आता WhatsApp वरही बनवू शकता साडीवाले रेट्रो-स्टाइल फोटो, फक्त करावं लागणार हे काम; स्टेप बाय स्टेप फॉलो करा ही प्रोसेस
गेल्या काही दिवसांपासून प्रत्येक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म युजरच्या फीडवर रेट्रो स्टाईल फोटो दिसत आहे. गूगल जेमिनीच्या नॅनो बनाना AI टूलने सुरु केलेल्या ट्रेंडने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. प्रत्येकजण आपले रेट्रो स्टाईल फोटो तयार करून सोशल मीडियावर अपलोड करत आहेत. काही युजर्स तर त्यांचा 3D अवतार देखील तयार करत आहे. युजर्स त्यांच्या आवडीनुसार फोटो तयार करून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहे.
हा ट्रेंड सर्वात जास्त मुलींमध्ये व्हायरल झाला आहे. मुली त्यांच्या आवडत्या रंगात आणि आवडत्या स्टाईलमध्ये साडीतील फोटो तयार करत आहेत. आतापर्यंत रेट्रो स्टाईल फोटो तयार करण्यासाठी गूगल जेमिनीच्या नॅनो बनाना AI टूलची मदत घ्यावी लागत होती. गुगल जेमिनी वेबसाईट किंवा अॅपवरून युजर्स त्यांचे रेट्रो स्टाईल फोटो तयार करून अपलोड करत आहेत. मात्र आता हे फोटो WhatsApp वर देखील तयार केले जाऊ शकतात. यासाठी अगदी सोपी प्रोसेस फॉलो करावी लागणार आहे. Perplexity ने घोषणा केली आहे की, यूजर्स आता WhatsApp वर चॅटबोटचा वापर करून नॅनो बनाना इमेज तयार करू शकणार आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest)
Perplexity ने सांगितलं आहे की, ते WhatsApp वर त्यांच्या बॉटमध्ये गूगल जेमिनी 2.5 फ्लॅश इंजन इंटीग्रेट करत आहेत. याचाच अर्थ असा आहे की, आता युजर्स WhatsApp वर त्यांचे आवडते रेट्रो स्टाईल फोटो तयार करू शकणार आहेत. यासाठी युजर्सना WhatsApp वर Perplexity च्या बॉटसोबत चॅट करावी लागणार आहे आणि यानंतर काही सोप्या स्टेप्स फॉलो करून रेट्रो स्टाईल फोटो तयार केला जाणार आहे.
WhatsApp वर रेट्रो स्टाईल फोटो बनवण्याची प्रोसेस अतिशय सोपी आहे. सर्वात आधी तुमच्या फोनवर +1 (833) 436-3285 नंबर सेव्ह करा. यानंतर या नंबरवर WhatsApp मेसेज करा. हे तुम्हाला Perplexity आणि नॅनो बनाना इंजिनचा डायरेक्ट अॅक्सेस देणार आहे. या बॉटवर संभाषण सुरु केल्यानंतर तुम्ही तुमचा आवडता फोटो अपलोड करून त्यासाठी प्रॉम्प्ट पाठवा. म्हणजेच तुम्ही अपलोड केलेला फोटो तुम्हाला कशा प्रकारे एडीट किंवा रिडिझाईन करायचा आहे, हे जेमिनीला सांगा. काही क्षणातच इमेज तयार केली जाईल आणि तुम्हाला WhatsApp वर पाठवली जाईल. लक्षात ठेवा की तुमचा प्रॉम्प्ट जितका अधिक तपशीलवार असेल तितका फोटो चांगला दिसेल. हे फीचर मोफत आहे की पेड याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आली नाही. गुगल मर्यादित संख्येत मोफत इमेज क्रिएट करतो. अधिक इमेज क्रिएट करण्यासाठी पेड प्लॅन आवश्यक आहे.
WhatsApp वर कोणते AI चॅटबोट उपलब्ध आहे?
Meta AI
WhatsApp कशासाठी लोकप्रिय आहे?
व्हिडीओ कॉलिंग आणि मेसेजिंग