजेशन, AI राइटिंग असिस्टेंट, AI इरेजर (फोटो एडिटिंगसाठी) आणि AI वॉलपेपर जेनरेटर अशा अनेक फीचर्सचा समावेश आहे. फोनमध्ये Folax व्हॉईस असिस्टेंट देखील देण्यात आला आहे, जो हँड्स-फ्री ऑपरेशन आणि पर्सनलाइज्ड रिस्पॉन्स देतो.
Infinix Hot 60i 5G मध्ये f/1.6 अपर्चर आणि PDAF सह 50MP रियर कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फीसाठी या स्मार्टफोनमध्ये f/2.0 अपर्चर वाला 5MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
या स्मार्टफोनमध्ये 6,000mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कनेक्टिविटीसाठी या फोनमध्ये 5G, WiFi, Bluetooth 5.4, GPS, 3.5mm ऑडियो जॅक, IR ब्लास्टर आणि USB Type-C पोर्ट देण्यात आला आहे.