3D फोटो आणि रेट्रो साडी ट्रेंड फॉलो करताना Gemini AI वरून लीक होऊ शकतं तुमचं लोकेशन? काय आहे सत्य? कंपनीनेच केला खुलासा
गेल्या काहि दिवसांपासून Gemini AI Photos ने सोशल मीडियावर कब्जा केला आहे. अगदी काही दिवसांतच गूगलच्या Gemini AI Photos चे Nano Banana फीचर सर्वाधिक प्रसिद्ध झाले आहे. सोशल मीडिया युजर्स या फीचरचा वापर करून स्वत:ला 3D मॉडेल, रेट्रो साडी लुक आणि एनिमेटेड कॅरेक्टर्समध्ये बदलत आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ओपन करताच युजर्सचे Gemini AI ट्रेंडमधील फोटो दिसू लागतात. काही युजर्स असे देखील आहेत, ज्यांनी आतापर्यंत 50 ते 100 फोटो तयार केले आहेत. काही युजर्सनी फोटो पोस्ट केले आहेत, तर काही युजर्स हे फोटो त्यांच्या स्टोरीवर शेअर करत आहेत.
खरं तर युजर्सना हे फोटो तयार करताना मजा येत आहे. फोटोशुट आणि मेकअप करण्यापेक्षा लोकं घरबसल्या स्वत:चे फोटो वेगवेगळ्या लूकमध्ये तयार करत आहेत. आपण लहाणपणी किंवा अगदी आता देखील आपल्या ज्या लूकची केवळ कल्पना केली होती, त्या लूकमध्ये आपण कसे दिसू शकतो. हे आता आपल्याला Gemini AI चा नवीन ट्रेंड सांगणार आहे. एवढंच नाहीतर आपल्याला ज्या प्रसिद्ध लोकांना भेटण्याची इच्छा आहे, त्यांच्यासोबत देखील आपण आपला फोटो क्रिएट करू शकतो. सर्वत्र सोशल मीडियावर Gemini AI च्या फोटोंचा पूर आला आहे. पण या मजेदार एडिटिंगमध्ये, अनेक लोकांच्या मनात एक प्रश्न निर्माण होत आहे की या फोटोंद्वारे तुमचे लोकेशन लीक होऊ शकते का? तर आज याबद्दल सविस्तर जाणून घेऊया…
या संपूर्ण प्रकरणावर गुगलने म्हटलं आहे की, Gemini वर अपलोड करण्यात आलेले फोटो पूर्णपणे सुरक्षित आहेत. हे फोटो Google च्या सर्व्हरवर प्रक्रिया केले जातात आणि तुमच्या परवानगीशिवाय कोणत्याही थर्ड पार्टीद्वारे ते एक्सेस केले जात नाहीत किंवा ते AI ट्रेनिंगसाठी देखील वापरले जात नाहीत. जोपर्यंत तुम्ही गुगलला परवानगी देणार नाही, तोपर्यंत कंपनी तुमच्या डेटाचा वापर करू शकत नाही. यायच अर्थ असा आहे की, तुम्ही स्वतः परवानगी दिली तरच तुमचा डेटा वापरला जाईल. कंपनीने असं देखील सांगितलं जात आहे की, Gemini टूल यूरोपच्या GDPR आणि अमेरिकेच्या CCPA सारख्या कडक डेटा नियमांचे पालन करते.
कंपनीने केलेल्या या वक्तव्यानंतर काही तज्ज्ञांनी असं सांगितलं आहे की, लोकेशन लीक होण्याचा खरा धोका फोटोमधील कंटेट द्वारे नाही तर मेटाडेटाने आहे. म्हणजेच, जेव्हा तुम्ही मोबाईल किंवा कॅमेऱ्यातून फोटो काढता तेव्हा त्यात अनेक डिटेल्स ऑटोमॅटिकली सेव्ह होतात जसे की फोटो कोणत्या डिव्हाइसवरून कॅप्चर करण्यात आला आहे, कोणत्या दिवशी आणि कोणत्या वेळी फोटो काढला गेला आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, त्याचे स्थान देखील त्यात आहे.
Samsung Galaxy S25 FE: Samsung चा नवा स्मार्टफोन भारतात लाँच, 50MP कॅमेरासह मिळणार दमदार प्रोसेसर
अशावेळी जर तुम्ही हा सर्वलव डेटा क्लिअर न करताच तुमचा डेटा कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड केला, तर तुमचं लोकेशन लीक होण्याचा सर्वाधिक धोका असतो. यावरून हे स्पष्ट होते की साडीचा फोटो असो किंवा थ्रीडी मॉडेलचा, धोका फोटोच्या स्टाइलचा नसून त्यात लपलेल्या मेटाडेटाचा आहे.